Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC News: “जनतेच्या जिव्हाळ्याची ‘ST’ लवकरच…”; काय म्हणाले मंत्री प्रताप सरनाईक?

राज्यातील अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमधून मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते. या सुविधेचा लाभ सुलभपणे घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात येणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 23, 2026 | 02:35 AM
MSRTC News: “जनतेच्या जिव्हाळ्याची ‘ST’ लवकरच…”; काय म्हणाले मंत्री प्रताप सरनाईक?
Follow Us
Follow Us:

एसटी ही महाराष्ट्राची लोकवाहिनी
एसटी सेवा अधिक सक्षम करण्यासाठी विविध निर्णय
काही वर्षांत डिझेलवर चालणाऱ्या बस टप्प्याटप्प्याने बंद केल्या जाणार

मुंबई: एसटी ही महाराष्ट्राची लोकवाहिनी असून ती अधिक गतिमान, सुरक्षित आणि आरामदायी करण्यासाठी राज्य सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याची ‘ एसटी ‘ लवकरच संपूर्ण कात टाकून नव्या रूपात जनतेसमोर येईल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.

राज्यातील अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमधून मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते. या सुविधेचा लाभ सुलभपणे घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात येणार असून, त्याचा शुभारंभ मंत्रालयातील पत्रकार कक्षात करण्यात आला.

Pratap Sarnaik: रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य; अंमलबजावणीसाठी सरकारची हालचाल, मंत्री प्रताप सरनाईक यांची बैठक

यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, वित्तीय सल्लागार गिरीश देशमुख, जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, सरचिटणीस दीपक भातुसे, खजिनदार विनोद राय तसेच अन्य पत्रकार उपस्थित होते.

या प्रसंगी प्रताप सरनाईक आणि रितेश देशमुख यांच्या हस्ते वरिष्ठ पत्रकारांना स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना सरनाईक म्हणाले की, एसटी सेवा अधिक सक्षम करण्यासाठी विविध निर्णय राबवले जात आहेत. एसटीच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट करण्यात येत असून, येत्या काही वर्षांत डिझेलवर चालणाऱ्या बस टप्प्याटप्प्याने बंद केल्या जातील. यामुळे पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळेल.

तसेच, एसटी स्थानकांची स्वच्छता राखण्यासाठी खाजगी कंत्राटे देण्यात आली असून, दर चार तासांनी स्वच्छतागृहांची साफसफाई केली जाईल. बस स्थानकेही स्वच्छ व सुटसुटीत ठेवण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे लवकरच एसटीचा चेहरामोहरा पूर्णपणे बदललेला दिसेल, असेही त्यांनी नमूद केले.

Solar power project : एसटीचा सौर ऊर्जेकडे पहिला टप्पा सुरू; 2.57 मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पाला मंजुरी – परिवहनमंत्र्यांची माहिती

दरम्यान, एसटीचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही जबाबदारी स्वीकारल्याबद्दल सरनाईक यांनी दोघांचे आभार मानले. यावर बोलताना रितेश देशमुख यांनी सांगितले की, त्यांचे वडील आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी परिवहन खाते सांभाळले होते. एसटी हा त्यांच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. त्यामुळे कोणतीही अपेक्षा न ठेवता आपण एसटीचे ब्रँड अॅम्बेसेडर होण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Pratap sarnaik said will try to develop msrtc st buses services to passengers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • msrtc
  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
1

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Pratap Sarnaik: रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश
2

Pratap Sarnaik: रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश

Belhe Bus Stand : बेल्हे बसस्थानक नियंत्रकांच्या प्रतीक्षेत! सात वर्षांपासून वाहतूक नियंत्रक कक्ष कुलूपबंद
3

Belhe Bus Stand : बेल्हे बसस्थानक नियंत्रकांच्या प्रतीक्षेत! सात वर्षांपासून वाहतूक नियंत्रक कक्ष कुलूपबंद

Ganesh Festival 2026: गणपतीनंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास धक्का धक्कीचा; रेल्वे फुल्ल, एसटी आरक्षणासाठीही धावपळ
4

Ganesh Festival 2026: गणपतीनंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास धक्का धक्कीचा; रेल्वे फुल्ल, एसटी आरक्षणासाठीही धावपळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.