Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दादरच्या शिवाजी पार्कवर पंतप्रधान मोदींची जाहीरसभा; मुख्यमंत्र्यांसह राज ठाकरेही असणार हजर

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे ला होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत आज (दि.17) लोकसभा निवडणुकीच्या प्रचार जोरदार रंगणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 17, 2024 | 09:09 AM
pm narendra modi

pm narendra modi

Follow Us
Follow Us:

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे ला होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत आज (दि.17) लोकसभा निवडणुकीच्या प्रचार जोरदार रंगणार आहे. दादरच्या शिवाजी पार्कवर महायुतीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) गर्जना करणार आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

मुंबईच्या सर्व सहा लोकसभेच्या जागांव्यतिरिक्त, 20 मे रोजी इतर चार एमएमआर क्षेत्रातील जागांवर मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचाराच्या या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान मोदींची ही महासभा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला. तसेच, मनसेने शिवाजी पार्क बुक केले आहे.

2006 नंतर भाजप नेत्यांसोबत

पंतप्रधान मोदींसोबत राज ठाकरेही या सभेला संबोधित करणार आहेत. अशा स्थितीत त्याच्याकडेही सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. कल्याणच्या सभेत राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या वाढत्या संख्येचा मुद्दा उपस्थित केला होता, जे अप्रत्यक्षपणे भाजपला आवडले नाही. अशा परिस्थितीत राज ठाकरे पंतप्रधान मोदींसमोर कोणते मुद्दे मांडतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 2006 नंतर पहिल्यांदाच ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत मंचावर दिसणार आहेत.

उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसवर निशाणा

तज्ज्ञांच्या मते, पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसवर निशाणा साधतील. नुकत्याच झालेल्या प्रचारादरम्यान मोदींनी उद्धव यांच्या शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खोटे ठरवून निशाणा साधला होता.

Web Title: Pm modi public rally at dadar shivaji park for lok sabha election nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2024 | 09:09 AM

Topics:  

  • general election
  • lok sabha
  • Lok Sabha Election
  • political news

संबंधित बातम्या

Gen Z साठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; 21 व्या वर्षी आमदार-खासदार होण्याची संधी? 
1

Gen Z साठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; 21 व्या वर्षी आमदार-खासदार होण्याची संधी? 

घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये पुरुषांचा सहभागही वाढला पाहिजे : मोहन भागवत
2

घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये पुरुषांचा सहभागही वाढला पाहिजे : मोहन भागवत

‘विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त, आवाज दाबण्यासाठी दडपशाहीचा वापर’; सोनिया गांधी यांचा हल्लाबोल
3

‘विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त, आवाज दाबण्यासाठी दडपशाहीचा वापर’; सोनिया गांधी यांचा हल्लाबोल

मोठी बातमी ! ठाकरेंना सोडून गेलेल्या ‘त्या’ सहा खासदारांच्या अडचणींत होणार वाढ? सर्वोच्च न्यायालयातच धाव
4

मोठी बातमी ! ठाकरेंना सोडून गेलेल्या ‘त्या’ सहा खासदारांच्या अडचणींत होणार वाढ? सर्वोच्च न्यायालयातच धाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.