Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Schools Digital Classrooms : नालासोपाऱ्यात शिक्षणाचा डिजिटल ‘स्मार्ट’ वर्ग! 41 जिल्हा परिषद शाळांचा चेहरामोहरा बदलणार

Schools Digital Classrooms : नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील ४१ जिल्हा परिषद शाळांमध्ये आमदार राजन नाईक यांच्या निधीतून डिजिटल वर्ग तयार करण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण घेता येणार आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 29, 2026 | 08:05 PM
Schools Digital Classrooms : नालासोपाऱ्यात शिक्षणाचा डिजिटल 'स्मार्ट' वर्ग! 41 जिल्हा परिषद शाळांचा चेहरामोहरा बदलणार

Schools Digital Classrooms : नालासोपाऱ्यात शिक्षणाचा डिजिटल 'स्मार्ट' वर्ग! 41 जिल्हा परिषद शाळांचा चेहरामोहरा बदलणार

Follow Us
Follow Us:
  •  भाजपचे आमदार राजन नाईक यांचा उपक्रम
  • मान्यवरांच्या हस्ते डिजिटल वर्गांचे उद्घाटन
  • जि.प. शाळांचा महापालिकेत समावेश करण्याचा प्रयत्न 
 

नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या 41 शाळांमधील विद्यार्थ्यांना आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल शिक्षण ( Schools Digital Classrooms) घेता येणार आहे. भाजपचे आमदार राजन नाईक यांच्या आमदार निधीतून या शाळांमध्ये डिजिटल वर्ग तयार करण्यात आले असून, गुरुवारी या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे. याच अनुषंगाने आमदार राजन नाईक यांनी नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या 41 शाळा डिजिटल करण्याचा पुढाकार घेतला आहे.

विद्यार्थ्यांना शालेय वयातच डिजिटल तंत्रज्ञानाची ओळख व्हावी आणि शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अध्यापन अधिक प्रभावीपणे करता यावे, या उद्देशाने हे डिजिटल वर्ग तयार करण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

जिल्हा परिषद शाळांचा महापालिकेत समावेश करण्यासाठी प्रयत्नशील

या वेळी बोलताना आमदार राजन नाईक म्हणाले की, डिजिटल शिक्षण ही काळाची गरज आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांचा महापालिकेत समावेश करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. तोपर्यंत या शाळांमधील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा आणि दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न सुरूच राहतील.

भारताचे भविष्य घडविण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून ई-विद्या, वन क्लास वन चॅनल, डिजिटल लॅब आणि डिजिटल युनिव्हर्सिटी यांसारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रगतीची दिशा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Palghar Pesa Reservation : पेसा आरक्षणाविरोधात कंत्राटी शिक्षकांचे आमरण उपोषण! आंदोलक महिलांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

पुण्यातील संस्थेकडे साहित्य देखभालीची जबाबदारी

दरम्यान, आमदार निधीतून पुणे येथील सुपरमाइंड संस्थेकडे तीन वर्षांसाठी डिजिटल बोर्ड आणि इतर साहित्याच्या देखभालीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तांत्रिक अडचणी उद्भवल्यास संबंधित संस्थेकडून विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती भाजपचे महामंत्री मनोज बारोट यांनी दिली. तसेच याबाबत सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापिका आणि शिक्षकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

या कार्यक्रमाला जिल्हा नियोजन विभागाचे अजय दळवी, सुपरमाइंड संस्थेच्या संचालिका अश्विनी भालेकर, समीर साळुंके, प्रकल्प प्रमुख शंतनू पवार, आशिष पाटील यांच्यासह केंद्रप्रमुख, मुख्याध्यापिका आणि शिक्षक उपस्थित होते. नेहरू विद्यालयाच्या शिक्षिका रुचिता सूर्यवंशी यांनीही डिजिटल शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

Palghar Protest : गोळ्या घातल्या तरी जमिनी देणार नाही! प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा उद्रेक; उद्योगमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन

💡

Frequently Asked Questions

  • Que: नालासोपाऱ्यात किती जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत?

    Ans: नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील 41 जिल्हा परिषद शाळांमध्ये डिजिटल वर्ग तयार करण्यात आले आहेत.

  • Que: डिजिटल वर्गांसाठी निधी कोणी दिला?

    Ans: भाजपचे आमदार राजन नाईक यांच्या आमदार निधीतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

  • Que: डिजिटल वर्गांचा विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आहे?

    Ans: डिजिटल बोर्ड आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थ्यांना अधिक प्रभावी पद्धतीने शिकता येणार आहे. शिक्षकांनाही अध्यापन अधिक सोपे आणि आकर्षक करता येईल.

Web Title: Nalasopara 41 zilla parishad schools digital classrooms rajan naik rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 08:05 PM

Topics:  

  • Digital School
  • Maharashtra. Pune
  • Nalasopara

संबंधित बातम्या

School Diwali Vacation 2026: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पुणे जिल्ह्यात दिवाळीच्या सुट्ट्या ‘या’ तारखेपर्यंत वाढल्या
1

School Diwali Vacation 2026: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पुणे जिल्ह्यात दिवाळीच्या सुट्ट्या ‘या’ तारखेपर्यंत वाढल्या

पुणे विभागात पदवीधर-शिक्षक निवडणुकीची रंगत; मतदारसंघांत महायुतीच बाजी मारणार, शिवेंद्रसिंहराजेंचा दावा
2

पुणे विभागात पदवीधर-शिक्षक निवडणुकीची रंगत; मतदारसंघांत महायुतीच बाजी मारणार, शिवेंद्रसिंहराजेंचा दावा

Chitra Mandai Pune: पुण्यात पहिल्यांदाच रंगणार ‘चित्र मंडई’; ३० ऑक्टोबरपर्यंत करा नोंदणी!
3

Chitra Mandai Pune: पुण्यात पहिल्यांदाच रंगणार ‘चित्र मंडई’; ३० ऑक्टोबरपर्यंत करा नोंदणी!

SIR Voter List: नालासोपारा मतदार यादीतून ३ लाख नावे वगळली? SIR च्या आकडेवारीवरून भाजपवर गंभीर आरोप
4

SIR Voter List: नालासोपारा मतदार यादीतून ३ लाख नावे वगळली? SIR च्या आकडेवारीवरून भाजपवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.