Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solar energy project On ST Bus : ST च्या मोकळ्या जागेवर होणार ‘सौर ऊर्जा प्रकल्प’; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा

ST महामंडळाकडून कार्यशाळेच्या व बसस्थानकांच्या छतावर ' सौरऊर्जा प्रकल्प ' उभारुन त्याद्वारे वर्षाला सुमारे ३०० मेगावॉट इतकी वीज निर्मिती करण्याचे लक्ष ठेवण्यात आले.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 03, 2025 | 05:36 PM
Pratap Sarnaik announces that a 'solar energy project' will be built at the ST bus site

Pratap Sarnaik announces that a 'solar energy project' will be built at the ST bus site

Follow Us
Close
Follow Us:

Solar energy project On ST bus site:  मुंबई: एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागेवर तसेच कार्यशाळेच्या व बसस्थानकांच्या छतावर ‘ सौरऊर्जा प्रकल्प ‘ उभारुन त्याद्वारे वर्षाला सुमारे ३०० मेगावॉट इतकी वीज निर्मिती करण्याचे लक्ष ठेवण्यात आले असून त्याद्वारे वर्षाला सुमारे १ हजार कोटी रुपये किंमतीची वीजनिर्मिती करण्याचा महत्वकांक्षी ‘ सौर ऊर्जा हब ‘ उभारुन एसटीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणार असल्याची परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी घोषणा केली आहे.

ते या अनुषंगाने एसटी महामंडळाच्या सभागृहात आयोजित केलेल्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर यांच्या सह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री सरनाईक म्हणाले की, भविष्यात संपूर्ण राज्याला पथदर्शक ठरेल असा एक महत्त्वाकांक्षी ‘ सौर ऊर्जा प्रकल्प ‘ एसटी महामंडळाच्या माध्यमातून आकारास येत आहे. या प्रकल्पा अंतर्गत महामंडळाच्या ज्या जागेवर खाजगी- सार्वजनिक भागीदारीच्या माध्यमातून विविध विकास प्रकल्प साकारले जाणार आहेत, त्या बरोबरच उरलेल्या मोकळ्या जागेमध्ये ‘ सौर ऊर्जा शेती ‘ द्वारे वीज निर्मिती करण्याचे काम हाती घेतले जाईल. सध्या एसटी महामंडळाला दैनंदिन आस्थापना वापरासाठी वर्षाला १५ मेगॉवाट इतकी वीज लागते. त्यासाठी एकूण २५ ते ३० कोटी रुपये बिल महावितरण कंपनीला भरावे लागते.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

भविष्यात येणाऱ्या हजारो इलेक्ट्रिक बसेसच्या चार्जिंग साठी सुमारे २८० मेगावॅट इतकी वीजेची गरज लागणार आहे. सदर वीज एसटी महामंडळाने सौर ऊर्जेच्या माध्यमातून तयार केल्यास भविष्यात वर्षाला सुमारे १ हजार कोटी रुपये खर्चामध्ये बचत होणार आहे. त्यामुळे खर्चातील ही बचत भविष्यात एसटीचा उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून पुढे येऊ शकते.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

शासनाच्या ओसाड जागेवर एसटी उभारणार सौरऊर्जा प्रकल्प

अर्थात, ३०० मेगॉवाट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्प राज्यातील एसटीच्या विविध जागेवर उभारला जाणार आहे. त्यासाठी गरज पडल्यास शासनाच्या ओसाड जागेवर शासनाच्या परवानगीने व नाम मात्र भाडे आकारणी करुन सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून मिळणारी आर्थिक मदत देखील यासाठी उपयोगात येणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला आर्थिक अनुदानासाठी शासनाकडे वेळोवेळी हात पसरावे लागणार नाहीत. म्हणून भविष्यात एसटीचा हा ‘सौर उर्जा हब ‘ संपूर्ण राज्यासाठी सौर ऊर्जा निर्मितीचा एक पथदर्शक प्रकल्प म्हणून राज्यात नावाजला जाईल असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.

Web Title: Pratap sarnaik announces that a solar energy project will be built at the st bus site

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 05:35 PM

Topics:  

  • pratap sarnaik
  • Solar Project
  • st bus news

संबंधित बातम्या

ST Bus: दिवाळीत धुळे विभागाला ‘लक्ष्मी’ पावली! लालपरीची तब्बल ४ कोटी ३१ लाखांची बंपर कमाई
1

ST Bus: दिवाळीत धुळे विभागाला ‘लक्ष्मी’ पावली! लालपरीची तब्बल ४ कोटी ३१ लाखांची बंपर कमाई

St Bus: मद्यपी कर्मचाऱ्यांना एसटीत थारा नाही, ७ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा
2

St Bus: मद्यपी कर्मचाऱ्यांना एसटीत थारा नाही, ७ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

बसची आगाऊ तिकिट सेवेचे वाजले तीन-तेरा! ST महामंडळाच्या ऑनलाईन व्यवस्थेमुळे प्रवाशांचे तीन तास गेले वाया
3

बसची आगाऊ तिकिट सेवेचे वाजले तीन-तेरा! ST महामंडळाच्या ऑनलाईन व्यवस्थेमुळे प्रवाशांचे तीन तास गेले वाया

St Bus News : एसटीला दिवाळी हंगामात 301 कोटी रुपये उत्पन्न, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
4

St Bus News : एसटीला दिवाळी हंगामात 301 कोटी रुपये उत्पन्न, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.