Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajnala Right Canal : कर्जतच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी ! ४० गावांतील शेतीला मिळणार पाणी

Rajnala Right Canal : कर्जतच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी ! ४० गावांतील शेतीला मिळणार पाणीकर्जत तालुक्यातील पूर्व भागातील शेतीसाठी महत्त्वाच्या असलेल्या राजनाला सिंचन समूहाच्या कालव्यांच्या दुरुस्ती आणि साफसफाईच्या कामांना वेग आला आहे. यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप हंगामातील भातशेतीचे नुकसान झाले.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 04, 2026 | 09:36 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • टाटाचे भिवपूरी जलविद्युत केंद्राचे अवजलावर कार्यान्वित 
  • भाताची शेती यावेळी पूर्ण बहरली नाही, शेतीचे नुकसान झाले 
  • पाणी सोडण्याच्या हालचाली पाटबंधारे विभागाने सुरू केल्या  
Rajnala Right Canal :  कर्जत तालुक्यातील पूर्व भाग हिरवागार करणाऱ्या राजनाला कालव्याच्या दुरुस्तीच्या कामाला वेग आला आहे.सर्व कालवे आणि पोट कालवे यांची साफसफाई करण्याचे काम वेगाने सुरू असून यावर्षी डिसेंबर महिन्याचे पहिल्या आठवड्यात कालव्याचे पाणी सोडण्याची कार्यवाही पाटबंधारे खात्याने सुरू केली आहे.

टाटाचे भिवपूरी जलविद्युत केंद्राचे अवजलावर कार्यान्वित

राजनाला सिंचन समूह टाटाचे भिवपूरी जलविद्युत केंद्राचे अवजलावर कार्यान्वित आहे.राजनाला डावा कालव्याचे सिंचन सन 1959 पासुन सुरु आहे. राजनाला उजवा कालवा आणि पालीपोटल कालवा सन 1972-73 साली पूर्ण झालेला असून सिंचनास सन 1973-74 मध्ये सुरुवात झालेली आहे. राजनाला सिंचन समूहा मधून राजानाला डावा कालवा मधील पाणी 21 गावे वापरत असतात.तर राजनाला उजवा कालवा सात गावे तर पाली पोटल कालवा असे एकूण 2542 हेक्टर जमीन ओलिताखाली येत आहे.

भाताची शेती यावेळी पूर्ण बहरली नाही, शेतीचे नुकसान झाले

जलविद्युत केंद्रातुन उपलब्ध अवजलापैकी 42.330 द.ल.घ.मी. अवजल राजनाला सिंचन समूह मंजुर असुन सदर अवजल बंधाऱ्या द्वारे सोडले जाते.ते पाणी पुढे राजनाला डावा कालवा, राजनाला उजवा कालवा आणि पालीपोटल कालव्यात वळविले जाते.हे पाणी कर्जत तालुक्यातील ४० गावामध्ये दुबार शेती करण्यासाठी महत्त्वाचे ठरत असते.२०२५ मध्ये संपूर्ण मे महिन्यात पाऊस झाल्याने भाताची पिके शेतात भिजून खराब झाली.त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आला होता,तर यावर्षी पावसाळ्यात पाऊस कमी झाल्याने भाताची शेती यावेळी पूर्ण बहरली नाही आणि भाताच्या शेतीचे नुकसान झाले.

Maharashtr Tourism: महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी दिशा; विभागाचा सह्याद्री फार्म्स अन् टाटा स्ट्राइव्हसोबत करार

पाणी सोडण्याच्या हालचाली पाटबंधारे विभागाने सुरू केल्या

त्यामुळे यावर्षी कर्जत तालुका दुष्काळ ग्रस्त म्हणून शासनाने जाहीर केला आहे.परिणामी यावर्षी उन्हाळ्यातील भाताची शेती चांगल्या पद्धतीने करता यावी म्हणून राजनाला कालवा परिसरात शेती साठी लवकर पाणी सोडण्याच्या हालचाली पाटबंधारे विभागाने सुरू केल्या आहेत.त्या दृष्टीने मशिनरी वापरून नालेसफाई सुरू करण्यात आली असून पाटबंधारे विभाग यांच्याकडून कालव्यांची तसेच पोट कालव्यांची आणि नाल्यांची स्वच्छता केली जात आहे.

उर्वरीत सर्व अवजल हे उल्हास नदीत सोडले जात असून हे पाणी नळपाणी योजना यांच्यासाठी पिण्याची पाण्याची तहान भागवण्याचे काम करते.ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे, मिरा-भाईंदर,भिवंडी- निजामपूर या महानगर तसेच अंबरनाथ आणि बदलापूर या नगरपालिका पिण्यासाठी तसेच औद्योगिक कारणासाठी वापर करतात. राजनाला सिंचन समुहाची प्रकल्पिय सिंचन क्षमता 2542 हे असुन निर्मित सिंचन क्षमता 2362 हेक्टर एवढी आहे.

खरीप हंगाम पावसाच्या अनियमितता यामुळे फुकट गेला आहे, त्यात शेतकरी संकटात असून उन्हाळ्यात शेती होत असलेल्या ठिकाणी डिसेंबर महिन्यात कालव्यांना पाणी सोडल्यास शेती वेळेत करता येईल आणि शेतकऱ्याला दिलासा मिळेल. प्रामुख्याने राजनाला आता कालव्यांच्या दुरुस्तीची कामे नोव्हेंबर महिन्यात पूर्ण करून शेती साठी डिसेंबर महिन्याचे पहिल्या आठवड्यात पाणी सोडावे.असे माजी आमदार सुरेश लाड म्हणाले.

Kolhapur News: ‘जनता कधीही माफ करणार नाही…’ गोकुळच्या सत्तासंघर्षावरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांना थेट इशारा

 

Web Title: Karjat rajnala canal repair water release december farmers sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 09:34 PM

Topics:  

  • Crop damage
  • Farmer Crisis

संबंधित बातम्या

Sambhajinagar Farmer Relief : दिवाळीपूर्वी २.३९ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत ५,००० रुपयांची आगाऊ मदत जमा
1

Sambhajinagar Farmer Relief : दिवाळीपूर्वी २.३९ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत ५,००० रुपयांची आगाऊ मदत जमा

Rabi season water schedule 2026 : शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ! रब्बीला दोन, उन्हाळ्यात एक आवर्तन
2

Rabi season water schedule 2026 : शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ! रब्बीला दोन, उन्हाळ्यात एक आवर्तन

Tur Crop: तुरीवर घाटे अळीचा प्रादुर्भाव; फुलोरा अवस्थेतील पिकाची काळजी घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन
3

Tur Crop: तुरीवर घाटे अळीचा प्रादुर्भाव; फुलोरा अवस्थेतील पिकाची काळजी घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Washim News: KYC पूर्ण, यादीतही नाव; तरी शेतकरी कर्जमाफीपासून वंचित,  शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
4

Washim News: KYC पूर्ण, यादीतही नाव; तरी शेतकरी कर्जमाफीपासून वंचित, शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.