Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar Accident News: पालघरमध्ये भीषण अपघात! वराडाच्या टेम्पोवर कंटेनर पलटला, १२ जणांचा मृत्यू

Palghar Accident: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धाणीवरी येथे वऱ्हाडाच्या टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. कंटेनर उलटल्याने १२ जणांचा मृत्यू झाला असून २५ हून अधिक जखमी आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 18, 2026 | 08:38 PM
पालघरमध्ये भीषण अपघात! (Photo Credit- X)

पालघरमध्ये भीषण अपघात! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • पालघरमध्ये भीषण अपघात!
  • वराडाच्या टेम्पोवर कंटेनर पलटला
  • १२ जणांचा मृत्यू
पालघर: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रविवारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण रस्ते अपघाताची घटना समोर आली आहे. साखरपुड्याचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या एका टाटा टेम्पोची आणि कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये १२ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २५ हून अधिक वऱ्हाडी गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, प्रशासकीय पातळीवर मृतकांच्या अधिकृत आकड्याची अंतिम पडताळणी करण्याचे काम सुरू आहे.

धाणीवरी परिसरात कंटेनर आणि टेम्पोची समोरासमोर धडक

हा भीषण अपघात पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धाणीवरी परिसरात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, डहाणू तालुक्यातील एका गावातून साखरपुड्याचे वऱ्हाड घेऊन निघालेल्या या टेम्पोमध्ये जवळपास १०० पेक्षा जास्त नागरिक स्वार होते. धाणीवरी येथे विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव कंटेनरने या वऱ्हाडाच्या टेम्पोला जोरदार धडक दिली आणि कंटेनर टेम्पोवरच उलटला. या भयानक प्रसंगानंतर महामार्गावर एकच चीख-पुकार आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

२५ हून अधिक जखमी; रुग्णालयात उपचार सुरू

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी, महामार्ग पोलिसांनी आणि मदत पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक प्रशासनाने ग्रामस्थांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनांमधून जखमींना बाहेर काढले. सर्व जखमींना तात्काळ जवळच्या कासा येथील उपजिल्हा रुग्णालय आणि रुंदलवाडी येथील वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या काही जखमींची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Accident: सोलापुरात भीषण अपघात! कार-हायवा धडकेत ५ महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू

महामार्गावर किलोमीटर लांब कोंडी; वाहतूक पूर्ववत

या भीषण अपघातामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील गुजरातहून मुंबईकडे येणारी वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त टेम्पो आणि कंटेनर रस्त्याबाहेर काढले, त्यानंतर हायवेवरील वाहतूक संथ गतीने पूर्ववत करण्यात आली.

लग्नाच्या घरात पसरली शोककळा

आनंदाच्या क्षणांमध्ये अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे डहाणूतील संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. साखरपुड्याच्या उत्साहाचे रूपांतर क्षणात मातममध्ये झाले असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी अपघाताची नोंद केली असून अधिक तपास सुरू केला आहे.

Palghar News: 170000000 रुपयांची चांदी घेऊन जाणाऱ्या व्हॅनचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, पालघरमधील चारोटी उड्डाणपुलावरील घटना

Web Title: Palghar mumbai ahmedabad highway accident wedding tempo 12 dead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 08:38 PM

Topics:  

  • Accident
  • palghar
  • Tempo

संबंधित बातम्या

Vadhvan Port च्या कामांना गती! केंद्रीय सचिवांनी केली प्रत्यक्ष पाहणी; आढावा बैठकीत दिले ‘हे’ निर्देश
1

Vadhvan Port च्या कामांना गती! केंद्रीय सचिवांनी केली प्रत्यक्ष पाहणी; आढावा बैठकीत दिले ‘हे’ निर्देश

…अन्यथा धान्य बंद होणार! e-KYC साठी अखेरची संधी; जिल्ह्यात 3.59 लाख Ration Card धारक अजूनही प्रलंबित
2

…अन्यथा धान्य बंद होणार! e-KYC साठी अखेरची संधी; जिल्ह्यात 3.59 लाख Ration Card धारक अजूनही प्रलंबित

Palghar Drought Relief Controversy : पालघरला सरकारने दुष्काळातून का वगळले? आदिवासी शेतकरी मदतीपासून वंचित
3

Palghar Drought Relief Controversy : पालघरला सरकारने दुष्काळातून का वगळले? आदिवासी शेतकरी मदतीपासून वंचित

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
4

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.