Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गृहिणींना मोठा दिलासा! आठवडाभरात लसूण, कांद्याचे दर उतरले; सध्या किंमत किती?

गेली अनेक महिन्यांपासून दर तेजीत असलेल्या लसणाचे दर गेल्या आठवड्यात उतरले आहेत. तर कांद्याचे देखील दर कमी झाल्याने गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 07, 2025 | 04:11 PM
गृहिणींना मोठा दिलासा! आठवडाभरात लसूण, कांद्याचे दर उतरले; सध्या किंमत किती?
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : गेली अनेक महिन्यांपासून दर तेजीत असलेल्या लसणाचे दर गेल्या आठवड्यात उतरले आहेत. तर कांद्याचे देखील दर कमी झाल्याने गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. मोशी येथील नागेश्वर महाराज उपबाजारात फळभाज्यांची ४२९१ क्विंटल आवक झाली तर पालेभाज्यांची ६१७०० गडड्या आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ५३९ क्विंटल फळभाज्यांची आवक घटली अहे. तर पालेभाज्यांची १६०० गडड्यांनी आवक घटली आहे.

लसणाची किरकोळ बाजारात ३०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. कांद्याची रविवारी सर्वाधिक ८६२ क्विंटल आवक झाली असून, सरासरी १७५० क्विंटल रुपये दर मिळाला. किरकोळ बाजारात कांद्याची २५ ते ३० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. बटाट्याची ६९७ क्विंटल आवक झाली. त्याखालोखाल टोमॅटोची ६०९ क्विंटल आक झाली असून, किरकोळ बाजारात प्रतिकिलोचा दर २० ते ३० रुपये राहिला.

थंडीमध्ये मटारची आवक वाढली असून, ४२० क्विंटल आवक झालेल्या मटारला ६० रुपये प्रतिकिलो दर मिळाला. तर गाजराची २१६ क्विंटल आवक होऊन ४० रुपये प्रतिकिलो दर मिळाला.कोबीची ४२८ क्विंटल तर फ्लॉवरची ३०५ क्विंटल आवक होऊन गडड्याच्या आकारमानानुसार या फळभाज्यांची विक्री होत आहे. वांग्याची ९४ क्विंटल आवक झाली असून, किकोळ बाजारात ४० ते ५० रुपये किलो दराने विक्री होत आहे.

मिरचीची १३६ क्विंटल आवक झाली असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत १९ क्विमटलने घट होऊनही दर स्थिर राहिला. घेवट्याची ७६ क्विंटल आवक झाली, तर दोडक्याची अवघी ५ क्विंटल आवक झाली. काकडीची ७७ क्विंटल तर कारल्याची ८ क्विंटल आवक झाली.

हे सुद्धा वाचा : नोकराने मालकाकडे मागितली ७० लाखांची खंडणी अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना

पालेभाज्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीची सर्वाधिक २९२०० गडड्या आवक झाली. त्याखालोखाल मेथीची ११००० गडड्या, पालक ५१०० गडड्या, पुदिना २९०० गडड्या, शेपू ३१०० गडड्या, कांदापात १५०० गडड्या, हरभरा ५५०० गडड्या, मुळा २२०० गडड्या तर चवळीच्या १२०० गडड्या आवक झाली. या सर्व पालेभाज्यांची सरासरी १० रुपये प्रति गड्डी विक्री होत आहे.

कांदा, लसूण महत्त्वाचा घटक

तुमच्यापैकी बरेच लोक कांदा, लसूण खातात. कांदा-लसूण प्रत्येकाच्या आहारात महत्त्वाचा घटक असतो. दररोज या पदार्थांचे सेवन केले जाते. अनेकांना तर त्याच्याशिवाय खाण्याचा आनंद घेता नाही. पण तुम्हाला माहीत आहे का, अनेक जण कांदा-लसूण खाणे टाळतात. शाकाहारातल्या जैन आणि वैष्णव प्रकारच्या जेवणात कांदा आणि लसूण खात नाहीत. इतरही बर्‍याच घरांत विशेषतः कोणत्याही गणपती, चातुर्मास अशा धार्मिक काळात केलेल्या स्वयंपाकातही कांदा आणि लसूण वापरत नाहीत.

Web Title: Onion garlic prices have reduced in a week in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 04:08 PM

Topics:  

  • maharashtra
  • Onion Rate
  • Pimpri News

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.