Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Environment Conservation : वसईच्या पर्यावरण संवर्धनासाठी नारीशक्ती मैदानात! हरित पट्ट्यात वाढीव FSI ला तीव्र विरोध

Vasai Environment Conservation : वसईचे निसर्गसौंदर्य, समृद्ध पर्यावरण आणि पारंपरिक गावपण टिकवण्यासाठी आता महिला शक्ती संघटितपणे मैदानात उतरली आहे. निर्मळ येथील समाज सेवा मंडळात आयोजित 'नवज्योती महिला मंडळाच्या' मेळाव्यात २५० हून अधिक महिला प्रतिनिधींनी सहभागी झाल्या होत्या.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 28, 2026 | 11:40 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • वसईच्या पर्यावरण संवर्धनासाठी नारीशक्ती मैदानात!
  • पर्यावरण संवर्धनाचा निर्धार
  • हरित पट्ट्यात वाढीव FSI ला तीव्र विरोध
Vasai Environment Conservation : वसईचा हरित परिसर, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि गावपण टिकवण्यासाठी आता महिला शक्ती संघटितपणे मैदानात उतरणार असल्याचे येथे झालेल्या नवज्योती महिला मंडळाच्या मेळाव्यात दिसून आले, वसईतील पर्यावरणीय प्रश्नांवर आगामी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आयोजित या मेळाव्याला सुमारे २५० महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. विविध पर्यावरणीय प्रश्नांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन करताना हरित पट्टयात वाढीव बांधकामांना परवानगी दिल्यास वसईच्या अस्तित्वावरच गदा येईल, अशी चिंता व्यक्त करण्यात आली. ( Vasai Environment Conservation )

Vasai Virar Garbage Scam : वसई-विरारमध्ये 957 कोटींचा कचरा घोटाळा? ठाकरे गट आक्रमक; घाईघाईत मंजुरी दिल्याने महापालिका गोत्यात

वसईतील पर्यावरणीय बदलांवर मार्गदर्शन

निर्मळ येथील समाज सेवा मंडळ येथे झालेल्या मेळाव्याला वाघोली ते निर्मळ दरम्यान विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या सुमारे तीन हजार नागरिकांच्या मोर्चाच्या यशाची पार्श्वभूमी लाभली. या आंदोलनामुळे पर्यावरण संवर्धनाच्या लढ्यासाठी संघटनेचा आत्मविश्वास वाढल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अनुरिद्ध पॉल यांनी वसईतील पर्यावरणीय बदलांवर मार्गदर्शन केले, तर प्रणाली राऊत यांनी शहरातील पूरसदृश परिस्थितीमागील कारणांचा वेध घेतला. प्रा. भूषण यांनी वाढवण बंदराचा वसई परिसरावर होऊ शकणाऱ्या परिणामांबाबत माहिती दिली. यावेळी महापालिकेच्या आरोग्य समिती सभापती बिना मायकल फुट्‌याडों, मीना रॉड्रिग्ज, सरल डाबरे, अॅड. दीप्ती भोईर आणि ज्योत्स्ना डाबरे यांचा शाल व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.

पर्यावरण संवर्धनासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा

रेव्ह. फा. ज्यो आल्मेडा यांनी पर्यावरण संवर्धनासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. मावळत्या अध्यक्षा रेजिना क्रास्टो यांनी मनोगत व्यक्त केले, तर नवनिर्वाचित अध्यक्षा नलिनी दोडती यांनी आगामी उपक्रमांची दिशा स्पष्ट केली. मेळाव्यास समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष संदीप फिगेर उपस्थित होते. सूत्रसंचालन मेबल दोडती आणि ज्योत्स्ना डाबरे यांनी केले. तर आभार शालिनी निग्रेल यांनी मानले.

शासन व महापालिकेशी साधला संवाद

संघटनेचे रुपेश रॉड्रिग्ज यांनी पर्यावरण संवर्धनाबरोबरच स्थानिक भूमिपुत्रांची घरे नियमित व अधिकृत करण्यासाठी शासन व महापालिकेशी संवाद साधला जाईल, असे सांगितले. हिरव्या पट्ट्यात प्रीमियम व अॅसिलरीच्या नावाखाली वाढीव एफएसआय देणे म्हणजे वसईला नैसर्गिक, सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या संपविण्यासारखे असल्याचा आरोपही त्यानी केला.

पारंपरिक गावपण नष्ट होण्याची भीती

कार्यक्रमाचे अध्यक्ष आल्बर्ट डाबरे यांनी हरित पट्टयात मूळ ०.३३ एफएसआय असताना शुल्क भरून १.८० एफएसआयपर्यंत परवानगी दिली जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यामुळे गावांमध्ये टोलेजंग इमारती उभ्या राहून पारंपरिक गावपण नष्ट होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. उपाध्यक्षा नीता डाबरे यांनी पर्यावरणासह विविध स्थानिक प्रश्नांवर सातत्याने लढा उभारण्याचे आवाहन केले.

Vasai Virar News : कोट्यवधींचा निधी खर्चूनही रस्ते खड्ड्यात! महापालिकेकडून 25 कोटींची ‘मलमपट्टी’; ठेकेदारांवर होणार कारवाई?

Web Title: Vasai environment conservation women unit protect for oppose extra fsi in green belt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • Environmental Issue
  • Vasai news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.