शिष्यवृत्ती परीक्षा सातवीसाठी जाहीर झालेली असली तरी देखील अभ्यासक्रम न ठरल्यामुळे शिक्षकांपुढे पेच निर्माण झाला (फोटो - istock)
Scholarship Exam: भोकरदन : अखेर पूर्ववत चौथी व सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा सुरू करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला. अगदी यावर्षीपासूनच ही परीक्षा या वर्गासाठी घेतली जाणार आहे. याची घोषणा करणारा आदेश १७ ऑक्टोबर रोजी काढला; पण या परीक्षांचा अभ्यासक्रमच अद्याप उपलब्ध न झाल्याने व एक सत्र संपल्याने परीक्षेस बसणाऱ्या मुलांना काय व कधी शिकवायचे, असा पेच शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे.
पूर्वीपासून चौथी व सातवीलाच शिष्यवृत्ती परीक्षा होती; मात्र २०१६ पासून या वर्गांना ती परीक्षा बंद करून ती पाचवी व आठवीला सुरू केली. पण, आता खऱ्या अथनि प्राथमिक शिक्षणाचे मूल्यमापन व्हायचे असेल, तर पूर्ववत चौथी व सातवीलाच शिष्यवृत्ती हवी, अशी जोरदार भागणी विचारात घेऊन शासनाने त्यास मान्यता देऊन तसा आदेशदेखील काढला; पण यामुळे यावर्षीपुरती चौथी, पाचवी, सातवी व आठवी या चार वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घ्यावी लागत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यातील जुन्या नियमाप्रमाणे पाचवी व आठवीचे मार्गदर्शन शाळेच्या या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सुरू झाले; पण आता ऐनवेळी जाहीर केलेल्या चौथी व सातवी शिष्यवृत्तीसाठी यंदा नव्याने अभ्यासक्रम तयार करावा लागणार आहे. या निर्णयाची घोषणा झाली; मात्र हा अभ्यासक्रमच अजून तयार नाही, अशी बिकट अवस्था आहे. पहिली ते चौथीच्या नियमित पाठ्यपुस्तकांतून चौथी शिष्यवृत्तीचा व पहिली ते सातवीच्या पाठ्यपुस्तकावर आधारित सातवीचा शिष्यवृत्तीचा अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे. तसेच इयत्ता चौथीसाठी ऐन वेळेवर शिष्यवृत्ती परीक्षा जाहीर झाल्यामुळे या मुलांना सुद्धा अभ्यास पूर्ण करण्यासाठी वेळ लागणार आहे. वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपातील प्रत्येकी दीडशे गुणांचे हे दोन पेपर असतील. हा अभ्यासक्रम तयार करण्याचे काम महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे वा संस्थेकडे आहे. चौथी व सातवीची परीक्षा एप्रिल किंवा मे २०२६ मध्ये जरी होणार असली, तरी एक सत्र संपले आहे. शिष्यवृत्तीची तयारी १ जूनपासून सुरू करतात; पण आता तर अभ्यासक्रमच तयार नाही तर शिकवायचे काय हा प्रश्न आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अडीच महिने जादा; पण पाच महिने वाया..
शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभापासूनच शिष्यवृती कितवीला? हा संभ्रम होत याबाबत निर्णय हा जूनमध्येच अपेक्षित होता, मात्र प्रशासकीय व राजकीय पातळीवर प्राधान्यक्रमावर विषय नसावा म्हणून तर अर्थ शैक्षणिक वर्ष झाल्याने ही घोषणा केली आहे, जरी परीक्षेसाठी नियमित वेळेपेक्षा दोन-अडीच महिने जादा मिळणार असली तरीही आतापर्यंत पाच महिने वाया गेले व अद्याप अभ्यासक्रमदेखील नाही, हे लक्षात घेतले. म्हणून यावर्षी या परीक्षेला विरोध होत आहे. या संबंधित विद्यार्थी व शिक्षक यांची मात्र कोंडी होत आहे.






