Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhayander Crime : थेट पोलिसांच्याच अंगावर घातली सुसाट कार! मद्यपी चालकाचा हादरवणारा प्रताप; थरारक पाठलागानंतर पोलिसांकडून जेरबंद

Bhayander Crime : भाईंदरमध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलिस अंमलदाराच्या अंगावर मद्यधुंद अवस्थेत गाडी घालून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका मुजोर चालकाला भाईंदर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. तेजस्वी शिवराम विश्वकर्मा असे या आरोपीचे नाव असून, त्याने पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी थेट गस्तीवरील पोलिसांनाच गाडीने धडक दिली.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 15, 2026 | 08:01 AM
भाईंदरमध्ये मद्यधुंद चालकाचा थरार! ( सौजन्य - सोशल मीडिया )

भाईंदरमध्ये मद्यधुंद चालकाचा थरार! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • पाठलाग करून आरोपी जेरबंद
  • मद्यपी चालकाला केली अटक
  • थेट पोलिसांच्या अंगावर घातली कार
Bhayander Crime : भाईंदर, कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या अंगावर थेट कार घालून त्यांना जखमी करत पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका मद्यधुंद चालकाला भाईंदर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. तेजस्वी शिवराम विश्वकर्मा असे या मुजोर चालकाचे नाव असून, त्याच्याविरुद्ध भाईंदर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत एक पोलिस अंमलदार जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. ( Bhayander Crime ) 

Nalasopara Navratri Violence : नालासोपाऱ्यात नवरात्रोत्सवाला गालबोट! दोन गटांत तुफान हाणामारी, महिलांसह 10 जण जखमी

११ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री भाईंदर पोलिस ठाण्याच्या ‘बिट मार्शल क्रमांक ३’ चे पोलिस अंमलदार सलमान नासिर पटवे आणि पोलिस शिपाई विशाल भोई गस्तीवर होते. मुर्धा गावातील अॅक्वा गार्डन बारसमोर एक चालक अतिशय बेदरकारपणे आणि मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत चालकाला हटकले आणि पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला कारसह भाईंदर पोलिस ठाण्याच्या दिशेने घेऊन निघाले,

पोलिसांनी प्रसंगावधान राखत मुसक्या आवळल्या

सहकारी जखमी झाल्यानंतरही पोलिसांनी प्रसंगावधान राखत तत्काळ पाठलाग सुरू केला. अखेर काही अंतरावरच पोलिसांनी आरोपी तेजस्वी विश्वकर्मा याला कारसह ताब्यात घेतले. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे, पोलिसांच्या कामात अडथळा आणणे आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करणे अशा कलमांखाली गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

तावडीतून सुटण्यासाठी पळ काढण्याचा प्रयत्न

सुभाषचंद्र बोस मैदानासमोरील रस्त्यावर पोहोचताच चालकाने अचानक गाडी पोलिस ठाण्याकडे नेण्यास स्पष्ट नकार दिला. पोलिसांच्या तावडीतून निसटण्याच्या उद्देशाने त्याने क्षणार्धात कार उजव्या बाजूला वळवून भाईंदर पूर्वेच्या दिशेने सुसाट पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला असता, त्याने थेट ड्युटीवर असलेल्या पोलिस अंमलदाराच्या अंगावर कार घातली. या जोरदार धडकेत अंमलदार खाली पडून जखमी झाले.

Massive fire in Palghar’s : पालघरच्या दिनकर पाड्यात जिनिअस पेंट्स कंपनीला भीषण आग; परिसरात भीतीचे वातावरण

Web Title: Bhayander police arrest drunk driver who hit on duty cop marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 08:01 AM

Topics:  

  • Bhayander
  • Crime Police

संबंधित बातम्या

Sindhudurg Crime News: दोन दिवस बेपत्ता, जंगलात मृतदेह; महिला हवालदाराच्या पतीला अखेर बेड्या
1

Sindhudurg Crime News: दोन दिवस बेपत्ता, जंगलात मृतदेह; महिला हवालदाराच्या पतीला अखेर बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.