Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar News : ‘लंडनला पाठवलेल्या मुलींसोबत नेमकं काय घडलं?’ डहाणू प्रकरणी चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप

डहाणू येथे अल्पवयीन मुलींवरील कथित लैंगिक अत्याचार आणि मानव तस्करीसदृश प्रकरणावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. मोठ्या बहिणीसह लहान बहिणीवरही अत्याचार झाल्याचा आरोप असून, पुरवणी जबाबानंतर गुन्ह्यात आणखी कलमे जोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 10, 2026 | 03:29 PM
‘लंडनला पाठवलेल्या मुलींसोबत नेमकं काय घडलं?’ डहाणू प्रकरणी चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप

‘लंडनला पाठवलेल्या मुलींसोबत नेमकं काय घडलं?’ डहाणू प्रकरणी चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप

Follow Us
Follow Us:
  • ‘लंडनला पाठवलेल्या मुलींसोबत नेमकं काय घडलं?’
  • डहाणू प्रकरणी चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप
  • कलमांची भर घालण्यात आल्याचे वाघ यांनी स्पष्ट केले
Palghar Crime News Marathi : डहाणू येथे घडलेल्या अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार आणि कथित मानव तस्करीसदृश प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. हा विषय अत्यंत गंभीर आणि चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात मोठ्या बहिणीसह तिच्या लहान बहिणीवरही लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप असून त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित कुटुंब मानसिक धक्क्यात असल्यामुळे सुरुवातीच्या फिर्यादीत अनेक बाबी नमूद करता आल्या नव्हत्या. मात्र पुरवणी जबाब नोंदवल्यानंतर गुन्ह्यात आणखी कलमांची भर घालण्यात आल्याचे वाघ यांनी स्पष्ट केले.

1072 किमीच्या पुणे ग्रँड-2 साठी रस्ते सज्ज होणार; सप्टेंबरनंतर खोदाईला नकार, जिल्हा प्रशासन पाठवणार पत्र

आरोपीला अद्याप जामीन मिळालेला नसून केवळ काही कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पालघर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, अशी ग्वाही दिल्याचेही त्यांनी सांगितले. फसवणुकीला बळी पडणारी कुटुंबे प्रामुख्याने मारवाडी आणि जैन समाजातील असल्याचा दावा करत, ज्या कुटुंबांतील मुली साध्वी झाल्या आहेत अशाच मुलींना स्टुडंट व्हिसाच्या माध्यमातून लंडनला पाठविण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या मुलींना परदेशात नेल्यानंतर त्यांच्यासोबत नेमके काय घडत आहे, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. या सर्व व्यवहारासाठी निधी कुठून आला, त्यामागे कोण आहेत, याचा तपास येत्या काळात होईल, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत एसआयटीमार्फत चौकशीचे आदेश दिल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले.

पालघर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या माध्यमातून एसआयटीची स्थापना करण्यात येणार असून या प्रकरणातील प्रत्येक संबंधित व्यक्तीची चौकशी केली जाईल. हे प्रकरण रॅकेटचे आहे की मानव तस्करीचे, याचाही तपास एसआयटीमार्फत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या भागात अशा आणखी किती घटना घडल्या असतील याची माहिती अद्याप नसली, तरी अवघ्या अर्ध्या तासात चार तत्सम प्रकरणे आपल्या निदर्शनास आल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला. मुख्यमंत्री या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करून ते उध्वस्त करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ आज डहाणू बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला डहाणूकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचेही चित्रा वाघ यांनी सांगितले.

नोकरीसाठी पुन्हा मराठी उमेदवारांना डावललं? 25 लाखांच्या पॅकेज पण ‘Only Gujarati, Marwadi Candidate’, लिंक्डइनवरील जॉब पोस्ट वादात

Web Title: Dahanu minor girls abuse human trafficking case chitra wagh demand investigation palghar news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • crime
  • palghar

संबंधित बातम्या

Ulhasnagar Crime: उल्हासनगर हादरलं! प्रेमासाठी घरातून पळून जाणार होती; आईला समजताच निर्घृण हत्या
1

Ulhasnagar Crime: उल्हासनगर हादरलं! प्रेमासाठी घरातून पळून जाणार होती; आईला समजताच निर्घृण हत्या

Pimpri-Chinchwad Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार! 65 वर्षीय शेजाऱ्याने दोन सख्ख्या बहिणींवर केला अत्याचार
2

Pimpri-Chinchwad Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार! 65 वर्षीय शेजाऱ्याने दोन सख्ख्या बहिणींवर केला अत्याचार

Uttarpradesh Crime: संतापजनक! शेजाऱ्यांना फसवण्यासाठी बापानेच दीड वर्षांच्या चिमुकलीचा गळा आवळून केला खून
3

Uttarpradesh Crime: संतापजनक! शेजाऱ्यांना फसवण्यासाठी बापानेच दीड वर्षांच्या चिमुकलीचा गळा आवळून केला खून

Solapur Crime: पतीसोबत वाद झाला अन्…; 14 वर्षीय मुलीला घेऊन आईची रेल्वेसमोर उडी, दोघींचा दुर्दैवी मृत्यू
4

Solapur Crime: पतीसोबत वाद झाला अन्…; 14 वर्षीय मुलीला घेऊन आईची रेल्वेसमोर उडी, दोघींचा दुर्दैवी मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.