accident(फोटो सौजन्य - pinterest)
अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अपघात कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. यात देव- दर्शनासाठी जात असतांना भरधाव फॉर्च्यूनर कारने ट्रकला मागून जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. नागपूरवरून शनी शिंगणापूर येथे दर्शनासाठी जात असतानां हा अपघात घडला. वाशीम नजीकच्या हद्दीत लोकेशन २०७ वर हा अपघात झाला आहे.
खाजगी बसचा मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; 8 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, 3 गंभीर
पुढे आलेल्या माहितीनुसार, नागपूरवरून शनी शिंगणापूरला दर्शनासाठी जात असतांना वेगात असलेल्या फॉर्च्यूनर कारने चालत्या ट्रकला मागून धडक दिलीय. ही धडक इतकी भीषण होती की एक जण जागीच ठार झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. हे तिघे नागपूर येथील असल्याची माहिती पुढे आली आहे. तर जखमींना कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
खाजगी बसचा मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात
मुंबई: दिवसेंदिवस अपघाताच्या घटना समोर येत आहे. आता मुंबईच्या भिवंडी शहरातून भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मुंबई- नाशिक महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका ८ वर्षीय चिमुकलीने आपला जीव गमावला आहे. तर ३ जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. १० ते १२ जण या अपघातात जखमी झाले आहे. हा अपघात मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा या गावाजवळ घडला आहे.अपघातात जखमी झालेल्यांवर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरु केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
भरधाव कारने एकाच कुटुंबातील सदस्यांना चिरडलं, दोघांचा मृत्यू तर पाच जण जखमी….