शिरोली औद्योगिक वसाहतीतील शिये बावडा रोडवरील घटना (Accident_Kolhapur)
शिरोली : भरधाव कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत या पादचारी वृद्धाची ओळख पटली नव्हती. शिये-कसबा बावडा मार्गावर श्री रामनगर, शिये येथील आयओएन डिजिटल झोन या परीक्षा केंद्रासमोर शनिवारी (दि.27) सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर ही मोटार रस्त्याकडेला असणाऱ्या विजेच्या खांबावर जोरात आदळली.
रस्ते विकासातील विजेच्या खांबांचा अडथळा अद्यापही कायम असल्याने नागरिकांतून असंतोष व्यक्त होत होता. याबाबत घटनास्थळी व पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, हरीष एकनाथ शिंदे (ता. निफड, जि. नाशिक) हे आपली इर्टिगा मोटार कारने कोल्हापूरला महालक्ष्मी दर्शनासाठी कुटुंबासोबत निघाले होते. शिये-कसबा बावडा मार्गावर श्री रामनगर येथे अनोळखी व्यक्ती रस्ता रस्ता ओलांडत होते. त्यामुळे शिंदे यांनी आपली कार त्यांच्या पाठीमागून घेतली. मात्र, अनोळखी व्यक्ती रस्ता ओलांडत असताना अचानक पाठीमागे सरकला. त्यामुळे शिंदे यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी पादचाऱ्यास धडकली.
हेदेखील वाचा : देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांचा भीषण अपघात; अपघातात एकाच मृत्यू तर…
त्यानंतर कार रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन विजेच्या खांबावर आदळली. यामध्ये अनोळखी पादचारीचा जागीच मृत्यू झाला. रुग्णवाहिकेतून त्यांना कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. उशिरापर्यंत त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. या अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे.
अपघाताच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ
अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडल्याची घटना यापूर्वी समोर आली. यात देवदर्शनासाठी जात असताना भरधाव फॉर्च्युनर कारने ट्रकला मागून जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. नागपूरवरून शनी शिंगणापूर येथे दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला.






