Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra News: एकावर कारवाई, 270 बांधकामांना संरक्षण कुणाचे? पाचगणीत अनधिकृत बांधकामांवरून सवाल

पाचगणीत 270 अनधिकृत बांधकामांपैकी केवळ एका बांधकामावर बुलडोझर कारवाई झाल्याने निवडक कारवाईचा आरोप होत आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि महसूल दलालांच्या संगनमतातून काही बांधकामांना संरक्षण दिले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणामुळे पाचगणीत राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 30, 2026 | 03:58 PM
एकावर कारवाई, 270 बांधकामांना संरक्षण कुणाचे? पाचगणीत अनधिकृत बांधकामांवरून सवाल

एकावर कारवाई, 270 बांधकामांना संरक्षण कुणाचे? पाचगणीत अनधिकृत बांधकामांवरून सवाल

Follow Us
Follow Us:
  • २७० अनधिकृत बांधकामांना अभय कोणाचे?
  • एकावर बुलडोझर, बाकींच्या डोक्यावर संरक्षणाचे छत्र!
  • प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि महसूल दलालांच्या संगनमताचा संशय
इम्तियाज मुजावर , पाचगणी : महाबळेश्वर-पाचगणी या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात अनधिकृत बांधकामांविरोधात प्रशासन मोठमोठ्या घोषणा करत असले तरी प्रत्यक्षात कारवाईच्या नावाखाली निवडक बळी दिला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मार्च २०२६ मध्ये सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या आदेशानुसार महाबळेश्वर तहसीलदार सचिन म्हस्के यांनी तब्बल २७० अनधिकृत बांधकामांना नोटिसा बजावल्या. सात दिवसांत स्वतःहून बांधकाम हटविण्याचे आदेश देण्यात आले. मात्र महिन्यांवर महिने उलटून गेले, तरी आजपर्यंत बुलडोझर फक्त अनिल मडगांवकर यांच्या बांधकामावरच चालला. मग उर्वरित २६९ अनधिकृत बांधकामांना अभय कोणाच्या सांगण्यावरून देण्यात आले आहे? हा प्रश्न आता जनतेच्या मनात धगधगत आहे.

एकावर कारवाई आणि दुसऱ्याला संरक्षण हा न्यायाचा कोणता निकष? जर बांधकाम अनधिकृत होते, तर मग सर्वांवर समान कारवाई का झाली नाही? आणि जर इतरांची बांधकामे कायदेशीर असतील, तर त्यांना नोटिसा का बजावण्यात आल्या होत्या?
जितेंद्र दुडींच्या काळातील धडाकेबाज कारवाई कुठे हरवली?

विविध मागण्यांसाठी RTO कर्मचारी जाणार बेमुदत संपावर; आधी 2 जूनला निदर्शने करणार अन् नंतर…

महाबळेश्वर-पाचगणी परिसरातील अनधिकृत बांधकामांचा विषय नवीन नाही. तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या कार्यकाळात अनधिकृत बांधकामांवर अक्षरशः बुलडोझरचा धडाका पाहायला मिळाला होता. त्यावेळी कोण मोठा, कोण प्रभावशाली, कोण राजकीय पाठबळ असलेला याची पर्वा न करता कारवाई करण्यात आली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्या काळात अनधिकृत बांधकामांविरोधात कठोर भूमिका घेत प्रशासनाला स्पष्ट संदेश दिला होता की, कायद्यापुढे सर्व समान आहेत. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनीही नोटीस देऊन थेट कारवाईचा मार्ग स्वीकारला होता.

मात्र आज परिस्थिती पूर्णपणे उलटी दिसत आहे. नोटिसा दिल्या जातात, फोटोसेशन होते, प्रसिद्धीपत्रके निघतात; पण प्रत्यक्ष बुलडोझर मात्र जागेवरच थांबतो. महसूल विभागातील ‘बडे ठग’ आणि सुपारीबाज एजंटांचे संरक्षण? महाबळेश्वर तालुक्यात भिलार ,कासवंड ,खिंगर, भोसे ,अवकाळी ,माचूतर , नाकिंदा, यासह पाचगणी महाबळेश्वरच्या दरम्यान येणाऱ्या अनेक गावात राजरोसपणे अनाधिकृत बांधकाम सध्या उभी थाटली जात आहेत. घरपडाच्या नावावर बांधकामा उभी थाटली जात आहेत मात्र याकडे स्थानिक तलाठी सर्कल व महसूल विभागाचे काही कर्मचारी हाताची घडी तोंडावर बोट आणि डोळ्यावर पट्टी बांधून बिनधास्त अभय देत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अनेक महसूल कर्मचाऱ्यांचे मोठ-मोठे प्रॉपर्टीज याच पाचगणी महाबळेश्वर मध्ये असल्याचे बोलले जात आहे स्थानिकांनी आपली जुनी घर पाडून त्या ठिकाणी व्यवसायात उभे केले आणि त्यांच्यासाठी उपजीविकेचा साधन झाले मात्र स्थानिकांनी परप्रांतीयांच्या घशात ज्या जमिनी घातल्या आणि परप्रांतीयांनी येऊन या ठिकाणी अनाधिकृत बांधकामाचा उच्छाद मांडला त्याचं नेमकं करायचं काय काही स्थानिक स्वतःच्या नावावर बांधकाम करतात आणि ते असतात मात्र परप्रांतीयांची ज्यांच्याकडून भरमसाठ पैसे घेऊन अनाधिकृत बांधकामाच्या सुपार्‍या देखील घेतात आणि सांगताना सांगतात की आम्ही स्थानिक आहोत प्रशासनाच्या डोळ्यात धुळ फेकत अनधिकृत बांधकाम काही स्थानिक सुपारी बाज मंडळी करताना सध्या पहावयास मिळत आहे.

