Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रदूषणाच्या तक्रारीवरून १० टायर पायरोलिसिस उद्योग बंद, पंकजा मुंडेंची घोषणा

वडवली ग्रामपंचायत हद्दीतील टायर पायरोलिसिस उद्योगामुळे प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारींच्या अनुषंगाने १० उद्योगांना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 05, 2025 | 03:30 AM
प्रदूषणाच्या तक्रारीवरून १० टायर पायरोलिसिस उद्योग बंद, पंकजा मुंडेंची घोषणा

प्रदूषणाच्या तक्रारीवरून १० टायर पायरोलिसिस उद्योग बंद, पंकजा मुंडेंची घोषणा

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील वडवली ग्रामपंचायत हद्दीतील टायर पायरोलिसिस उद्योगामुळे प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारींच्या अनुषंगाने १० उद्योगांना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यातील ८ उद्योग बंद आहेत. अन्य दोनपैकी एका उद्योगात भीषण आग लागल्यामुळे तो बंद आहे, तर दुसऱ्या उद्योगाला अंतरिम नोटीस देण्यात आली असून त्यांच्याकडून माहिती मागवली आहे. त्याआधारे पुढील कारवाई होणार आहे, अशी माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत दिली.

 जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटदारांचा एल्गार; राज्य सरकारविरोधात ठेकेदारांचं छत्री आंदोलन

महाराष्ट्र विधानपरिषदेत टायर पायरोलिसिस उद्योगांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात सदस्य प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सविस्तर खुलासा केला. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, संबंधित उद्योगांना बंद करण्याचे निर्देश असतानाही सुरू असल्याचे आढळले, तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल. तसेच संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाईल. यासाठी अचानक तपासणी, वीज पुरवठा बंद करणे, या सर्व पर्यायांचा विचार केला जाणार आहे. हे बंद झालेले उद्योग पुन्हा सुरू असतील तर तो अक्षम्य गुन्हा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

रोगांचे नेमके कारण वेगळे असू शकते यात धूम्रपान, व्यसनाधीनता, इतर आरोग्यविषयक बाबीचाही समावेश असतो. त्यामुळे प्रदूषण आणि प्रत्येक मृत्यूचा थेट संबंध जोडणे योग्य ठरणार नाही. मात्र प्रदूषणाच्या तक्रारी असल्यास योग्य कारवाई नक्की केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पायरोलिसिस रिॲक्टरमध्ये लागलेल्या आगीत दोन महिला कामगार आणि दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू अत्यंत गंभीर बाब असून संबंधित कारखान्याच्या परवानगीसंदर्भात चौकशी केली जाईल. सुरक्षा यंत्रणा नसल्याने ही घटना घडली असेल, तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कारखान्यामुळे प्रदूषण होऊन हवेची गुणवत्ता कमी होत असताना पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करणे गरजेचे आहे. यात विभागाच्या अधिकाऱ्यांनी किंवा संबंधितांनी अक्षम्य दुर्लक्ष केले असेल, तर त्यांना संरक्षण दिले जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. पर्यावरण विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या समुपदेशनाने केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदेंकडून ‘जय गुजरात’ची घोषणा अन् फडणवीसांनी दिला पवारांचा दाखला; म्हणाले, “त्यांच कर्नाटकवर जास्त प्रेम…”

Web Title: Pankaja munde on 10 tire pyrolysis industries shut down due to complaints about pollution

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 03:30 AM

Topics:  

  • maharashtra
  • Pankaja Munde

संबंधित बातम्या

शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या भत्त्यात वाढ, तर शेतकरी भवन योजनेलाही…
1

शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या भत्त्यात वाढ, तर शेतकरी भवन योजनेलाही…

Maharashtra Advocate General Resign : राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात दिली माहिती
2

Maharashtra Advocate General Resign : राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात दिली माहिती

Eknath Shinde : पुरामुळे अडकले 40 जण, एअरलिफ्ट करून सुरक्षितस्थळी हलविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
3

Eknath Shinde : पुरामुळे अडकले 40 जण, एअरलिफ्ट करून सुरक्षितस्थळी हलविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

Acharya Devvrat : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी घेतली शपथ, कोण आहेत आचार्य देवव्रत? वाचा सविस्तर?
4

Acharya Devvrat : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी घेतली शपथ, कोण आहेत आचार्य देवव्रत? वाचा सविस्तर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.