Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन गर्दी जमवण्याचा प्रयत्न, अंबादास दानवे यांचा हल्लाबोल

मुंबईत आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा गंभीर आरोप केला. "जिल्हा परिषद अंगणवाडी सेविका यांना सभेला उपस्थित राहण्याचे आदेश दिले असल्याचे एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. अशाप्रकारे सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग होत असून या सभेसाठी बोलवण्यात आलेल्यांच रेटकार्ड प्रसिद्ध झाले आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Sep 11, 2022 | 04:11 PM
मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन गर्दी जमवण्याचा प्रयत्न, अंबादास दानवे यांचा हल्लाबोल
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची १२ तारखेला संभाजीनगरला सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेला प्रतिसाद मिळणार नाही हे माहित असल्याने मंत्री संदीपान भुमरे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे. लोकांनी सभेला उपस्थित रहावे म्हणून त्यांना पैसे दिले जात आहेत, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

मुंबईत आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा गंभीर आरोप केला. “जिल्हा परिषद अंगणवाडी सेविका यांना सभेला उपस्थित राहण्याचे आदेश दिले असल्याचे एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. अशाप्रकारे सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग होत असून या सभेसाठी बोलवण्यात आलेल्यांच रेटकार्ड प्रसिद्ध झाले आहे. यानुसार सभेला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकाला दीड हजार रुपये दिले जाणार आहेत,” असे दानवे म्हणाले.

शेतकऱ्यांना मदतीची घोषणा फसवी
शिंदे फडणवीस सरकारने अतिवृष्टी पीडितांना३ हजार कोटींची मदत योजना जाहीर केली आहे. अतिवृष्टी पीडितांना मदतीचे निकष 1 हेक्टरने वाढवून सुद्धा प्रत्यक्षात मदतीची रक्कम कमी करण्यात आली आहे. अद्याप अनेक नुकसानग्रस्त भागात पंचनामा करण्यात आला नाही. सरकार एकप्रकारे आकड्यांचा खेळ करतेय. पिकांच्या प्रतवारी नुसार मदत करणं आवश्यक असताना सरकारने तुटपुंजी मदतीची फसवी घोषणा केल्याची टीका दानवे यांनी केली आहे.

अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते खचले,पूल वाहून गेले,त्याला कोणती मदत नाही देण्यात आली नाही, त्यामुळे सर्वच नुकसानग्रस्तांचे सरसकट पंचनामे करा अशी मागणी दानवे यांनी केली.

आदिवासींच्या समस्यांबाबत सरकार असंवेदनशील
इगतपुरी येथे आदिवासींची मुलं ही वेठबिगारीसाठी विक्री करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अशाप्रकारे विक्री केलेल्या एका अल्पवयीन मुलीला अत्यवस्थ अवस्थेत आणून टाकण्यात आले त्यात त्या मुलीचा मृत्यू झाला आहे.
“या गंभीर प्रकरणाची साधी दखल ना सरकारने घेतली आणि ना सरकारने गुन्हे दाखल केले! यावरून सरकार आदिवासी समाजाच्या समस्यांबाबत असंवेदनशील असल्याचं स्पष्ट होते,” अशी टीका विरोधी पक्षनेते दानवे यांनी केली. आदिवासी समजाच्या विकासासाठीच्या योजना फक्त कागदावरंच असून प्रत्यक्षात त्यांना कोणतीच मदत मिळत नसल्याचा आरोप दानवे यांनी केला.

जयंत पाटील यांच्या मताशी मी सहमत
सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसोबत एका व्यासपीठावर बसणे हे संकेतांना धरून नाही अशाप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केलेल्या मताशी मी सहमत असून सरन्यायाधीश यांनी संकेत पाळायला हवे असे दानवे म्हणाले.

नवनीत राणा दंगल माजवू बघतात का?
लव्ह जिहादवरून राजकारण करत खासदार नवनीत राणा दंगली माजवण्याचा कट रचताय का असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे. बेपत्ता असलेल्या त्या मुलीने स्वतः रागाच्या भरात गेल्याचं पोलिसांना सांगितलं. यावरून समाजात तेढ वाढवण्याचं काम राणा करतायत हे स्पष्ट होतय. हे दुसऱ्यांना हिंदुत्व शिकवतात, यांना गणेश विसर्जन कसं करायचं याचीही माहिती नसल्याचे म्हणत राणा दांपत्य यांच्या गणेश विसर्जनाच्या व्हायरल व्हिडिओवर दानवे यांनी हल्लाबोल केला.

Web Title: Opposition leader ambadas danves attack on trying to gather money for the chief ministers meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2022 | 04:11 PM

Topics:  

  • Ambadas Danve
  • BJP
  • Nationalist Congress Party
  • Opposition Leader
  • shivsena

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
3

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Balasaheb Thackeray: शिवाजी पार्कला विनायक राऊत यांनी सरण रचलं अन्…; बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाबाबत आणखी एक नेता उतरला मैदानात
4

Balasaheb Thackeray: शिवाजी पार्कला विनायक राऊत यांनी सरण रचलं अन्…; बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाबाबत आणखी एक नेता उतरला मैदानात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.