Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

समृद्धी महामार्गासाठी विरोध वाढला; कवडीमोल भावात जमिनी बळकावल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्याच्या उच्च दर्जाच्या सुपीक जमिनी आणि फळबाग लावलेल्या जमीनीचे संपादन केले जात आहे. मात्र, यासाठी मिळणारा मोबदला अत्यंत तुटपुंजा आहे. तसेच त्यातून अल्प मोबदला मिळाला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 26, 2026 | 03:53 PM
समृद्धी महामार्गासाठी विरोध वाढला; कवडीमोल भावात जमिनी बळकावल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

समृद्धी महामार्गासाठी विरोध वाढला; कवडीमोल भावात जमिनी बळकावल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

Follow Us
Follow Us:

सेलू : प्रशासनाकडून हुकूमशाही पद्धतीने आणि अत्यंत कमी दरात जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी जालना-नांदेड समृद्धी महामार्गासाठी केल्या जाणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेला कडाडून विरोध दर्शविला आहे. जर प्रशासनाने जबरदस्तीने जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, तर त्यांचे हे ‘षडयंत्र’ हाणून पाडले जाईल आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.

यासंदर्भात उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांना मंगळवारी निवेदन दिले. त्यात पुढे म्हटले की, समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्याच्या उच्च दर्जाच्या सुपीक जमिनी आणि फळबाग लावलेल्या जमीनीचे संपादन केले जात आहे. मात्र, यासाठी मिळणारा मोबदला अत्यंत तुटपुंजा आहे. तसेच त्यातून अल्प मोबदला मिळाला आहे.

लोकशाही मार्गाने चर्चा न करता, प्रशासन सक्तीने जमिनी बळकावत असल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे. जोपर्यंत प्रशासन शेतकऱ्यांशी थेट चर्चा करून योग्य तो तोडगा काढत नाही, तोपर्यंत पुढील कोणतीही कार्यवाही करू नये. जर प्रशासनाने जबरदस्तीने जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, तर हे ‘षडयंत्र’ हाणून पाडले जाईल आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही निवेदनातून दिला आहे.

निवेदनावर रमेश विठ्ठलराव गाडेकर, अनिरुद्ध नाईक, दत्ता देशमाने, प्रशांत नाईक, गणेशराव मुंडे, सोनू खरात, पंजाब गाडेकर, बाळासाहेब गाडेकर, रमेशराव माने यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

प्रति हेक्टरी केवळ १८.८० लाख मिळतो दर

शासनाकडून केवळ १८ लाख ८० हजार रुपये प्रति हेक्टर या दराने मोबदला दिला जात आहे, जो बाजारभावाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. रेडी रेकनर दर म्हणजे प्रत्यक्ष बाजारभाव नव्हे, याचे भान प्रशासनाने ठेवावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनातून केली.

Samruddhi Mahamarg 1150 Crore Scam : समृद्धी महामार्गात १,१५० कोटी रुपयांचा घोटाळा! दानवेंचा भुमरेंवर गंभीर आरोप

Web Title: Opposition to samruddhi expressway intensifies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 03:53 PM

Topics:  

  • Nashik News
  • Samruddhi Highway

संबंधित बातम्या

नाशिकमध्ये महाजन, सामंतांचे प्रयत्न निष्फळ; शेवटी शिंदेंना दणका,  छुप्या रणनीतीचा वापर करत गोकुळ गिते विजयी
1

नाशिकमध्ये महाजन, सामंतांचे प्रयत्न निष्फळ; शेवटी शिंदेंना दणका, छुप्या रणनीतीचा वापर करत गोकुळ गिते विजयी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.