Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladki Bahin Yojna: खात्यात ३००० रुपये जमा होणार? पण ‘या’ त्रुटी असल्यास लाभापासून मुकणार; लाडक्या बहिणींनो, तातडीने करा ‘हे’ काम

नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला अनेक महिलांच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे थकीत पैसे एकत्रितपणे ३००० रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 27, 2026 | 09:28 AM
Ladki Bahin Yojna, Maharashtra Government, eKYC, Aadhaar Link Breaking News,

Ladki Bahin Yojna, Maharashtra Government, eKYC, Aadhaar Link Breaking News,

Follow Us
Follow Us:
  • राज्यातील सुमारे २६ लाख लाभार्थी महिलांनी अजूनही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही
  • अनेक महिलांच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे थकीत पैसे एकत्रितपणे ३००० रुपये जमा होण्याची शक्यता
  • लाभार्थींनी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे एप्रिलनंतर लाखो महिला या योजनेतून अपात्र ठरण्याची शक्यता
Ladki Bahin Yojna: राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. योजनेअंतर्गत 2 कोटी 47 लाखांहून अधिक महिला लाभार्थी असल्या तरी तब्बल 26 लाखांहून अधिक महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. या योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी (e-KYC) पूर्ण केलेले नाही, त्यांच्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक उरले आहेत.

३० एप्रिल २०२६ ही शेवटची मुदत

राज्यातील सुमारे २६ लाख लाभार्थी महिलांनी अजूनही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. या महिलासांठी सरकारने ३० एप्रिल २०२६ ही अंतिम मुदत दिली आहे. जर या मुदतीत ई-केवायसी पूर्ण झाले नाही, तर या महिलांना योजनेचे पुढील हफ्ते बंद होऊ शकतात किंवा त्या कायमच्या अपात्र ठरू शकतात.

३००० रुपये खात्यात जमा होणार?

नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला अनेक महिलांच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे थकीत पैसे एकत्रितपणे ३००० रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, या लाभासाठी ई-केवायसी आणि बँक खाते आधारशी लिंक असणे अनिवार्य आहे. ज्या महिलांच्या अर्जात काही तांत्रिक त्रुटी आहेत, त्यांनाही ही दुरुस्ती करण्याची ही शेवटची संधी आहे.

काय करावे लागेल?

महिलांनी अधिकृत पोर्टल किंवा ‘नारी शक्ती दूत’ ॲपवर जाऊन आपले ई-केवायसी स्टेटस तपासावे.

बँक खाते आधार कार्डशी लिंक असल्याची खात्री करावी.

काही त्रुटी असल्यास जवळच्या सेतू केंद्रात किंवा अंगणवाडी सेविकांच्या मदतीने ३० एप्रिलपूर्वी दुरुस्ती करून घ्यावी.

वेळेत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाडक्या बहिणींच्या खात्यात येणारे १५०० रुपये कायमचे बंद होऊ शकतात, अशी शक्यता महिला व बालविकास विभागाने व्यक्त केली आहे.

महिला व बाल विकास विभागाने यासाठी मुदत तीन वेळा वाढवली होती. मात्र, आता 30 एप्रिल 2026 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असून, त्यानंतर ई-केवायसी पूर्ण न केलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सध्या (27 एप्रिलपर्यंत) अंतिम मुदतीसाठी अवघे चार दिवस शिल्लक असूनही मोठ्या संख्येने लाभार्थींनी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे एप्रिलनंतर लाखो महिला या योजनेतून अपात्र ठरण्याची शक्यता महिला व बाल विकास विभागाने व्यक्त केली आहे.

शेवटची संधी; तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

30 एप्रिल रोजी बँक बंद होईपर्यंत ई-केवायसी पडताळणीची प्रक्रिया सुरू राहणार आहे. या कालावधीत प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित 26 लाख महिलांना कायमस्वरूपी योजनेतून वगळले जाऊ शकते.

यामुळे ज्या लाभार्थींनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही, त्यांनी तातडीने आवश्यक कागदपत्रांसह प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा त्यांना आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागू शकते, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

Web Title: Pending dues of rs 3000 to be credited soon ensure your bank account is aadhaar linked for ladki bahin benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 09:28 AM

Topics:  

  • Ladki Bahin Yojna
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी; सक्तीच्या धर्मांतरावर 7 ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद
1

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी; सक्तीच्या धर्मांतरावर 7 ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद

‘सरकार लवकरच डिजिटल प्रॉपर्टी कार्ड जारी करणार’; महसूलमंत्री बावनकुळे यांची महत्त्वपूर्ण घोषणा
2

‘सरकार लवकरच डिजिटल प्रॉपर्टी कार्ड जारी करणार’; महसूलमंत्री बावनकुळे यांची महत्त्वपूर्ण घोषणा

शेतकरी कर्जमुक्तीसाठी सरकारकडून तब्बल 7 हजार कोटींचा निधी; रक्कम लवकरच कर्जखात्यात होणार जमा
3

शेतकरी कर्जमुक्तीसाठी सरकारकडून तब्बल 7 हजार कोटींचा निधी; रक्कम लवकरच कर्जखात्यात होणार जमा

लज्जास्पद! कॅब चालकांची अरेरावी! ५२२ चा प्रवास ११५० रुपयांत? Pune Airport वरील प्रकरण काय?
4

लज्जास्पद! कॅब चालकांची अरेरावी! ५२२ चा प्रवास ११५० रुपयांत? Pune Airport वरील प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.