Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMP पर्यटन बसला जोरदार प्रतिसाद; ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग, उत्पन्न ६८ लाखांवर

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) पर्यटन बससेवेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल आहे. यावर्षी ६८ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले असून प्रवाशांमध्ये जेष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सामावेश आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 07, 2026 | 11:14 AM
PMO Tourist Bus Pune

PMO Tourist Bus Pune

Follow Us
Close
Follow Us:
  • PMP पर्यटन बसला जोरदार प्रतिसाद’
  • ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग
  • उत्पन्न ६८ लाखांवर
पुणे/चंद्रकांत कांबळे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) पर्यटन बससेवेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या सेवेमुळे यंदा सर्वाधिक ६८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे या पर्यटन बसमधून प्रवास करणाऱ्या पर्यटकांपैकी सुमारे ७० टक्के प्रवासी हे ज्येष्ठ नागरिक आहेत.पर्यटकांना पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रातील धार्मिक, ऐतिहासिक तसेच निसर्गरम्य स्थळांचा अनुभव घेता यावा, या उद्देशाने १ एप्रिल २०२३ रोजी पर्यटन बससेवा सुरू करण्यात आली. १ एप्रिल २०२६ रोजी या उपक्रमाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत.

हे देखील वाचा : अखेर ठरलं! पिंपरीतील डेअरी फार्म पूल कधी खुला होणार? महत्त्वाची माहिती समोर

सध्या लोणावळा,भुलेश्वर,पानशेत,वरसगाव, मोराची चिंचोली यांसारख्या पर्यटन स्थळांना मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत आहेत. गुरुवार, शनिवार आणि रविवारी आठवड्यातून तीन दिवस वातानुकूलित ई-बस चालवण्यात येतात. तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी किंवा ३३ प्रवाशांचे गट बुकिंग झाल्यास इतर दिवशीही बसची सोय केली जाते. या बससेवेचे तिकीट दर ५०० रुपये आहे.पीएमपी प्रशासनाने सध्या १२ पर्यटन मार्गांवर बससेवा सुरू केली असून, या सेवेमुळे पर्यटकांना सोयीस्कर आणि किफायतशीर पर्यटनाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

तिकीट बुकिंग केंद्रे

डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, मनपा भवन, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी बसस्थानक आणि निगडी बसस्थानक येथे तिकीट उपलब्ध आहेत.

उत्पन्नाचा आढावा : 

वर्ष                    उत्पन्न
२०२३              ५ लाख रुपये
२०२४               ५ लाख ५ हजार रुपये
२०२५-२६      (मार्चपर्यंत) ६८ लाख रुपये

पीएमपीतचे, जनसंपर्क अधिकारी किशोर चौहान यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील विविध भागांतील पर्यटकांना पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घडविण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे.या सेवेला ज्येष्ठ आणि तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एप्रिल-मे महिन्यातील सुट्ट्यांमध्ये या सेवेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा. तसेच पर्यटन बस समन्वयक नितीन गुरव यांनी देखील पर्यटन बससेवेला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, नवीन पर्यटन मार्ग सुरू करण्याची मागणीही वाढत असल्याचे म्हटले.

तर प्रशांत कुलकर्णी ज्येष्ठ प्रवाशाने वरसगाव, पानशेत, शिरकाई देवी दर्शन आणि पक्षी संग्रहालयाचा प्रवास अतिशय आनंददायी ठरला. पानशेत येथे बोटिंग, जंगल सफारी आणि पक्षांना खाद्य देण्याचा अनुभव विशेष होता. संपूर्ण ट्रिप उत्कृष्ट नियोजनामुळे संस्मरणीय ठरली असल्याचे सांगितले.

Web Title: Pmp tourist bus pune senior citizens strong response 60 lakh revenue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 11:50 PM

Topics:  

  • Marathi News
  • Pune
  • Pune PMP Bus

संबंधित बातम्या

Peddi Song Release: राम चरण, जान्हवी कपूर अन् श्रुती हासनचा भन्नाट डान्स! ‘पेद्दी’ चित्रपटातील ‘हेल्लाल्लालो’ गाणं आऊट
1

Peddi Song Release: राम चरण, जान्हवी कपूर अन् श्रुती हासनचा भन्नाट डान्स! ‘पेद्दी’ चित्रपटातील ‘हेल्लाल्लालो’ गाणं आऊट

LPG Subsidy New Rule: ‘या’ नागरिकांना मिळणार नाही गॅस सबसिडी! बँक खात्यात पैसे येणं होणार बंद; पाहा नवीन नियम
2

LPG Subsidy New Rule: ‘या’ नागरिकांना मिळणार नाही गॅस सबसिडी! बँक खात्यात पैसे येणं होणार बंद; पाहा नवीन नियम

Milk Price Hike : पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता दुधही महागलं? दही, पनीरसह वाढल्या इतक्या किमती
3

Milk Price Hike : पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता दुधही महागलं? दही, पनीरसह वाढल्या इतक्या किमती

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना, संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय, तुमच्यावर काय होणार परिणाम?
4

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना, संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय, तुमच्यावर काय होणार परिणाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.