Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरबी समुद्रात दिसली पाकिस्तानी बोट, सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर; किनारपट्टीवर पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरू

रायगडच्या मुरूड तालुक्यातील कोर्लई येथील समुद्रात एक संशयित बोट आढळून आली आहे. यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. समुद्रात दोन नॉटिकल मैल अंतरावर ही बोट संशयास्पदरित्या उभी होती.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 07, 2025 | 12:26 PM
अरबी समुद्रात दिसली पाकिस्तानी बोट, सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर; किनारपट्टीवर पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरू (फोटो सौजन्य-X)

अरबी समुद्रात दिसली पाकिस्तानी बोट, सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर; किनारपट्टीवर पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरू (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

भारत रांजणकर, अलिबाग : भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर युद्धाचे ढग आता कायमच तयार होत आहे. अशातच आता देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील अरबी समुद्रात दोन नॉटिकल मैल अंतरात एक संशयीत बोट सापडली आहे. रेवदंडा नजीकच्या कोर्लई समुद्रात ही बोट आढळली असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान रविवारी 6 जुलैलै पोलिसांना आलेल्या अलर्टनुसार अरबी समुद्रात आढळलेली संशयित पाकिस्तानी बोटीपर्यंत पोहचण्याचा सुरक्षा यंत्रणांचा प्रयत्न अजूनही सुरू आहे. रात्री या संशयित बोटीवर प्रकाश उघडझाप होत होता. उजडल्यानंतर आता ती संशयित बोट कोर्लई पासून 3 नॉटिकल सागरी मैलावर निदर्शनात येत नसल्याने आता ती बोट गेली कुठे याचा तपास सुरक्षा यंत्रणांनी सुरू केला आहे. बोट आढळून आली नसल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्टवर असून किनारपट्टीवर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. थेरोंडा ग्रामस्थांची तातडीची बैठक रायगड पोलिसांनी बोलावली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

पुढील पाच दिवस महत्त्वाचे, या 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात पावसाची काय स्थिती? वाचा एका क्लिकवर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अलिबाग तालुक्यातील थेरोंडा येथील जेट्टीवर ही संशयित बोट येऊन गेल्याचे जीपीएस यंत्रणेच्या सहाय्याने रडारने शोधले होते. तेंव्हा रविवारी दुपारी 3 वाजण्याचा सुमार होता. त्यानंतर केंद्रातील सुरक्षा यंत्रणांनी रायगड पोलीस प्रशासनाला कळविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो संदेश पोहचण्यास तब्बल सहा तास लागले. संदेश मिळाल्यानंतर रायगड पोलिसांनी सतर्क होत बंदोबस्त कडेकोट केला होता. रात्री दिसणाऱ्या प्रकाशा पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न रायगड पोलिसांनी केला होता. परंतु सोसाट्याचा वारा , पाऊस आणि अंधार यामुळे संशयित बोटीपर्यंत यंत्रणेला पोहचता आले नाही, अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान रायगड पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित बोट दुपारी तीन वाजता थेरोंडा येथील जेट्टीवर आल्याचे लोकेशन सापडत आहे. परंतु अशी कोणतेही बोट थेरोंडा जेट्टीवर किंवा परिसरात आली नसल्याचे स्थानिकांनी पोलिसांना सांगितले. परंतु सुरक्षा यंत्रणेच्या रडारने ही संशयित बोट दाखल झाल्याचे लोकेशन शोधल्याने आता संशयित बोटीचे गुढ अधिक वाढले आहे. बोट आली होती. मग ती कितीवेळ जेट्टीवर थांबली. दुपारच्या वेळेत स्थानिकांच्या निदर्शनात ती बोट का आली नाही. आणि जर समुद्रात ती संशयित बोट असल्याचे संकेत मिळत असताना तटरक्षक दल आणि नौदल यांनी त्या बोटीचा तातडीने शोध का घेतला नाही असे अनेक गुलदस्त्यात असणारे प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान थेरोंडा येथे संशयित बोट आल्याचे रडारने सांगितल्याने रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास थेरोंडा गावातील जेट्टीवर जाऊन पाहणी केली आणि स्थानिकांबरोबर संपर्क साधला . परंतु अशी संशयित बोट आली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी थेरोंडा ग्रामस्थांची तातडीची बैठक बोलावली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Raj Thackeray on Alliance: युतीबाबत कोणतेही वक्तव्य करू नका…; राज ठाकरेंच्या विधानाने खळबळ

Web Title: Pakistani boat was spotted in the arabian sea security systems are on alert mode police search operation ongoing on the coast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2025 | 12:26 PM

Topics:  

  • Alibaug
  • Arabian Sea
  • maharashtra

संबंधित बातम्या

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
1

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
2

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
3

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
4

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.