Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

७० ट्रॅक्टर, तीन हार्वेस्टरचा अनोखा पोळा, देगावच्या घाडगे वस्तीवर ‘लोखंडी साथीदारां’चा सन्मान; फुलांनी सजवून काढली गावातून मिरवणूक

Pandharpur Degav Pola Festival News: पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील घाडगे वस्तीवर पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांच्या आधुनिक साथीदारांचा अनोखा सन्मान करण्यात आला. तब्बल ७० ट्रॅक्टर आणि तीन हार्वेस्टर मशिन धुवून, फुलांनी सजवून त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 10, 2026 | 09:16 PM
Pandharpur Degav Pola Festival News:

Pandharpur Degav Pola Festival News:

Follow Us
Follow Us:
  • ७० ट्रॅक्टर, तीन हार्वेस्टरचा अनोखा पोळा
  • देगावच्या घाडगे वस्तीवर ‘लोखंडी साथीदारां’चा सन्मान
  • फुलांनी सजवून काढली गावातून मिरवणूक
पंढरपूर: शेतकऱ्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेल्या बैलांचा सन्मान करण्याची पोळ्याची परंपरा आजही कायम आहे. मात्र, बदलत्या काळानुसार शेतीचे स्वरूपही बदलले असून बैलांच्या जोडीला ट्रॅक्टरने महत्त्वाची भूमिका घेतली आहे. वर्षभर शेतकऱ्याच्या सेवेत राबणाऱ्या याच आधुनिक साथीदारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील घाडगे वस्तीवर तब्बल ७० ट्रॅक्टर आणि तीन हार्वेस्टर मशिनचा अनोखा पोळा साजरा करण्यात आला.

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट, तातडीने दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार रुपये द्या- हर्षवर्धन सपकाळ

देगावचे माजी उपसरपंच धर्माआबा घाडगे यांच्या सख्ख्या व चुलत बंधूंच्या कुटुंबांकडे एकूण ७० ट्रॅक्टर आणि तीन हार्वेस्टर मशीन आहेत. शेतीला जोडव्यवसाय म्हणून घाडगे कुटुंबीयांकडून ऊस वाहतुकीचा व्यवसाय केला जातो. अनेक वर्षांपासून हे ट्रॅक्टर ऊस वाहतुकीच्या माध्यमातून शेतकरी आणि साखर कारखान्यांच्या सेवेत धावत आहेत. पोळ्याच्या निमित्ताने या ‘लोखंडी साथीदारांचा’ सन्मान करण्यासाठी सर्व ट्रॅक्टर व हार्वेस्टर प्रथम वॉशिंग सेंटरवर नेऊन स्वच्छ धुवून घेण्यात आले. त्यानंतर प्रत्येक ट्रॅक्टरला रंगीबेरंगी फुलांच्या आकर्षक माळांनी सजविण्यात आले. फुलांनी सजलेले ७० ट्रॅक्टर आणि तीन हार्वेस्टर एकाच ठिकाणी पाहण्याचा अनोखा अनुभव ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांना मिळाला.सजविलेल्या ट्रॅक्टरची गावातून मिरवणूक काढण्यात आली.

परंपरेचा सन्मान आणि आधुनिक शेतीचा स्वीकार

पारंपरिक पोळ्याला आधुनिक शेतीची जोड देणाऱ्या या मिरवणुकीने परिसराचे लक्ष वेधून घेतले. घाडगे वस्तीवरील महिला भगिनींसह कुटुंबातील सदस्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. संतोष शिंदे, तानाजी घाडगे, राजेंद्र घाडगे, शहाजी घाडगे, भीमराव घाडगे यांच्यासह घाडगे वस्तीवरील महिला व कुटुंबीय मोठ्या संख्येने सहभागी झाले. परंपरेचा सन्मान आणि आधुनिक शेतीचा स्वीकार यांचा संगम घडविणारा हा ‘ट्रॅक्टर पोळा’ देगाव परिसरात चर्चेचा व आकर्षणाचा विषय ठरला. पूर्वी बैलांना सजवून त्यांची पूजा केली जात होती; आज त्याच कृतज्ञतेच्या भावनेतून ट्रॅक्टरला सजवून त्याचा सन्मान केला जात असल्याचे यावेळी दिसून आले.

देगावचे माजी उपसरपंच, धर्माआबा घाडगे म्हणाले की, आमच्या घाडगे कुटुंबाकडे एकूण ७० ट्रॅक्टर आणि तीन हार्वेस्टर मशीन आहेत. सर्वांना सोबत घेऊन आम्ही ऊस वाहतुकीचा व्यवसाय करतो. त्यातून उदरनिर्वाहाबरोबरच कुटुंबाची प्रगतीही साधता आली. शेतकऱ्याचा बैल जसा त्याचा साथीदार मानला जातो, त्याचप्रमाणे आज ट्रॅक्टरही शेतकऱ्याचा साथीदार झाला आहे. वर्षभर त्याच्याकडून काम करून घेतो, त्यामुळे पोळ्याच्या दिवशी त्यालाही सजवून त्याचा सन्मान केला पाहिजे. याच भावनेतून हा आनंदोत्सव साजरा केला.

अत्यंत दिलासादायक! Pune Mhada चा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपर्यंत देण्यात आली मुदतवाढ

Web Title: Pandharpur degav tractor pola 70 tractors three harvesters ghodge family

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 09:16 PM

Topics:  

  • Festival News
  • pandharpur

संबंधित बातम्या

Pandharpur Corridor: पंढरपूरच्या ऐतिहासिक वास्तूंचं होणार संवर्धन, होळकर-शिंदे वाड्यांसह मंदिरांसाठी ३६ कोटींची तरतूद
1

Pandharpur Corridor: पंढरपूरच्या ऐतिहासिक वास्तूंचं होणार संवर्धन, होळकर-शिंदे वाड्यांसह मंदिरांसाठी ३६ कोटींची तरतूद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.