Google Doodle Today: क्रिकेट प्रेमींसाठी गुगलचे खास सरप्राईज! T20 World Cup निमित्त सादर केले स्पेशल डूडल, तुम्ही पाहिलं का?
Free Fire Max: प्लेअर्सना फ्री मिळणार 1600 गोल्ड! क्लेम करण्यासाठी फॉलो कराव्या लागतील या स्टेप्स
आयसीसी पुरुष टी20 वर्ल्ड कप 2026 निमित्त आज 7 फेब्रुवारी रोजी गूगलने एक विशेष इंटरएक्टिव डूडल आणि ऐतिहासिक एआई पार्टनरशिपची घोषणा केली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या जाणाऱ्या या टी20 वर्ल्ड कपची सुरुवात मुंबईत एका भव्य आणि स्टार-स्टड उद्घाटन समारंभाने होईल. (फोटो सौजन्य – Pinterest)
यावेळी टी20 वर्ल्ड कपमध्ये तंत्रज्ञानाची एक महत्त्वपूर्ण भुमिका असणार आहे. गूगलचे जेमिनी मंच अधिकृतपणे “एआई फॅन कंपेनियन” च्या रुपात सादर करण्यात आले आहे. ज्यामुळे प्रेक्षकांमा क्रिकेटमधील नियमांची सोप्या शब्दांत माहिती मिळणार आहे. तसेच “क्रेझी फॅन” अवतार स्पर्धा सारखे आकर्षक अनुभव देखील प्रेक्षकांना मिळणार आहेत. चाहते स्वत:चे डिजिटल अवतार तयार करून टी20 वर्ल्ड कपच्या जल्लोषात सहभागी होऊ शकणार आहेत.
एवढंच नाही तर यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये चाहत्यांना आणखी एक खास सरप्राईज मिळणार आहे. हे खास सरप्राईज म्हणजे गूगल पिक्सेल. या ऐतिहासिक क्षणी गूगल पिक्सेलची अधिकृत स्मार्टफोन पार्टनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी गुगल पिक्सेल स्टेडियमच्या आतील बाजूचे खास आणि अनोखे दृश्ये प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम करणार आहे. मॅचमधील उत्साहापूर्ण क्षणांपासून पडद्यामागील कृतींपर्यंत, पिक्सेल क्रिकेटप्रेमींपर्यंत सर्व दृश्ये अगदी सहज पोहोचवणार आहे. यामुळे चाहत्यांना यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये अत्यंत वेगळा अनुभव मिळणार आहे.
गुगल प्रत्येक खेळानिमित्त एक विशेष डूडल सादर करत असते. यामुळे लोकांपर्यंत विविध खेळांची माहिती पोहोचते. तसेच संबंधित खेळ कसा खेळला जातो, कोणत्या देशात खेळला जातो, याबाबत जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये उत्सुकता निर्माण होते.






