Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCMC Approved corporators : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर; तब्बल नऊ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर घोषणा

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांचा नऊ महिन्यांपासून रखडलेला तिढा अखेर सुटला आहे. भाजपच्या सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन अशा एकूण १० स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 20, 2026 | 06:42 PM
Names of nominated corporators for the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) announced

Names of nominated corporators for the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) announced

Follow Us
Follow Us:
  • पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर
  • भाजपचे सात, तर राष्ट्रवादीच्या तिघांना नगरसेवकपदी संधी
  • महापौर रवी लांडगे यांनी आज पत्रकार परिषदेत नावांची अधिकृत घोषणा
PCMC Approved corporators : पिंपरी : तब्बल नऊ महिन्यांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांचा तिढा अखेर सुटला आहे. संख्याबळानुसार सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे सात, तर विरोधी बाकावरील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे तीन असे एकूण दहा स्वीकृत नगरसेवक निश्चित झाले आहेत. महापौर रवी लांडगे यांनी आज पत्रकार परिषदेत या नावांची अधिकृत घोषणा केली. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर प्रशासनामार्फत हा प्रस्ताव आगामी सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवला जाणार असून, या नव्या सदस्यांना सव्वा वर्षांचा (१५ महिने) कार्यकाळ मिळणार आहे.

भाजपकडून विधानसभा मतदारसंघनिहाय समतोल

भाजपने आपल्या सात जागांचे वाटप करताना तिन्ही विधानसभा मतदारसंघांना प्रतिनिधित्व दिले आहे. यामध्ये चिंचवड मतदारसंघातून सर्वाधिक तीन, तर पिंपरी आणि भोसरी मतदारसंघातून प्रत्येकी दोन जणांना संधी देण्यात आली आहे:

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून जयनाथ काटे, सचिन साठे आणि विशाल कलाटे यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. तर भोसरी विधानसभा मतदारसंघातून ऋषिकेश म्हेत्रे आणि कुलदीप परांडे यांना संधी देण्यात आली आहे. तसेच पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राजेश पिल्ले, कुणाल लांडगे यांना स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आले आहे. तर राष्ट्रवादीकडून तिन्ही मतदारसंघांत अनुभवी चेहऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.

PM Modi Baramati Visit Cancel : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा रद्द, पण कारण काय? शरद पवार स्वतः करणार उद्घाटन

राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघांतून प्रत्येकी एका अनुभवी नेत्याला सभागृहात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भोसरीतील सीमा सावळे, चिंचवडमधील राजेंद्र जगताप आणि पिंपरीतून  फजल शेख यांना संधी देण्यात आली आहे.

मार्चपासून रखडला होता प्रस्ताव

महापालिकेत निवडून आलेल्या १२८ नगरसेवकांमध्ये भाजपचे ८४, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३७, शिवसेनेचे (शिंदे गट) ६ आणि १ अपक्ष असे संख्याबळ आहे. यानुसार भाजपच्या वाट्याला ७ आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला ३ स्वीकृत नगरसेवक आले आहेत. प्रशासनाने मार्च महिन्यातच ही प्रक्रिया सुरू केली होती. त्यावेळी राष्ट्रवादीने वेळेत तीन अर्ज दाखल केले, मात्र भाजपकडून नावे निश्चित न झाल्याने मुदतवाढ मागण्यात आली. पुढे तीन महिने हा विषय तहकूब राहिल्याने जूनमध्ये प्रस्ताव दफ्तरी दाखल झाला. ऑगस्टमध्ये पुन्हा प्रस्ताव आल्यानंतर सभा तहकूब झाली आणि त्यानंतर विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया लांबली. या राजकीय आणि तांत्रिक अडथळ्यांमुळे स्वीकृत नगरसेवकांचा तब्बल नऊ महिन्यांचा कालावधी वाया गेला आहे.

Yogi Adityanath mother passed away : CM योगी आदित्यनाथ यांच्या आईचे उत्तराखंडमध्ये निधन; भाषण सुरू असताना मिळाला निरोप

स्वीकृत नगरसेवकांचे अधिकार काय असतात?

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रशासन, कायदा, वैद्यकीय, अभियांत्रिकी, शिक्षण किंवा समाजसेवा क्षेत्रातील तज्ज्ञांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड होणे अपेक्षित असते (प्रत्यक्षात राजकीय पक्षांकडून कार्यकर्त्यांनाच संधी दिली जाते). हे सदस्य थेट जनतेतून निवडून आलेले नसतात. त्यांना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहराचे प्रश्न व मुद्दे मांडण्याचा, तसेच नियमानुसार भत्ते मिळवण्याचा अधिकार असतो; मात्र सभागृहातील कोणत्याही मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचा अधिकार नसतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पिंपरी-चिंचवड महापालिकेत किती स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर झाली?

    Ans: एकूण १० स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर झाली आहेत.

  • Que: भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला किती स्वीकृत नगरसेवकपदे मिळाली?

    Ans: भाजपला ७, तर राष्ट्रवादी काँग्रेसला ३ स्वीकृत नगरसेवकपदे मिळाली आहेत.

  • Que: स्वीकृत नगरसेवकांना मतदानाचा अधिकार असतो का?

    Ans: स्वीकृत नगरसेवकांना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील प्रश्न मांडता येतात; मात्र सभागृहातील मतदान प्रक्रियेत सहभागी होता येत नाही.

Web Title: Pcmc approved corporators names anncounced ny mayor ravi landge pimpri chinchwad political news nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 06:42 PM

Topics:  

  • NCP News
  • PCMC Political News
  • political news

संबंधित बातम्या

Eknath Shinde Ashwini Vaishnav :एकनाथ शिंदेंचा एक फोन अन् कारवाईला ब्रेक; थेट केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी केला संवाद
1

Eknath Shinde Ashwini Vaishnav :एकनाथ शिंदेंचा एक फोन अन् कारवाईला ब्रेक; थेट केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी केला संवाद

Yogi Adityanath mother passed away : CM योगी आदित्यनाथ यांच्या आईचे उत्तराखंडमध्ये निधन; भाषण सुरू असताना मिळाला निरोप
2

Yogi Adityanath mother passed away : CM योगी आदित्यनाथ यांच्या आईचे उत्तराखंडमध्ये निधन; भाषण सुरू असताना मिळाला निरोप

Sushma Andhare : ‘शिंदेंसाठी बाळासाहेब ठाकरे फक्त पॉलिटिकल कार्ड’; सुषमा अंधारेंचा शिंदे गटावर घणाघात
3

Sushma Andhare : ‘शिंदेंसाठी बाळासाहेब ठाकरे फक्त पॉलिटिकल कार्ड’; सुषमा अंधारेंचा शिंदे गटावर घणाघात

सातबारा, फेरफारसाठी नागरिकांचे हेलपाटे; इंदापूर तहसीलदारांच्या कारभाराविरोधात होणार सर्वपक्षीय आंदोलन
4

सातबारा, फेरफारसाठी नागरिकांचे हेलपाटे; इंदापूर तहसीलदारांच्या कारभाराविरोधात होणार सर्वपक्षीय आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.