Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMRDA Commissioner Dr Abhijit Chaudhari: पीएमआरडीएने नवीन विकास निकष ठरवण्यापूर्वी कायदेशीर वैधता तपासावी

PMRDA: विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून पीएमआरडीएला देण्यात आलेली जबाबदारी निर्धारित मुदतीत पूर्ण झाली नसल्यास विकास आराखडा किंवा स्ट्रक्चरल प्लॅन तयार करण्याचा अधिकार अद्याप शिल्लक आहे का, याची कायदेशीर तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 08, 2026 | 04:15 PM
PMRDA Commissioner Dr Abhijit Chaudhari: पीएमआरडीएने नवीन विकास निकष ठरवण्यापूर्वी कायदेशीर वैधता तपासावी
Follow Us
Follow Us:
  • नियोजन समितीच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण व्हावे.
  • वेगळे निकष लागू न करता यूडीसीपीआरनुसारच परवानग्या द्याव्यात.
  • पीएमआरडीएच्या कायदेशीर अधिकारांची फेरतपासणी करावी.
PMRDA Commissioner Dr Abhijit Chaudhari: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) विकास व बांधकाम परवानग्यांसाठी नवीन निकष निश्चित करण्यापूर्वी त्यांची कायदेशीर वैधता तपासावी. कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत, अशी मागणी पुणे महापालिकेतील माजी लोकप्रतिनिधींनी केली आहे.

यासंदर्भात माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदन दिले.

Hinjawadi Metro News: हिंजवडी मेट्रो धावण्यासाठी सज्ज!; CMRS ची हिरवी कंदील, १५ ऑगस्टला उद्घाटन

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमातील तरतुदी तसेच संविधानातील अनुच्छेद २४३ झेड-ईचा आधार घेत माजी लोकप्रतिनिधींनी पीएमआरडीएच्या नियोजनविषयक अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पुणे महानगर क्षेत्राचा विकास आराखडा तयार करताना महानगर नियोजन समितीची भूमिका महत्त्वाची आहे. या समितीत नगरपालिका व पंचायतींच्या लोकप्रतिनिधींचा सहभाग घटनात्मकदृष्ट्या आवश्यक असताना पीएमआरडीएने समितीला केवळ मनुष्यबळ व तांत्रिक सहाय्य करावे. समितीची जागा घेऊन स्वतंत्रपणे धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत, असा दावा लोकप्रतिनिधींनी केला आहे.

विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून पीएमआरडीएला देण्यात आलेली जबाबदारी निर्धारित मुदतीत पूर्ण झाली नसल्यास विकास आराखडा किंवा स्ट्रक्चरल प्लॅन तयार करण्याचा अधिकार अद्याप शिल्लक आहे का, याची कायदेशीर तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, युनिफाइड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन्स (यूडीसीपीआर) लागू असताना पीएमआरडीएकडून स्वतंत्र विकास निकष निश्चित करण्याच्या भूमिकेचाही फेरविचार करावा, अशी मागणी या लोकप्रतिनिधींनी केली आहे.

आनंदाची बातमी! पुणे जिल्ह्यातील 38 हजार 970 शेतकरी कर्जमुक्त; तब्बल 345 कोटी

स्ट्रक्चरल प्लॅन तयार करणाºया नगररचना अधिकाºयांकडेच बांधकाम परवानग्यांचे अधिकार राहिल्यास हितसंबंधांचा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियोजन आणि बांधकाम परवानगी या दोन्ही प्रक्रिया एकाच यंत्रणेकडे ठेवणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका माजी लोकप्रतिनिधींनी मांडली आहे. प्रारूप विकास आराखडा रद्द झाल्यानंतर प्रादेशिक योजना अस्तित्वात असल्याचा दावा करून त्याआधारे स्वतंत्र नियोजन निकष जाहीर करणे योग्य आहे का, याचीही स्पष्टता पीएमआरडीएने द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

रिंगरोडच्या रुंदीमध्ये आणि मार्गरेषेत झालेल्या बदलांमुळे नागरिकांच्या इमारती बाधित होत असल्याचा मुद्दाही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. अभियांत्रिकी आणि नियोजन विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप करत रिंगरोडसाठी जाहीर केलेल्या नगररचना योजना रद्द करण्यामागील कारणे स्पष्ट करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील नगररचना योजनांची सद्य:स्थितीही जाहीर करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

पीएमआरडीएने बांधकाम परवानग्यांच्या प्रक्रियेपेक्षा मेट्रो, रस्ते आणि अन्य पायाभूत सुविधांच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित करावे. बांधकाम परवानग्यांचे काम जिल्हाधिकाऱ्याकडे सोपवावे आणि पुणे महानगर क्षेत्राच्या नियोजनासाठी तज्ज्ञांची स्वतंत्र व समन्वयित टीम नियुक्त करावी, अशी मागणी माजी लोकप्रतिनिधींनी केली आहे.

 

 

 

Web Title: Pmrda building permission new rules legal validity ujwal keskar letter to commissioner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • Marathi News
  • PMRDA
  • Pune

संबंधित बातम्या

Government Spending : तिजोरी रिकामी झाली हो… सरकारी खर्चामुळे मेटाकुटीला आलेत ‘हे’ देश; परिस्थिती झाली ‘बेहाल’
1

Government Spending : तिजोरी रिकामी झाली हो… सरकारी खर्चामुळे मेटाकुटीला आलेत ‘हे’ देश; परिस्थिती झाली ‘बेहाल’

All The Best : महाराष्ट्र गाजवल्यानंतर ‘ऑल दि बेस्ट’चा डंका सातासमुद्रापार, तारखा जाणून घ्या…
2

All The Best : महाराष्ट्र गाजवल्यानंतर ‘ऑल दि बेस्ट’चा डंका सातासमुद्रापार, तारखा जाणून घ्या…

Tax Relief On Medical Bills: ऑफिसने रुग्णालयाचा खर्च नाकारला? इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये करा असा दावा; पाहा कसा होईल फायदा
3

Tax Relief On Medical Bills: ऑफिसने रुग्णालयाचा खर्च नाकारला? इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये करा असा दावा; पाहा कसा होईल फायदा

Prajakta Mali Birthday: प्राजक्ता माळीच्या बर्थडे दिवशी मोठी घोषणा! “मला नाईलाजाने…” म्हणत घेतला ‘हा’ निर्णय
4

Prajakta Mali Birthday: प्राजक्ता माळीच्या बर्थडे दिवशी मोठी घोषणा! “मला नाईलाजाने…” म्हणत घेतला ‘हा’ निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.