Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाणी सुद्धा शुद्ध मिळेना! वसतिगृहातील 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विषबाधा; पिंपरीमधील धक्कादायक घटना

शासनाकडून वसतिगृहांच्या देखभालीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात असतानाही मूलभूत सुविधा योग्य प्रकारे उपलब्ध करून दिल्या जात नसल्याचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 14, 2026 | 07:04 PM
पाणी सुद्धा शुद्ध मिळेना! वसतिगृहातील 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विषबाधा; पिंपरीमधील धक्कादायक घटना
Follow Us
Close
Follow Us:

दूषित पाणी पिल्यामुळे २० विद्यार्थ्यांना विषबाधा
विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले
विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी: पिंपरी शहरातील एका शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात दूषित पाणी पिल्यामुळे २० हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रकृती बिघडल्याने सर्व विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना गुरुवारी अचानक मळमळ, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. काही विद्यार्थ्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी नवीन भोसरी येथील रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी १० विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, तर उर्वरित १० विद्यार्थ्यांवर अजूनही उपचार सुरू असून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे यांनी दिली.

किचनमध्ये लपला आहे धोका! दारुपेक्षा अधिक घातक आहेत स्वपयंपाकघरातील हे पदार्थ; डॉक्टरांनी दिला इशारा

या घटनेनंतर वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या कारभारावर गंभीर आरोप केले आहेत. वसतिगृहातील पिण्याच्या पाण्याचा वॉटर फिल्टर अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. याबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेरून पाणी पिण्याची वेळ आली होती, असेही त्यांनी सांगितले.

शासनाकडून वसतिगृहांच्या देखभालीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात असतानाही मूलभूत सुविधा योग्य प्रकारे उपलब्ध करून दिल्या जात नसल्याचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पालक व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

शाळेतील मध्यान्ह भोजनातून तब्बल 12 विद्यार्थ्यांना विषबाधा; पालकांमध्ये तीव्र संताप

घातक आहेत स्वपयंपाकघरातील हे पदार्थ

साखर

चहापासून काॅफी आणि प्रत्येक गोड पदार्थामध्ये साखरेचा आवर्जून वापर केला जातो. परंतु याचे अतिरिक्त सेवन आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. डाॅक्टरांनी याला सायलंट किलर म्हटले आहे. साखर शरीरात सहज विरघळते आणि इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढवते. ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका आणि फॅटी लिव्हरचा धोका देखील वाढतो. अनेकांच्या आहारात साखरेचे दररोज सेवन केले जाते अशात तुम्ही आजपासूनच याचे सेवन कमी करायला हवे.

फक्त साखरंच नाही तर रोजच्या वापरात समाविष्ट होणारे असे अनेक पदार्थ आहेत ज्याच कोणतेही पौष्टिक मूल्य नसते आणि ते फक्त साखरेने भरलेले असतात. तुम्ही आजपासूनच यांचे सेवन कमी करायला हवे अन्यथा तुमच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

अचानक उभं राहताच चक्कर येते? ‘ऑर्थोस्टेटिक हायपोटेन्शन’चा असू शकतो इशारा

टोमॅटो सॉस

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच टोमॅटो साॅसचे सेवन आवडते. भजी, पिझ्झा, बर्गर, पराठा यासोबत याचे सेवन केले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का? टोमॅटो साॅसमध्ये साखरेचा मोठा अंश आढळला जातो. अनेक सॉसवर “साखर नाही” असे लेबल लावले जाते, पण हे एक घोटाळा आहे. सर्व सॉसमध्ये साखर जास्त असते. जर तुम्ही एक चमचा सॉस खाल्ले तर समजून जा की, तुम्ही तुमच्या शरीराला एक चमचे साखर देत आहात.

 

Web Title: Pimpri 20 students food poisoning drinking contaminated water health news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 07:04 PM

Topics:  

  • Food Poison
  • Pimpri
  • Students

संबंधित बातम्या

BMC School : पालिकेच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी! गुणवंतांचा भव्य सत्कार; आयुक्त अश्विनी भिडे यांचा विद्यार्थ्यांशी संवाद
1

BMC School : पालिकेच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी! गुणवंतांचा भव्य सत्कार; आयुक्त अश्विनी भिडे यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.