Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayander : नवघर पोलीस ठाण्यात राजकीय संघर्ष शिगेला; व्हिडिओ वादातून भाजप-शिवसेना आमनेसामने

शहरातील राजकारण पुन्हा एकदा चांगलेच तापले असून, समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या एका आक्षेपार्ह व्हिडिओच्या निमित्ताने भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात थेट संघर्ष उफाळून आला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 18, 2026 | 03:26 PM
Mira Bhayander : नवघर पोलीस ठाण्यात राजकीय संघर्ष शिगेला; व्हिडिओ वादातून भाजप-शिवसेना आमनेसामने
Follow Us
Follow Us:
  • नवघर पोलीस ठाण्यात राजकीय संघर्ष शिगेला
  • व्हिडिओ वादातून भाजप-शिवसेना आमनेसामने
मिरा-भाईंदर/विजय काते : शहरातील राजकारण पुन्हा एकदा चांगलेच तापले असून, समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या एका आक्षेपार्ह व्हिडिओच्या निमित्ताने भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात थेट संघर्ष उफाळून आला आहे. या वादामुळे नवघर पोलीस ठाणे हेच आंदोलनाचे केंद्र बनले असून, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.घडलेल्या प्रकारानुसार, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात समाजमाध्यमांवर करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वादाची ठिणगी पडली. शिवसेनेच्या युवासेनेचे पदाधिकारी गुरु ज्योतसिंग यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत आमदार मेहता यांच्यावर टीका केली. या व्हिडिओमध्ये अश्लील व आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. यानंतर भाजप आक्रमक झाला आणि संबंधित पदाधिकाऱ्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी पुढे आली.

या मागणीसाठी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली 50 हून अधिक नगरसेवक व कार्यकर्त्यांनी भाईंदरमधील नवघर पोलीस ठाण्यात धाव घेत ठिय्या आंदोलन केले. आंदोलनादरम्यान “त्वरित कारवाई करा” अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संबंधित व्यक्तीवर गुन्हा नोंदविण्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा भाजपकडून देण्यात आला.दरम्यान, या आंदोलनाशी संबंधित आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि वादाला नवे वळण मिळाले. या व्हिडिओमध्ये आमदार आणि त्यांच्या काही नगरसेवकांकडून पोलीस अधिकाऱ्यांशी आक्रमक वर्तन केल्याचे, तसेच कथित शिवीगाळ केल्याचे दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. या घटनेनंतर शिवसेना (उबाठा) पक्षानेही आक्रमक भूमिका घेतली.

Mira Bhayander : भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य; नवघर पोलीस ठाण्यात नगरसेवकांचे आंदोलन

शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने नवघर पोलीस ठाण्यात एकत्र जमले आणि त्यांनीही ठिय्या आंदोलन सुरू केले. “पोलीस अधिकाऱ्यांचा अपमान सहन केला जाणार नाही” अशी भूमिका घेत संबंधित आमदार आणि नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. पोलिसांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.या संपूर्ण घटनाक्रमामुळे नवघर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. एकीकडे भाजपकडून शिवसैनिकावर कारवाईची मागणी होत असताना, दुसरीकडे शिवसेनेकडून भाजप आमदार आणि नगरसेवकांवर कारवाईची मागणी केली जात आहे.

दरम्यान, नवघर पोलीस ठाण्याकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या दोन्ही व्हिडिओंची तपासणी सुरू असून, संबंधित व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी संकेत दिले आहेत.या घटनेमुळे मिरा-भाईंदरमधील राजकीय वातावरण आणखी ढवळून निघाले असून, आगामी काळात हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Mira Bhayandar : मिरा-भाईंदरमध्ये “झोम्बी ड्रग”चा शिरकाव? सार्वजनिक सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह

Web Title: Political conflict reaches its peak at navghar police station bjp shiv sena face to face over video controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • Marathi News
  • mira bhayandar
  • navrashtra news

संबंधित बातम्या

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
1

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
2

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
3

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

MUMBAI News: मनसेच्या ‘मराठी मानाची दहीहंडी’चा जल्लोष, दिवंगत मराठी नेते अन् कलाकारांच्या आठवणींना उजाळा
4

MUMBAI News: मनसेच्या ‘मराठी मानाची दहीहंडी’चा जल्लोष, दिवंगत मराठी नेते अन् कलाकारांच्या आठवणींना उजाळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.