Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणुकीतील ‘तो’ प्रकार महागात पडणार?; राहुल गांधी, उद्धव ठाकरे, धृव राठीविरोधात याचिका दाखल

लोकसभेच्या निवडणुत भाजप आणि इंडिया आघाडीसाठी खूप प्रतिष्ठेची झाली होती. विशेष म्हणजे इंडिया आघाडीसाठी तर ही निवडणूक अस्तित्वाची लढाई झाली होती. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 12, 2024 | 09:42 AM
Photo Credit : Team Navrashtra

Photo Credit : Team Navrashtra

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि यूट्यूबर ध्रुव राठी यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात अवमानाची याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत या नेत्यांवर ईव्हीएमबाबत खोट्या बातम्या पसरवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, धृव राठी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

लोकसभेच्या निवडणुत भाजप आणि इंडिया आघाडीसाठी खूप प्रतिष्ठेची झाली होती. विशेष म्हणजे इंडिया आघाडीसाठी तर ही निवडणूक अस्तित्वाची लढाई झाली होती. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.  पण विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने ‘छुपी उद्दिष्टे’ साध्य करण्यासाठी ईव्हीएमबाबत एकतर्फी, गैरसमज पसरवून जनतेची दिशाभूल केली. असा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात धृव राठी सह या विरोधी पक्षांच्या या नेत्यांविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

भांडुपमधील इंडियन लॉयर्स अँड ह्युमन राइट्स ॲक्टिव्हिस्ट असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. धृवराठीसह  या सर्व नेतेमंडळींनी इव्हीएमबाबत दिशाभूल करणारी माहिती जनतेत परसवल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.  गुरुवारी (11 जूलै) न्यायालयाच या याचिकेवर सुनावणी पार पडली. आता न्यायालय यावर काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवडणूक आयोग तसेच मुंबई पोलिसांनी ईव्हीएम मशीन हॅक करता येऊ शकत नाही, असा निर्णय दिला आहे. असे असतानाही राहुल गांधी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि धृव राठी यांनी  खोट्या, एकतर्फी, आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रकाशित केल्या. एक षडयंत्र असून त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई करत या याप्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी अशी मागणी याचिकेत केली आहे.

या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती श्याम चांडक आणि न्यायमूर्ती मोहिते-डेरे यांच्या खंडपिठासमोर झाली. ज्यामध्ये याचिकाकर्त्याने राहुल गांधी, उद्धव ठाकरे, ध्रुव राठी, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर न्यायालयाचा अवमान कायदा 1971 च्या कलम 2(बी) आणि 12 अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात   शिंदे गटाचे रवींद्र वायकर आणि ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर यांच्यात लढत झाली.  अखेरच्या क्षणी रवींद्र वायकर यांनी  अमोल कीर्तिकर यांचा 48 मतांनी पराभव केला होता. वायकरांचा हा विजय मॅनेज केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात तक्रार दोन पक्षांच्या उमेदवारांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.

मतमोजणी केंद्रांवर मोबाईलसाठी बंदी असतानाही रवींद्र वायकर यांच्या गटाने मतदान केंद्रावर मोबाईल वापरला, असा आरोप करण्यात आला आहे. हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह आणि जनाधार पार्टीचे उमेदवार अरोरा सुरिंदर मोहन यांनी पोलिसांकडे  ही तक्रार केली आहे.

Web Title: Petition filed against rahul gandhi uddhav thackeray dhruv rathi what is the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2024 | 09:42 AM

Topics:  

  • BJP
  • Dhruv Rathi
  • Mumbai High Court
  • Rahul Gandhi
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

BMC Election 2026: पदयात्रा आणि घरोघरी प्रचारामुळे राजकारण्यांची भूक वाढली! समोसे, वडापाव आणि बिर्याणीच्या मागणीत २५% वाढ
1

BMC Election 2026: पदयात्रा आणि घरोघरी प्रचारामुळे राजकारण्यांची भूक वाढली! समोसे, वडापाव आणि बिर्याणीच्या मागणीत २५% वाढ

Nagpur Municipal Election 2026 : नागपूर महापालिका निवडणुकीत ४४७ मतदान केंद्रे संवेदनशील; गांधीबाग झोनमध्ये सर्वाधिक केंद्रे
2

Nagpur Municipal Election 2026 : नागपूर महापालिका निवडणुकीत ४४७ मतदान केंद्रे संवेदनशील; गांधीबाग झोनमध्ये सर्वाधिक केंद्रे

Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील
3

Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील

BMC Election 2026: मुंबई महापालिका निवडणुकीत मुस्लिम मतदारांचा कल कुणाकडे, PM मोदींचा प्रभाव किती? सर्वेक्षणातील महत्त्वाचे खुलासे
4

BMC Election 2026: मुंबई महापालिका निवडणुकीत मुस्लिम मतदारांचा कल कुणाकडे, PM मोदींचा प्रभाव किती? सर्वेक्षणातील महत्त्वाचे खुलासे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.