सांगली बाजार समितीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी जिल्हा उपनिबंधकाची नियुक्ती

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतील झालेल्या जमीन खरेदी नोकर भरती, गाळे वाटप व जागा विक्री या संदर्भात चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पणन संचालक सतीश सोनी पुणे यांनी जिल्हा उपनिबंधक सांगली यांना भ्रष्टाचाराबाबत चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेश दिले असल्याची माहिती सरपंच अनिल शेगुणशे यांनी दिली.

    सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या भ्रष्टाचाराबाबत पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे कानडवाडीचे सरपंच अनिल शेगुणशे यांनी अपिल केले होते. मंत्री पाटील यांनी पणन संचालक पुणे यांना सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतील झालेल्या जमीन खरेदी नोकर भरती, गाळे वाटप व जागा विक्री या संदर्भात चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पणन संचालक सतीश सोनी पुणे यांनी जिल्हा उपनिबंधक सांगली यांना भ्रष्टाचाराबाबत चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेश दिले असल्याची माहिती सरपंच अनिल शेगुणशे यांनी दिली.

    विष्णु आण्णा फळभाजीपाला मार्केटमधील ओपन स्पेसमधील जागेमध्ये गाळे बांधून महापालिकेची नोटीस असताना जे दुकान गाळे विक्री करून ऑनमनी घेऊन भ्रष्टाचार केलेला आहे. तसेच फळभाजीपाला मार्केट कमिटीमधील क्लार्क यांनीही जमविलेल्या मालमत्तेची चौकशी करावी.

    - अनिल शेगुणशे