Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCMC News: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी रवी लांडगे यांची बिनविरोध निवड

सर्वसाधारण सभेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर तसेच सभागृह नेते प्रशांत शितोळे यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले

  • By anuradha sagar
Updated On: Feb 07, 2026 | 11:05 AM
PCMC News: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी रवी लांडगे यांची बिनविरोध निवड
Follow Us
Follow Us:
  • PCMCच्या महापौर व उपमहापौर पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया
  • रवि लक्ष्मण लांडगे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांची महापौर पदासाठी बिनविरोध निवड
  • वैशाली काळभोर यांनी अर्ज माघारी घेतल्याने शर्मिला बाबर यांची बिनविरोध उपमहापौर पदी निवड
PCMC News: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. यासाठी विशेष सभा पिठासीन अधिकारी तथा सहकार आयुक्त दिपक तावरे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. यावेळी महापौर पदासाठी भारतीय जनता पक्षाचे रवि लक्ष्मण लांडगे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांची महापौर पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली.

तर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वैशाली जालिंदर काळभोर आणि भारतीय जनता पक्षाच्या शर्मिला राजू बाबर यांचा प्रत्येकी १ असे एकूण २ अर्ज प्राप्त झाले होते. यावेळी अर्ज माघारीसाठी देण्यात आलेल्या विहीत वेळेत वैशाली काळभोर यांनी अर्ज माघारी घेतल्याने शर्मिला बाबर यांची बिनविरोध उपमहापौर पदी निवड करण्यात आली. तसेच सभागृह नेतेपदी प्रशांत शितोळे आणि विरोधी पक्षनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Google Doodle Today: क्रिकेट प्रेमींसाठी गुगलचे खास सरप्राईज! T20 World Cup निमित्त सादर केले स्पेशल

पिठासीन अधिकारी दिपक तावरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेची विशेष सभा आज पार पडली. नगरसचिव मुकेश कोळप यांनी सुरूवातीस सभेच्या कामकाजाबाबत माहिती दिली. त्यानंतर महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण

यावेळी सर्वसाधारण सभेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर तसेच सभागृह नेते प्रशांत शितोळे यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर नगरसदस्य शत्रुघ्न काटे यांनी महापालिकेची सर्वसाधारण सभा २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत स्थगित करण्याबाबत सूचना मांडली. या सूचनेला नगरसदस्य राजू मिसाळ यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर महापौर रवि लांडगे यांनी सर्वसाधारण सभा २० फेब्रुवारी २०२६, दुपारी १ वाजेपर्यंत तहकूब केली.

Mumbai Crime: मालाडमध्ये शाळेत धक्कादायक प्रकार; शिपायाकडून 5 वर्षीय चिमुकलीशी गैरवर्तन, दोघांवर गुन्हा

अण्णासाहेब मगर यांना अभिवादन

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील प्रांगणात असलेल्या दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास महापौर रवि लांडगे व उपमहापौर शर्मिला बाबर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शहरातील विविध ठिकाणी असणाऱ्या महापुरूषांच्या पुतळ्यांस देखील त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

Web Title: Pcmc news ravi landge has been elected unopposed as the mayor of pimpri chinchwad municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 11:05 AM

Topics:  

  • Marathi News
  • PCMC News
  • Pune Politics

संबंधित बातम्या

FSSAI Action On Pan Masala : पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! FSSAI कडून ‘या’ गोष्टीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई
1

FSSAI Action On Pan Masala : पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! FSSAI कडून ‘या’ गोष्टीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!
2

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!

Plastic Currency : प्लास्टिकच्या 1 अब्ज नोटा बनणार… RBI चा मोठा निर्णय, 10 आणि 20 रुपयांच्या ट्रायल करंन्सीला मंजुरी
3

Plastic Currency : प्लास्टिकच्या 1 अब्ज नोटा बनणार… RBI चा मोठा निर्णय, 10 आणि 20 रुपयांच्या ट्रायल करंन्सीला मंजुरी

Tumbadchi Manjula: तुंबाडची मंजुळामधील गोंधळाला रंगत आणणारी ५ पात्रे
4

Tumbadchi Manjula: तुंबाडची मंजुळामधील गोंधळाला रंगत आणणारी ५ पात्रे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.