पेसा आरक्षणाविरोधात कंत्राटी शिक्षकांचे आमरण उपोषण! ( सौजन्य - Chatgpt )
लोकप्रतिनिधी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारपासून (दि. २६) कंत्राटी शिक्षकांनी बेमुदत आमरण उपोषण आंदोलन सुरू केले असून रात्री यातील दोन आंदोलन कत्यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महाराष्ट्रात सध्या शिक्षक भरती मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. पालघर या पेसा जिल्ह्यातही ती सुरु आहे.
नोकरीसाठी पात्र असलेल्या मात्र पेसा आरक्षणाने बाधित झालेल्या ओबीसी, एस्सी, एनटी, व्हीजेएनटी, एसबीसी व इतर सर्व बिगर आदिवासी प्रवर्गातील पालघर जिल्ह्यातील मानधन तत्वावरील कंत्राटी शिक्षकांचे नोकरीत कायम समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या निवासस्थासमोर दि. २१ ऑगस्ट पासून आंदोलन सुरु आहे. पैसा जिल्ह्यातील आरक्षणाने बाधित झालेल्या १७संवगपिकी शिक्षक हा संवर्गही बाधित आहे.
९० कंत्राटी शिक्षक सहभागी
६६ दिवस आंदोलन सुरू
१७संवर्गातील आरक्षण शून्य
शासन स्तरावर फक्त चर्चा आणि आश्वासनापलिकडे कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने बिगर आदिवासी मानधन तत्वावरील स्थानिक कंत्राटी शिक्षकांनी धरणे आंदोलनातून न्याय मिळाला नाही. खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या निवासस्थासमोर ६६ दिवस धरणे धरुनही न्याय मिळत नसल्याने आंदोलन कर्त्यांनी सोमवारपासून (दि. २६) बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
आंदोलनात ९० कंत्राटी शिक्षक सहभागी झाले आहेत. यातील सुवर्णा साळुंखे व मनस्वी पाटील या दोन आदोलनकर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्याना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील मनस्वी यांच्यावर उपचार करून पुन्हा त्या उपोषण स्थळी दाखल झाल्या. तर सुवर्णा यांच्यावर गंधे रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
Ans: पेसा क्षेत्रातील आरक्षणांमुळे ओबीसी, एस्सी, एनटी, व्हीजेएनटी आणि एसबीसी या १७ संवर्गातील नोकरीतील संविधानात्मक आरक्षण शून्य झाल्यामुळे, मानधन तत्त्वावरील कंत्राटी शिक्षकांना नोकरीत कायम सामावून घेण्यासाठी हे उपोषण सुरू आहे.
Ans: आंदोलन खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या निवासस्थानासमोर सुरू असून, कंत्राटी शिक्षकांनी धरणे आंदोलनानंतर आता आमरण उपोषण सुरू केले आहे.
Ans: बेमुदत उपोषण आंदोलनात सुमारे ९० कंत्राटी शिक्षक सहभागी झाले असून, त्यातील दोन महिला आंदोलकांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.






