Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut on CJP: माझ्याकडे दोघांचे फोटो आलेत…; अभिजीत दिपकेंच्या कथित मोदी भेटीवरून संजय राऊतांचे गंभीर आरोप

अभिजीत दीपके हे ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक म्हणून ओळखले जातात. शिक्षण व्यवस्थेतील कथित त्रुटी, परीक्षा पद्धतीतील समस्या, NEET परीक्षेतील वाद आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी आंदोलन सुरू केले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 11, 2026 | 02:59 PM
Sanjay Raut, Abhijit Dipke, Narendra Modi, CJP,

Sanjay Raut, Abhijit Dipke, Narendra Modi, CJP,

Follow Us
Follow Us:

Sanjay Raut on Abhijit Dipke: देशात सगळीकडे कॉकरोच जनता पार्टीच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. आज पुण्यात सीजेपी’चे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात आंदोलनही बोलवण्यात आले आहे. असे असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत भेट झाल्याचा दाव संज राऊत यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर मोदींच्या भेटीनंतरच अभिजीत दिपके भारतात परत आल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. संजय राऊतांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ” सीजेपीचे नेते अभिजीत दिपके आणि पंतप्रधान मोदी यांची अमेरिकेत एक बैठक झाली होती. त्या भेटीचे फोटो एका व्यक्तीने मला पाठवले आहेत. त्यानंतरच अभिजीत दिपके भारतात परत आला. असे काही लोकांनी मला सांगितले .पण हे माझे आरोप नाहीत लोकांनी मला जी माहिती पोहचवली. ती मी सांगत आहे.”

IND vs AFG: नेट्समध्ये दिसला रोहित शर्माचा धमाका, अफगाणिस्तान सिरीजपूर्वी मैदानात गाळला घाम

संजय राऊत म्हणाले, ” आम्ही त्याच्या भूमिकेला पाठिंबा दिला होती. पण त्यानतंर जी माहिती सगळ्यांपर्यंत समोर आली, ती माध्यमांना सांगणे गरजेचे आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते सीजेपीच्या आंदोलनाला गेले नाहीत. पण त्या आंदोलनातील तरुणांचे प्रश्न आणि तरुणांना आम्ही तरुणांना पाठिंबा दिला.” जे तरुण रस्त्यावर उतरले आहेत. त्या तरुणांचे सरकारने ऐकायला हवे, त्यासाठी आम्ही भूमिका मांडली. पण या माध्यमातून सरकारला मदत केली जात असेल तर त्यावरही लक्ष ठेवणमे आमचे काम आहे.” असही संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, अभिजीत दिपके यांनी संजय राऊतांचा दावा फेटाळून लावला आहे. “त्या फोटोंबाबात मला काहीही माहिती नाही. एआय वापरून ते फोटो तयार केले जाऊ शकतात. कारण पंतप्रधानांना मी कसा भेटणार, मी तिथे एक साधा विद्यार्थी होतो. हे काही सुरू करायचा माझा कोणताही प्लॅन नव्हता. तुम्हाला प्रोटोकॉल माहिती आहेत. पंधरा दिवस आधी मी तिथे नोकरीसाठी अर्ज करत होतो. मी हे सर्व फक्त व्यंगात्मक रितीने सुरू केलं होतं. त्यातून ही चळवळ सुरू झाली. माझे असे कोणतेही पूर्व नियोजन किंवा उद्देश नव्हता, माझा तसा प्लॅन असता तर मी हे भारतात राहुनही केलं असतं. मी अमेरिकेत गेलोच नसतो.” असही अभिजीत दिपके स्पष्ट केले.

नरेंद्र मोदींनी 12 वर्षात देश चुकीच्या दिशेला नेला, मोदी सरकारमध्ये ‘राम’ नाही अन्…; हर्षवर्धन सपकाळांची टीका

शिक्षण व्यवस्था, NEET परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात आंदोलन करणाऱ्या अभिजीत दीपके यांच्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ला काही विरोधी पक्षांकडून सहानुभूती आणि पाठिंबा मिळाल्याची चर्चा यापूर्वीही झाली होती. अशा परिस्थितीत राऊतांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेत
कोण कोणास भेटले? pic.twitter.com/bCF17dYzGF
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 11, 2026

Web Title: Photos sent to me by sources sanjay rauts explosive tweet stirs maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • CJP
  • Cockroach Janata Party
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Maratha Reservation: राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केल्यानेच जरांगे मुंबईत; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल!
1

Maratha Reservation: राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केल्यानेच जरांगे मुंबईत; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल!

Aaditya Thackeray : ‘दुसऱ्यावर धर्म लादणं ही हिंसाच!’ मिरा-भाईंदरच्या शाळेत कांदा-लसूण बंदी; आदित्य ठाकरे संतापले
2

Aaditya Thackeray : ‘दुसऱ्यावर धर्म लादणं ही हिंसाच!’ मिरा-भाईंदरच्या शाळेत कांदा-लसूण बंदी; आदित्य ठाकरे संतापले

Sanjay Raut Criticized BJP: प्राथमिक शाळेत कांदा, बटाटा, लसूण खाण्यास बंदी! संजय राऊतांचा शाळा व्यवस्थापनाला इशारा
3

Sanjay Raut Criticized BJP: प्राथमिक शाळेत कांदा, बटाटा, लसूण खाण्यास बंदी! संजय राऊतांचा शाळा व्यवस्थापनाला इशारा

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक
4

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.