Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCMC Water Update: पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी महापालिकेने कसली कंबर, नवे वेळापत्रक जाहीर

नव्या नियोजनानुसार संबंधित भागातील लोकसंख्या, जलवाहिन्यांची क्षमता, उंच-सखल भूभाग, पाण्याचा दाब आणि वितरण व्यवस्था लक्षात घेऊन प्रत्येक क्षेत्रासाठी स्वतंत्र वेळ निश्चित करण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 28, 2026 | 02:35 AM
PCMC Water Update: पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी महापालिकेने कसली कंबर, नवे वेळापत्रक जाहीर

PCMC Water Update: पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी महापालिकेने कसली कंबर, नवे वेळापत्रक जाहीर

Follow Us
Follow Us:

पवना आणि आंद्रा धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी
मान्सूनचे आगमनही लांबले 
पाणीपुरवठ्याचे नवीन वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय

पिंपरी: पवना आणि आंद्रा धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असतानाच, यंदा मान्सूनचे आगमनही लांबले आहे. याचा थेट फटका शहराच्या पाणीपुरवठ्याला बसला असून, पाणीपुरवठा नियोजनबद्ध आणि संतुलित करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार, उद्यापासून (रविवार, ता. २८) शहरात पाणीपुरवठ्याचे नवीन वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या नव्या नियोजनानुसार शहरातील विविध भागांना किमान एक तास ते कमाल तीन तास पाणीपुरवठा केला जाणार आहे.

महापालिकेचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी यासंदर्भातील माहिती दिली. सध्या शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, पाऊस लांबल्यामुळे उपलब्ध जलसाठ्यावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. त्यातच पाटबंधारे विभागाकडून पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्यात आली असल्याने, शहरातील अनेक भागांत कमी दाबाने आणि कमी वेळ पाणी मिळत असल्याच्या तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर महापालिकेने वितरण व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेऊन क्षेत्रनिहाय वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांसाठी स्वतंत्र वेळापत्रक तयार करण्यात आले असून, ते नागरिकांसाठी प्रसिद्ध केले जाणार आहे.

काही भागांत पाणीपुरवठ्याची वेळ वाढणार
नव्या नियोजनानुसार संबंधित भागातील लोकसंख्या, जलवाहिन्यांची क्षमता, उंच-सखल भूभाग, पाण्याचा दाब आणि वितरण व्यवस्था लक्षात घेऊन प्रत्येक क्षेत्रासाठी स्वतंत्र वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे काही भागांमध्ये पाणीपुरवठ्याची वेळ वाढणार असून, काही भागांमध्ये केवळ वेळेत बदल होणार आहे.

“शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेता उपलब्ध जलस्रोतांवर ताण वाढत आहे. त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरणे आवश्यक आहे. नागरिकांनी पाण्याचा पुनर्वापर करण्यास प्राधान्य द्यावे आणि पाणी बचतीच्या उपक्रमांना सहकार्य करावे. मोठी वाणिज्यिक संकुले, गृहनिर्माण संस्था व नागरिकांनी पावसाच्या पाण्याचे संकलन आणि साठवणुकीवर भर द्यावा.”
— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, महापालिका

क्षेत्रीय कार्यालयनिहाय स्वतंत्र वेळापत्रक: सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत येणाऱ्या भागांसाठी स्वतंत्र वेळ निश्चित.
उद्यापासून (२८ जून) लागू: रविवारपासून शहरात नव्या वेळापत्रकानुसार पाणी वितरण होणार.
१ ते ३ तास पुरवठा: भागाच्या रचनेनुसार किमान एक तास, तर कमाल तीन तास पाणी मिळणार.
नागरिकांना आवाहन: नागरिकांनी आपल्या भागातील पाणी येण्याची वेळ तपासून घेऊन पाण्याचा पुरेसा साठा करावा.

Web Title: Pcmc corporation announced new time table for water supply pawna and andra dam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • PCMC News
  • Water Crisis
  • Water supply

संबंधित बातम्या

Moshi Garbage Depot Accident: मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगाराच्या पत्नीने घेतले टोकाचे पाऊल
1

Moshi Garbage Depot Accident: मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगाराच्या पत्नीने घेतले टोकाचे पाऊल

मोशी दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 55 लाखांची मदत; नोकरी, मोफत शिक्षण अन्…
2

मोशी दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 55 लाखांची मदत; नोकरी, मोफत शिक्षण अन्…

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती
3

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती

पिंपरी-चिंचवडमधील खड्डे 48 तासांत बुजवा, कामचुकारपणा केल्यास…; आयुक्तांचे महापालिका अधिकाऱ्यांना कडक निर्देश
4

पिंपरी-चिंचवडमधील खड्डे 48 तासांत बुजवा, कामचुकारपणा केल्यास…; आयुक्तांचे महापालिका अधिकाऱ्यांना कडक निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.