Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ना निर्यात करता येईना, ना हॉटेलकडून मागणी होईना; कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर दुहेरी संकट

लासलगाव येथील कांदा निर्यातदार यांनी चिंता व्यक्त केली आहे. अशीच परिस्थिती काही दिवस राहिल्यास कांद्याची मागणी घटल्यामुळे कांदा दर आणखी घसरून शेतकरी वर्गाला नुकसानीला सामोरे जावे लागणार आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 12, 2026 | 08:08 AM
युद्धाच्या काळात कांद्याला फटका; दर आणखी घसरण्याची शक्यता

युद्धाच्या काळात कांद्याला फटका; दर आणखी घसरण्याची शक्यता

Follow Us
Close
Follow Us:

लासलगाव : शेतकरी कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकटांनी घेरला जातो. चालू वर्षी देखील कांद्याचे दर सध्याच्या युद्धजन्य स्थितीमुळे घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असतानाच आता भारतातील गॅस सिलेंडरवर युद्धामुळे परिणाम झाल्याने अनेक हॉटेल बंद पडण्याच्या मार्गावर आहे. कांदा दरात काही प्रमाणात घसरण होण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे.

कांद्याचे दर घसरलेले असल्यामुळे गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यंदा कांदा मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल होत असल्याने साधारणपणे १ हजार रुपये सरासरी इतका कमी भाव मिळत असल्याने अनेक संघटना तसेच शेतकऱ्यांनी कांदा दर मिळण्यासाठी आंदोलन करून राज्य आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे.

युद्धजन्य स्थितीमुळे आखाती देश असलेले दुबई, सौदे अरेबिया, अबुधाबी, ओमान, कतार, बेहरीन, कुवेत या देशांमधून पूर्णतः कांद्याची मागणी घटलेली असल्याने कांद्याच्या दरामध्ये घसरण झालेली आहे. यामधून शेतकरी अजूनही सावरलेला नसताना आता हॉटेलमधून मागणी घटल्याने त्याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजारभावावर होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.

हॉटेलकडून घटली कांद्याची मागणी

कांद्याची मागणी घटल्याने त्याचा परिणाम दिसून येतो. मुंबई येथे मोठ्या संख्येने हॉटेल आहेत. याच हॉटेलसाठी संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून कांदा स्थानिक व्यापाऱ्यांकडून मागणी केला जातो. मात्र, सिलेंडर अभावी हॉटेल बंद करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. लासलगाव येथील कांदा निर्यातदार यांनी चिंता व्यक्त केली आहे. अशीच परिस्थिती काही दिवस राहिल्यास कांद्याची मागणी घटल्यामुळे कांदा दर आणखी घसरून शेतकरी वर्गाला नुकसानीला सामोरे जावे लागणार आहेत.

गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा

युद्ध परिस्थितीमुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालेला आहे. पर्यायाने अनेक हॉटेल बंद पडत असल्याची परिस्थिती भारतामध्ये अनेक शहरात निर्माण झाली आहे. हॉटेलमध्ये अनेक खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कांद्याचा वापर केला जातो. आता हॉटेलच बंद राहणार असल्याने कांद्याच्या मागणीत घसरण झाली आहे.

हेदेखील वाचा : Middle East War : युद्धामुळे जगाचा श्वास कोंडणार? होर्मुज खाडी बंद झाल्यास ‘हे’ मार्ग असतील शेवटचा आधार

Web Title: Onion market hit during war prices likely to fall further

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 08:08 AM

Topics:  

  • Iran-Israel War
  • lasalgaon market committee
  • Onion Market

संबंधित बातम्या

मध्यपूर्वेतील युद्धाचा कांदा निर्यातीला मोठा फटका; सरासरी 1051 रुपये प्रति क्विंटल मिळतोय दर
1

मध्यपूर्वेतील युद्धाचा कांदा निर्यातीला मोठा फटका; सरासरी 1051 रुपये प्रति क्विंटल मिळतोय दर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.