Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाटण शहरातील अतिक्रमणांवर कारवाई न केल्यास आंदोलन करू, सामाजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ यांचा इशारा

पाटण शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांबाबत नगरपंचायत प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ यांनी केली आहे. तक्रारींची दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

  • By विवेक
Updated On: Jun 14, 2026 | 09:02 PM
पाटण शहरातील अतिक्रमणांवर कारवाई न केल्यास आंदोलन करू, सामाजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ यांचा इशारा

पाटण शहरातील अतिक्रमणांवर कारवाई न केल्यास आंदोलन करू, सामाजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ यांचा इशारा

Follow Us
Follow Us:

पाटण : पाटण शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या बांधकामांची नगरपंचायत प्रशासनाने अधिकृत नोंद घ्यावी. तसेच गावठाण परिसरातील अतिक्रमणांच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ यांनी दिला.

पाटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पिसाळ म्हणाले, पाटण शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्याने गावठाण हद्दीत अनेक ठिकाणी नवीन घरे, व्यावसायिक इमारती आणि इतर बांधकामे उभी राहत आहेत. अनेकांनी बांधकाम परवाने न घेताच इमारती उभ्या केल्या आहेत. तसेच जुन्या बांधकामावर वाढीव बांधकामेही करण्यात आली आहेत. मात्र या बांधकामांची आवश्यक नोंद अद्याप नगरपंचायतीत पूर्णपणे झाली नसल्याची तक्रार आहे.

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटात बंडाचे पडसाद; भाजपला साथ देणाऱ्या तीन आमदारांवर मोठी कारवाई

नोंद करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना भरमसाठ आर्थिक मागणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नोंदी रखडत असून भविष्यात मालमत्ता नोंदणी, कर आकारणी तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. याशिवाय काही ठिकाणी सार्वजनिक जागा, रस्ते व शासकीय जमिनींवर अतिक्रमण झाल्याच्या तक्रारी संबंधित प्रशासनाकडे दाखल करण्यात आल्या आहेत. या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून अतिक्रमण सिद्ध झाल्यास नियमानुसार कारवाई करावी. महसूल विभाग, नगरपंचायत आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्त सर्वेक्षण करून गावठाण विस्ताराची अद्ययावत नोंद करावी, अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांबाबत आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी नियमित तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी पिसाळ यांनी केली आहे.

या अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये काही विद्यमान नगरसेवक, बड्या व्यक्तींचा समावेश असल्याने कारवाई करण्यात दिरंगाई केली जात असल्याचा आरोप करून पिसाळ यांनी तातडीने कारवाई करावी अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला आहे.

कर्जमाफीच्या नियमांमध्ये बदल होणार? रोहित पवारांच्या आंदोलनादरम्यान सरकारकडून मोठे संकेत 

Web Title: Patan encroachment action demand nitin pisal warning protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 09:02 PM

Topics:  

  • Patan News
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara ZP Education Officer: सातारा जिल्हा परिषदेत खळबळ! शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे राज्य शासनाकडून निलंबित
1

Satara ZP Education Officer: सातारा जिल्हा परिषदेत खळबळ! शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे राज्य शासनाकडून निलंबित

Satara Voter Registration Camp 2026: सातारकरांसाठी महत्त्वाची बातमी! १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिर
2

Satara Voter Registration Camp 2026: सातारकरांसाठी महत्त्वाची बातमी! १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिर

पाटण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; डॉ. दादासाहेब सुभेदार मगर यांना पीएच.डी. पदवी प्रदान
3

पाटण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; डॉ. दादासाहेब सुभेदार मगर यांना पीएच.डी. पदवी प्रदान

Satara : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया गरजेची, शिवेंद्रसिंहराजेंचं जरांगेंना आवाहन
4

Satara : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया गरजेची, शिवेंद्रसिंहराजेंचं जरांगेंना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.