आज भिलारे यांच्या बागेला पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक आणि शेतकरी मोठ्या संख्येने भेट देत आहेत. लालसर आणि आकर्षक सफरचंदांनी सजलेली ही बाग पाहताना अनेकांना काश्मीरमधील सफरचंद बागांची आठवण होते.
बदलत्या गरजा आणि वेगाने विकसित होणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाच्या युगात, केवळ नोकरीवर अवलंबून राहणे आव्हानात्मक ठरू शकते. नोकरीच्या संधी मर्यादित असल्यामुळे आणि कमाई अनिश्चित असल्यामुळे, बरेच लोक व्यवसायाकडे वळत आहेत.
तसेच जनावरांसाठीचा सुका चारा, वैरण पूर्णपणे भिजून काळी पडली होती. या वैरणीवर बुरशी रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. तर ओला चारा मका पीक वाया गेले होते. मका उत्पादनात प्रचंड घट आली.
रोजच्या आहारातील प्रत्येक डीशला चव आणणारा हा टोमॅटो आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. प्रसंगी मृत्यूही ओढवू शकतो. अमेरिकेत टोमॅटोमध्ये 'साल्मोनेला' नावाचा संसर्ग आढळला आहे. त्यामुळे टोमॅटो परत मागवण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याच्या केंद्र स्थानी, शेतकऱ्यांनी केळी आणि कापूस पिकांचे संरक्षण आणि वाढ करण्यासाठी मारुत ड्रोन अकादमीच्या अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. कसा केलाय वापर जाणून घ्या
स्ट्रॉबेरीच्या शेतीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याची अपेक्षा आहे. बाजारात स्ट्रॉबेरीचा भाव 300 रुपये किलो आहे.स्ट्रॉबेरीच्या शेतीतून या शेतकऱ्यांचे उत्पन्न तर वाढेलच, पण इतरांसाठीही ते प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा आहे.
सोयाबीनचा पेरणी ते कापणीपर्यंतचा खर्च काढला, तर 25 हजार रुपये एकरपर्यंत येतो आणि संपूर्ण सोयाबीन शेतकऱ्यांनी विकला, तर 30 हजार रुपये त्यांच्या हातात येत आहे.