
मिळालेल्या माहितीनुसार, ‘डाय मिथाईल सल्फेट’ (Dimethyl Sulfate) या अत्यंत विषारी रसायनाची गळती झाल्याने कंपनीतील सुमारे 15 ते 18 कामगार बाधित झाले. वायूचा परिणाम झालेल्या कामगारांना तातडीने बोईसर येथील ‘अधिकारी लाइफ लाईन्स रुग्णालयात’ अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
घटनेनंतर कंपनी प्रशासनाकडून हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप स्थानिक कामगार आणि नागरिकांकडून केला जात आहे. तसेच, एमआयडीसीतील कंपन्यांकडून सुरक्षा नियमांचे वारंवार उल्लंघन होत असल्यामुळे कामगारांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून कंपनीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच, वायू गळतीचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे.
तारापूर एमआयडीसी परिसरात याआधीही अशा प्रकारच्या घटना घडल्या असून, प्रत्येक वेळी सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. मात्र, ठोस कारवाईचा अभाव आणि संबंधित विभागांचे दुर्लक्ष यामुळे अशा दुर्घटना पुन्हा पुन्हा घडत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कडक नियमांची अंमलबजावणी आणि नियमित तपासणी होणे अत्यावश्यक असल्याची मागणी आता जोर धरत आहे.
याआधी देखील मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये असाच प्रकार घडला होता. प्लॉट नंबर एफ 13 मधील मेडली फार्मासिटिकल्स लिमिटेड या कंपनीत देखील अशीच वायुगळती झाली होती. त्यावेळी कार्यरत असलेल्या 8 कागारांना या वायुगळीत प्रचंड त्रास झाला. या वायुगळतीचा परिणाम इतका भयंकर होता की, या सगळ्यात 4 कामगारांचा मृत्यू आणि इतरांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. आता पुन्हा एकदा असाच प्रकार घडत असल्यामुळे कामगारांच्या जीवाशी खेळ होत असल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळत आहे.