Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra tourism : घोडेवाले, फोटोग्राफर, विक्रेत्यांना ड्रेस कोड बंधनकारक, पर्यटकांची फसवणूक रोखण्यासाठी पाचगणीत नवा नियम

पाचगणी येथील पर्यटन व्यवस्थापनात शिस्त आणण्यासाठी नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. टेबल लँड परिसरातील घोडेव्यावसायिक, फोटोग्राफर, हातगाडी चालक आणि विक्रेत्यांसाठी ड्रेस कोड अनिवार्य करण्यात आला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 28, 2026 | 05:45 PM
घोडेवाले, फोटोग्राफर, विक्रेत्यांना ड्रेस कोड बंधनकारक, पर्यटकांची फसवणूक रोखण्यासाठी पाचगणीत नवा नियम

घोडेवाले, फोटोग्राफर, विक्रेत्यांना ड्रेस कोड बंधनकारक, पर्यटकांची फसवणूक रोखण्यासाठी पाचगणीत नवा नियम

Follow Us
Follow Us:

पाचगणी : राज्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पाचगणीत पर्यटन व्यवस्थापनात शिस्त आणण्यासाठी नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून टेबलँड पर्यटन स्तळी व्यवसाय करणाऱ्या घोडेव्यावसायिक, फोटोग्राफर, हातगाडी चालक तसेच विविध विक्रेत्यांसाठी ड्रेस कोड अनिवार्य करण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.पर्यटनस्थळी व्यवसाय करणाऱ्या घोडेवाले आणि विक्रेत्यांसाठी ड्रेस कोड अनिवार्य करणारे पाचगणी हे राज्यातील पहिले पर्यटनस्थळ ठरले आहे.

पाचगणीतील टेबल लँड, सिडनी पॉईंट, पारशी पॉईंट यांसारख्या प्रमुख पर्यटनस्थळी दररोज हजारो पर्यटक भेट देत असतात. पर्यटन हंगामात अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने पर्यटकांची फसवणूक, ठरलेल्या दरापेक्षा जादा पैसे आकारणे, तसेच काही ठिकाणी मद्यपान करून पर्यटकांशी गैरवर्तन केल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे सातत्याने येत होत्या. या पार्श्वभूमीवर नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तरित्या हा निर्णय घेतला आहे.

कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या दिवशी हिंदूंना प्रवेशबंदी, दोन्ही शिवसेना आणि भाजपकडून घंटानाद आंदोलन

पालिकेकडून अधिकृत व्यवसायिकांना ओळखपत्रासह निश्चित ड्रेस देण्यात आले असून . घोडेव्यावसायिक, विक्रेते आणि पर्यटनस्थळी सेवा देणाऱ्या संबंधित व्यावसायिकांनी हा ड्रेस परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ड्रेस कोडमुळे अधिकृत आणि अनधिकृत व्यवसायिक यांच्यात स्पष्ट फरक ओळखता येणार असून पर्यटकांनाही अधिकृत सेवा ओळखणे सोपे जाणार आहे.

नगरपालिकेने स्पष्ट केले आहे की, ड्रेस कोडशिवाय व्यवसाय करणाऱ्यांना पर्यटनस्थळी प्रवेश दिला जाणार नाही. अनधिकृतपणे व्यवसाय करणारे, पर्यटकांकडून जादा पैसे घेणारे किंवा मद्यपान करून वावर करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून पर्यटनस्थळी नियमित तपासणी मोहीम राबवली जाणार आहे.

पर्यटकांकडून आकारण्यात येणारे दर पालिकेकडून निश्चित करण्यात आले असून त्याची माहिती विविध ठिकाणी फलकांद्वारे लावण्यात येणार आहे. घोडेस्वारी, फोटोग्राफी तसेच इतर सेवांसाठी निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक पैसे आकारल्यास संबंधित परवानाधारकावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

या निर्णयाचे स्थानिक नागरिक आणि अनेक व्यावसायिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. पर्यटनस्थळी काही मोजक्या अनधिकृत व्यवसायिकांमुळे संपूर्ण पाचगणीची प्रतिमा खराब होत असल्याची भावना व्यक्त केली जात होती. ड्रेस कोडमुळे व्यवसायात पारदर्शकता येईल तसेच पर्यटकांचा विश्वास वाढेल, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे.

घोडेव्यावसायिकांमध्येही या निर्णयाबाबत सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. अधिकृत ओळख मिळाल्याने पर्यटकांचा विश्वास वाढेल तसेच अनधिकृत व्यवसायिकांना आळा बसेल, असे अनेकांनी सांगितले. काहींनी सुरुवातीला ड्रेस कोडबाबत नाराजी व्यक्त केली असली तरी पर्यटन व्यवस्थापनासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे मत पुढे येत आहे.

दरम्यान, पर्यटन व्यवस्थापनात शिस्त आणि पारदर्शकता आणण्यासाठी प्रशासनाचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून आगामी काळात इतर पर्यटनस्थळांवरही अशाच प्रकारचे नियम लागू करण्यात येणार आहेत

“पाचगणी हे आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाणारे पर्यटनस्थळ आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरण मिळावे, यासाठी नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे हा निर्णय घेतला आहे. ड्रेस कोडमुळे अधिकृत व्यवसायिकांची सहज ओळख पटणार असून पर्यटकांची फसवणूक रोखण्यास मदत होणार आहे. मद्यपान करून गोंधळ घालणे, पर्यटकांकडून जादा पैसे घेणे किंवा अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. पर्यटनस्थळाची प्रतिमा जपण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.”, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.

MMRDA News: मेट्रो लाईन 5A ला मंजुरी; भिवंडी-कल्याण-उल्हासनगर प्रवास होणार अधिक जलद

“पाचगणीची पर्यटन संस्कृती, स्वच्छ प्रतिमा आणि पर्यटकांचा विश्वास टिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटनस्थळी अधिकृत व्यवसाय करणाऱ्या घोडेव्यावसायिक, विक्रेते आणि इतर संबंधितांना ड्रेस कोड बंधनकारक करण्यात आला आहे पर्यटकांकडून ठरलेल्या दरापेक्षा जास्त पैसे आकारणे किंवा गैरप्रकार करणाऱ्यांवर पालिका कठोर कारवाई करणार आहे. पर्यटन व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल.” अशी माहिती नगराध्यक्ष- पाचगणी नगरपरिषद दिलीप बगाडे यांनी दिली.

Web Title: Panchgani makes dress code mandatory for tourism business workers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • maharashtra
  • tourism

संबंधित बातम्या

Matheran News: पर्यटननगरी माथेरान अंधारात! अनेक पथदिवे बंद; रात्री पर्यटकांची गैरसोय
1

Matheran News: पर्यटननगरी माथेरान अंधारात! अनेक पथदिवे बंद; रात्री पर्यटकांची गैरसोय

नोकरीला निघाले अन् काळाने घातली झडप; खासगी बस-कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू
2

नोकरीला निघाले अन् काळाने घातली झडप; खासगी बस-कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू

नवीन ट्रॅव्हल थेरपी! ना नेटवर्क, ना नोटिफिकेशन… भारतातील सायलंट टुरिस्ट ठिकाणं जाणून घ्या
3

नवीन ट्रॅव्हल थेरपी! ना नेटवर्क, ना नोटिफिकेशन… भारतातील सायलंट टुरिस्ट ठिकाणं जाणून घ्या

Ferry Boat : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबई-अलिबाग फेरीबोट सेवा १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू
4

Ferry Boat : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबई-अलिबाग फेरीबोट सेवा १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.