Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar News : आदिवासींच्या जमिनीचा 7/12 उताऱ्यावर हक्क कधी? Vivek Pandit आक्रमक; पालघरमध्ये हजारो आदिवासी रस्त्यावर उतरणार!

Palghar News : पिढ्यानपिढ्या जमिनीवर राबणाऱ्या आदिवासींना अद्याप त्यांच्या जमिनीचा मालकी हक्क मिळालेला नाही. वनहक्क कायदा लागू होऊन २० वर्षे उलटली तरी प्रलंबित असलेले सर्व दावे येत्या १५ डिसेंबर २०२६ पर्यंत निकाली काढून ७/१२ उताऱ्यावर नोंद करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा विवेक पंडित यांनी दिला.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 08, 2026 | 12:25 PM
दिवासींच्या जमिनीचा 7/12 उताऱ्यावर हक्क कधी? Vivek Pandit आक्रमक (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

दिवासींच्या जमिनीचा 7/12 उताऱ्यावर हक्क कधी? Vivek Pandit आक्रमक (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • वनहक्काच्या दाव्यासाठी डेडलाईन
  • निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
  • श्रमजीवी संघटनेचा विरारफाटा येथे मेळावा
Palghar News : पिढ्यानपिढ्या जमिनीवर घाम गाळूनही आदिवासींना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्क मिळालेला नाही. वनहक्क कायदा लागू होऊन २० वर्षे उलटली तरी हजारो दावे अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे येत्या १५ डिसेंबर २०२६ पर्यंत सर्व प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढून, मंजूर दाव्यानुसार प्रत्यक्ष ताब्यातील क्षेत्राची नोंद सातबारा उताऱ्यावर करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) विवेक पंडित यांनी दिला. ( Palghar News )

Vasai Virar महापालिकेचा मोठा निर्णय! आता कंत्राटदारांऐवजी तृतीयपंथी, महिला बचत गटांच्या हाती ‘क्लीनअप मार्शल’ची धुरा

सरकार सांगा, कसं जगायचं?

विरारफाटा येथे श्रमजीवी संघटनेच्या वतीने आयोजित ‘सरकार सांगा, कसं जगायचं?’ या जाहीर संविधान हक्क मेळाव्यात अडीच हजारांहून अधिक आदिवासी बांधवांना संबोधित करताना पंडित बोलत होते. संविधानाने दिलेले मूलभूत हक्क मिळवण्यासाठी आदिवासी समाजाने संघटित होऊन संघर्ष अधिक तीव्र करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

प्रश्नांकडेही सरकारचे लक्ष वेधले

पालघर जिल्ह्यातील सुमारे २५ हजार आदिवासी नागरिक आजही मूलभूत ओळखपत्रांपासून वंचित असल्याचा दावा त्यांनी केला. वनहक्क दाव्यांबरोबरच रेशनिंगमधील गैरव्यवहार, रोजगाराचा अभाव, पाणीटंचाई आणि वेठबिगारीसारख्या प्रश्नांकडेही त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.
या मेळाव्यास संघटनेच्या अध्यक्ष सीता घाटाळ, सरचिटणीस विजय जाधव, पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड, जिल्हा सचिव गणेश उंबरसडा यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मूलभूत हक्कांपासून शोषित जनता वंचित

ज्यांनी पिढ्यानपिढ्या जमिनीवर घाम गाळला, त्यांना आजही मालकी हक्क मिळालेला नाही. देशाच्या स्वातंत्र्याला आणि संविधानाला ८० वर्षे होत आली, तरी आदिवासी आणि शोषित जनता मूलभूत हक्कांपासून वंचित आहे. स्वातंत्र्यवीरांचे स्वप्न अपुरे ठेवणाऱ्या व्यवस्थेविरोधात आता सर्वांनी संघटित होऊन मैदानात उतरले पाहिजे, असे पंडित यांनी ठणकावून सांगितले.

गरीब आदिवासींची झाली आर्थिक कोंडी

८ वर्षावरील नागरिकांना जन्मदाखले मिळविण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया करावी लागत असल्याने गरीब आदिवासींची आर्थिक कोंडी होत आहे. ग्रामपंचायतींनी नागरिकांच्या वतीने न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करावी आणि त्याचा खर्च आदिवासी विकास विभागाने ग्रामपंचायतींना द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे पंडित यांनी सांगितले.

Vasai Virar Garbage Scam : 957 कोटींच्या कचरा कंत्राटाचा फैसला आता नगरसेवकांच्या हाती! दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई

Web Title: Palghar vivek pandit agitation warning over pending forest rights act claims

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 12:25 PM

Topics:  

  • Forest Department
  • Palghar news

संबंधित बातम्या

Supreme Court News: डॉक्टरांवरील हल्ल्यांवरून सर्वोच्च न्यायालय आक्रमक; राजकीय कार्यकर्त्यांवर कडक कारवाईचे आदेश
1

Supreme Court News: डॉक्टरांवरील हल्ल्यांवरून सर्वोच्च न्यायालय आक्रमक; राजकीय कार्यकर्त्यांवर कडक कारवाईचे आदेश

Vasai Tehsildar Office : पालिकेच्या नोटिसीला तहसीलचा ठेंगा! मुदत उलटूनही धोकादायक इमारतीचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल नाही
2

Vasai Tehsildar Office : पालिकेच्या नोटिसीला तहसीलचा ठेंगा! मुदत उलटूनही धोकादायक इमारतीचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.