Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026 : Mira Bhayandar मध्ये गणेशमूर्ती विसर्जनासाठी 24 ठिकाणी व्यवस्था; 19 कृत्रिम अन् ५ नैसर्गिक जलस्रोतांचा समावेश

Mira Bhayandar Ganeshotsav 2026 : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदर महापालिकेने मूर्ती विसर्जनासाठी जय्यत तयारी केली आहे. शहरात एकूण २४ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. ६ फुटांवरील मोठ्या मूर्तींसाठी ५ नैसर्गिक जलस्रोत आणि ६ फुटांखालील मूर्तींसाठी १९ कृत्रिम तलाव तयार केले जाणार आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 09, 2026 | 12:52 PM
Mira Bhayandar Ganeshotsav 2026

Mira Bhayandar Ganeshotsav 2026

Follow Us
Follow Us:
  • मूर्ती विसर्जनाची २४ ठिकाणी व्यवस्था
  • 19 कृत्रिम अन् ५ नैसर्गिक जलस्रोतांचा समावेश
  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून तयारी
Mira Bhayandar Ganeshotsav 2026 : येत्या गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी मीरा भाईंदर महापालिकेकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. यंदा शहरात एकूण २४ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात येणार असून, त्यामध्ये ६ फुटांवरील गणेशमूर्तीसाठी पाच नैसर्गिक जलस्रोत, तर ६ फुटांखालील मूर्तीसाठी १९ कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात येणार आहे. ( Mira Bhayandar Ganeshotsav 2026 )

Zilla Parishad School: भिंतींना तडे, छताला गळती; धोकादायक इमारतीत ६८ विद्यार्थ्यांचे भविष्य, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी

६ फुटांखालील मूर्तीच्या विसर्जनासाठी विविध ठिकाणी कृत्रिम तलाव तयार केले जाणार आहेत. यामध्ये नेताजी सभाषचंद्र बोस मैदान, एसटीची मोकळी जागा, भाईंदर पूर्वेकडील बाळासाहेब ठाकरे मैदान, मेजर ध्यानचंद मैदान, जेसल पार्क चौपाटी, बालाजी मैदान, मीरा रोड येथील डॉन बॉस्को शाळेसमोरील जागा, शिवार गार्डन, मोर्चा गावातील पाटील मैदान, रामदेव पार्क परिसर, भाईंदर पश्चिमेकडील नगरभवन तलाव, भाईंदर पूर्वेकडील जुना नवघर तलाव, एस. एन. कॉलेजसमोरील मैदान, घोडबंदर येथील पद्मावती तलाव, नासका तलाव, काशिमीरा येथील जरीमरी तलाव, मिरागाव येथील सातकरी तलाव आणि पेणकरपाडा येथील सुकाळा तलाव आदी ठिकाणांचा समावेश आहे.

५ नैसर्गिक जलसेत
१९ कृत्रिम तलाव

नैसर्गिक जलस्रोतांमध्ये या ठिकाणांचा समावेश

नैसर्गिक जलस्रोतांमध्ये उत्तन समुद्रकिनारा, भाईंदर पश्चिम खाडी किनारा, भाईंदर पूर्व खाडी किनारा, घोडबंदर येथील रेतीबंदर खाडी किनारा आणि चेना नदी या ठिकाणांचा समावेश आहे. मोठ्या मूर्तीचे विसर्जन या ठिकाणी करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी शहरात ९९ हजार १६७ गणेशमूर्ती व गौरींचे विसर्जन झाले होते. यंदा यात वाढ होण्याची शक्यता पालिकेने व्यक्त केली आहे. त्यामुळे सर्व विसर्जनस्थळी पुरेसे मनुष्यबळ तैनात करण्यात येणार आहे.

प्रक्रिया सुरक्षित आणि अपघातमुक्त करण्याचा प्रयत्न

भक्तांना थेट पाण्यात उतरून मूर्ती विसर्जित करण्यास परवानगी न देता, त्यासाठी विशेष विसर्जन पथके नियुक्त केली जाणार आहेत. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पोलिसांची पथकेही तैनात राहणार असून, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी यासाठी प्रत्येक विसर्जनस्थळी वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात विसर्जन प्रक्रिया सुरक्षित आणि अपघातमुक्त करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.

Vasai Virar महापालिकेचा मोठा निर्णय! आता कंत्राटदारांऐवजी तृतीयपंथी, महिला बचत गटांच्या हाती ‘क्लीनअप मार्शल’ची धुरा

Web Title: Mira bhayandar mbmc prepares 24 spots for ganpati visarjan marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 12:52 PM

Topics:  

  • ganesh charuthi
  • Ganesh Chaturthi 2026
  • mira bhaindar
  • Mira Bhayandar Municipal Corporation

संबंधित बातम्या

Ganpati Decoration 2026: यंदा बाप्पाची आरास खिशाला कात्री लावणार! डेकोरेशन साहित्याच्या किमतीत 20 ते 30 टक्के वाढ
1

Ganpati Decoration 2026: यंदा बाप्पाची आरास खिशाला कात्री लावणार! डेकोरेशन साहित्याच्या किमतीत 20 ते 30 टक्के वाढ

Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला २१ दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या दुर्वांचे धार्मिक महत्त्व
2

Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला २१ दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या दुर्वांचे धार्मिक महत्त्व

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी
3

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी भन्नाट डेकोरेशन! घर सजवण्यासाठी पाहा फुलांच्या हटके आयडिया
4

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी भन्नाट डेकोरेशन! घर सजवण्यासाठी पाहा फुलांच्या हटके आयडिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.