स्थानिक नागरिकांमध्ये एकच चर्चा रंगली आहे. अनेक अनधिकृत बंगले, रिसॉर्ट, फार्महाऊस आणि व्यावसायिक बांधकामे आजही ताठ मानेने उभी आहेत. मग ही बांधकामे कोणाच्या आशीर्वादाने वाचली? स्थानिक लोकप्रतिनिधी, काही नगरसेवक, महसूल विभागातील कथित दलाल, सुपारीबाज एजंट आणि काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळेच ही बांधकामे आजही अभेद्य किल्ल्याप्रमाणे उभी असल्याचा आरोप होत आहे. सामान्य नागरिकाच्या घरावर तात्काळ नोटीस आणि कारवाई; मात्र प्रभावशाली लोकांच्या कोट्यवधींच्या बेकायदेशीर प्रकल्पांवर मौन का? हा प्रश्न आता प्रशासनाच्या गळ्यातील फास ठरत आहे.

२७० जणांची यादी जाहीर का होत नाही?

जर २७० बांधकामांना नोटिसा बजावल्या असतील, तर त्या सर्वांची नावे आणि तपशील जनतेसमोर का आणले जात नाहीत? कोणत्या बांधकामांवर कारवाई झाली? कोणत्या प्रकरणांमध्ये स्थगिती आहे? कोणत्या प्रकरणांमध्ये प्रशासनाने माघार घेतली?
या सर्वांची माहिती सार्वजनिक करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र या यादीवर पडदा टाकला जात असल्याने संशय अधिकच गडद होत आहे.

पर्यावरण संरक्षण की निवडक दमन?

महाबळेश्वर-पाचगणी हा इको-सेंसिटिव्ह झोन आहे. येथे प्रत्येक विटेवर कायद्याचे बंधन आहे. मग पर्यावरणाच्या नावाने फक्त काहींच्याच विरोधात मोहीम आणि इतरांना संरक्षण का? पर्यावरण संरक्षण हा उद्देश असेल, तर कारवाई सरसकट व्हायला हवी. अन्यथा ही मोहीम पर्यावरणासाठी नसून निवडक दमन आणि निवडक संरक्षणाचा खेळ असल्याची भावना बळावत आहे.

बुलडोझर उर्वरित २६९ बांधकामांवर कधी?

आज जनतेचा प्रश्न सरळ आणि स्पष्ट आहे. अनिल मडगांवकर यांच्या बांधकामावर बुलडोझर चालू शकतो, तर उर्वरित २६९ बांधकामांवर का नाही? कायद्याचा धाक फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित आहे का? प्रशासनाला खरोखरच अनधिकृत बांधकामे हटवायची आहेत की काहींना लक्ष्य करून बाकींचे संरक्षण करायचे आहे?

Devendra Fadnavis : “ओबीसींना घाबरण्याची गरज नाही आणि मराठा…”, जरांगेंचं उपोषणानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

शिवसेना उपजिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे गट संदीप पवार

महाबळेश्वर-पाचगणीतील नागरिक आता उत्तरांची मागणी करत आहेत. न्याय व्हायचा असेल तर तो सर्वांना समान असला पाहिजे. एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा न्याय हा लोकशाहीचा नव्हे तर दुटप्पी कारभाराचा नमुना आहे. आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष एका प्रश्नाकडे लागले आहे. “२७० अनधिकृत बांधकामांना नोटिसा दिल्यानंतरही ती आजही उभी कशी? आणि त्या सर्वांवर बुलडोझर कधी चालणार?”

Web Title: Panchgani illegal constructions selective action administration revenue nexus allegation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 03:58 PM

Topics:  

  • illegal construction
  • maharashtra

संबंधित बातम्या

MNS : जामदा प्रकल्प क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांविरोधात मनसे आक्रमक; मनसेच्या अविनाश सौंदळकरांकडून सखोल चौकशीची मागणी
1

MNS : जामदा प्रकल्प क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांविरोधात मनसे आक्रमक; मनसेच्या अविनाश सौंदळकरांकडून सखोल चौकशीची मागणी

Pratap Sarnaik: रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश
2

Pratap Sarnaik: रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश

Fire Fighter System: राष्ट्रीय महामार्गांवर स्वतंत्र ‘फायर फायटर’ यंत्रणा हवी; टोलसोबत सुरक्षेची जबाबदारीही महत्त्वाची
3

Fire Fighter System: राष्ट्रीय महामार्गांवर स्वतंत्र ‘फायर फायटर’ यंत्रणा हवी; टोलसोबत सुरक्षेची जबाबदारीही महत्त्वाची

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ
4

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.