Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar Gas Leak: तारापूर एमआयडीसीमध्ये गॅस गळती; एकाच कंपनीतील 4 कामगारांचा मृत्यू, 2 गंभीर

गुरुवारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक १३ येथील मेडले फार्मा कंपनीत नायट्रोजन रिॲक्शन टँकमधून गॅसची गळती झाली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 21, 2025 | 08:55 PM
Palghar Gas Leak: तारापूर एमआयडीसीमध्ये गॅस गळती; एकाच कंपनीतील 4 कामगारांचा मृत्यू, 2 गंभीर
Follow Us
Close
Follow Us:

Palghar Gas Leak: पालघरमधील तारापूर-बोईसर औद्योगिक क्षेत्रातील एका औषध कंपनीत गुरुवारी (21 ऑगस्ट) दुपारी गॅस गळती झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला असून, दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. गुरुवारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक १३ येथील मेडले फार्मा कंपनीत नायट्रोजन रिॲक्शन टँकमधून गॅसची गळती झाली. या गळतीमुळे एकूण सहा कामगार बाधित झाले. त्यांना तातडीने शिंदे रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान, यातील चौघांचा मृत्यू झाला, तर इतर दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आले आहे. तर साक्षीदारांचे जबाब घेऊन गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे असे पालघर पोलिसांनी सांगितले आहे.

Maharashtra | In the Boisar police station limits of Palghar district, four persons died after suspected suffocation in a pharma factory, Medley Pharma. Six people were found severely affected by the suspected nitrogen leak. They were rushed to the nearest hospital, where four… — ANI (@ANI) August 21, 2025
Four dead in gas leak at pharmaceutical company in Tarapur-Boisar industrial area in Maharashtra’s Palghar district: officials. pic.twitter.com/UIiLZTz7Hr — Press Trust of India (@PTI_News) August 21, 2025

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

मृत आणि जखमींची नावे

या घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये कल्पेश राऊत, बंगाली ठाकूर, धीरज प्रजापती आणि कमलेश यादव यांचा समावेश आहे. तर, रोहन शिंदे आणि निलेश हाडळ यांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला, वायु गळतीचं नेमकं कारण काय आहे? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये.

जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे मत

पालघर जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी या घटनेची माहिती दिली. ते म्हणाले की, “दुपारी सुमारे 2:30 ते 3 च्या दरम्यान कंपनीतील नायट्रोजन गॅसची गळती झाली. यामुळे तेथे काम करणारे कामगार प्रभावित झाले. सहा कामगारांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे सायंकाळी 6:15 च्या सुमारास चौघांचा मृत्यू झाला. उर्वरित दोघांवर स्थानिक रुग्णालयातील ICU मध्ये उपचार सुरू आहेत. सर्व बाधित कामगारांना कारखान्यातून बाहेर काढून रुग्णालयात पोहोचवण्यात आले आहे.”

Web Title: Gas leak in tarapur midc 4 workers of the same company die 2 critically injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 08:49 PM

Topics:  

  • gas leak
  • maharashtra news
  • palghar
  • Palghar news

संबंधित बातम्या

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर
1

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण
2

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

खराब रस्त्यामुळे पालघर – छ. संभाजीनगर बसचा अपघात, 3 गंभीर तर 20 हून अधिक किरकोळ जखमी
3

खराब रस्त्यामुळे पालघर – छ. संभाजीनगर बसचा अपघात, 3 गंभीर तर 20 हून अधिक किरकोळ जखमी

काशीनाथ चौधरी कोण आहेत? पालघर साधू हत्या प्रकरणाशी काय संबंध ? भाजपने २४ तासांत पक्षातून काढून टाकले
4

काशीनाथ चौधरी कोण आहेत? पालघर साधू हत्या प्रकरणाशी काय संबंध ? भाजपने २४ तासांत पक्षातून काढून टाकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.