
Pune Mayoral Election, Pune Municipal Election 2026, Pune Politics,
Pune News: राज्यातील सर्व महापालिकांमधील महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीची प्रक्रिया टप्प्याटप्याने राबवली जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने कार्यक्रमही जाहीर केला आहे. त्यानुसार महापालिकांकडून महापौर आणि उपमहापौर निवडणुकीची आणि नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली सभा घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिकेच्या नगरसचिव विभागाकडून विभागीय आयुक्तांकडून यासंदर्भात पत्र पाठवण्यात आले असून येत्या दोन दिवसांत पहिल्या सभेची तारीख आणि पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्तीची माहिती महापालिकेला कळवली जाईल.
राज्य सरकारने महानगरपालिकांच्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या उत्साहानंतर लगेचच ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे. २६ जानेवारीनंतर, म्हणजेच २७ आणि २८ जानेवारी रोजी इच्छुक उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्र) सादर करावे लागतील. अर्जांच्या छाननीनंतर, ३० किंवा ३१ जानेवारी रोजी नवनिर्वाचित नगरसेवकांची विशेष बैठक बोलावण्यात येईल. याच दिवशी प्रत्यक्ष मतदान होऊन शहराचे नवीन महापौर आणि उपमहापौर घोषित केले जातील.
Satara Crime: अनैतिक संबंधांत अडथळा ठरलेल्या तरुणाची निर्घृण हत्या; आधी दगडाने ठेचले
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, नवनिर्वाचित सदस्यांना नोटीस बजावण्याचे काम सुरू आहे. यंदा राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच वेळी पार पडल्याने, सर्व महापालिकांचे सभागृह एकाच दिवशी अस्तित्वात आले आहे. या पार्श्वभूमीवर, नगर विकास विभागाने मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी एक एकात्मिक वेळापत्रक तयार केले आहे. यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे.
Nagpur Crime : OYO हॉटेलमध्ये वाद आणि निर्घृण हत्या; प्रेयसीची हत्या करून प्रियकर फरार
मुंबईच्या महापौर निवडीचा कार्यक्रम इतर महापालिकांच्या तुलनेत काहीसा वेगळा असला, तरी सध्याच्या राजकीय घडामोडी आणि तांत्रिक प्रक्रिया पाहता, मुंबईला नवा महापौर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. विभागीय आयुक्तांकडून पीठासीन अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्यानंतरच मतदानाची अधिकृत तारीख निश्चित केली जाईल. प्रामुख्याने भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेतील गटनोंदणी प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.
पुणे महानगरपालिकेचे महापौरपद ‘सर्वसाधारण महिला’ प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने भाजपमधील दिग्गज नेत्यांच्या (गणेश बिडकर, धीरज घाटे) आशा मावळल्या आहेत. आता पक्षातील अनुभवी आणि नवीन महिला नगरसेविकांनी या पदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महापालिकेत भाजपला ११९ जागांसह स्पष्ट बहुमत मिळाल्याने भाजपचाच महापौर बसणार हे निश्चित आहे.