Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pravin Darekar: महायुतीच्या मतभेदांच्या चर्चेवर प्रवीण दरेकरांनी स्पष्ट केली भूमिका, तर मुंबईच्या पुनर्विकासाचा मांडला प्लॅन

मुंबईतील 'महाराष्ट्र फर्स्ट कॉन्क्लेव २०२६' मध्ये भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी महायुतीमधील संबंध आणि मुंबईच्या पुनर्विकासावर मोठी विधाने केली. दरेकर समितीचा अहवाल मुंबईतील मराठी माणसासाठी गेम चेंजर ठरेल, असे ते म्हणाले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 19, 2026 | 09:50 PM
Pravin Darekar: महायुतीच्या मतभेदांच्या चर्चेवर प्रवीण दरेकरांनी स्पष्ट केली भूमिका, तर मुंबईच्या पुनर्विकासाचा मांडला प्लॅन
Follow Us
Close
Follow Us:
  • महायुतीच्या मतभेदांच्या चर्चेवर प्रवीण दरेकरांनी स्पष्ट केली भूमिका
  • तर मुंबईच्या पुनर्विकासाचा मांडला प्लॅन
  • जाणून घ्या काय म्हणाले…
मुंबई: “महायुतीमध्ये होणारे छोटे-मोठे वाद हे घरातील अंतर्गत विषयांसारखे आहेत. आमचे कुटुंब सांभाळणारे मुख्य कॅप्टन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरील अशा लहान-सहान मतभेदांचा महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला पूर्ण पाठिंबा दिला असून, देवेंद्रजींच्या कुशल नेतृत्वाखाली आम्ही सर्व घटक पक्ष एकत्र राहूनच काम करणार आहोत,” असा ठाम विश्वास भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी व्यक्त केला. नवभारत मीडियाआयोजित ‘महाराष्ट्र फर्स्ट कॉन्क्लेव २०२६’ (Navabharat Maharashtra First Conclave 2026) मध्ये उपस्थित राहून त्यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले.

आम्ही बाळासाहेबांच्या मूळ विचारांचे शिवसैनिक

शिवसेना आणि भाजप युतीच्या प्रवासावर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, “प्रताप सरनाईक असोत की मी, आम्ही सर्व मूळचे शिवसैनिक आहोत. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील जी शिवसेना कार्यरत आहे, तीच खरी आणि कायदेशीर शिवसेना आहे. तीच शिवसैनिकांची मानसिकता आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मूळ विचारांवर चालणारे हे सरकार आहे. त्यामुळे आमच्यात कोणताही वैचारिक मतभेद नाही.”

नवभारत मीडिया ग्रुप आयोजित ‘महाराष्ट्र फर्स्ट कॉन्क्लेव्ह २०२६’ या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास उपस्थित राहण्याची संधी लाभली. “Magnetic Maharashtra – Where Growth Attracts the World” या संकल्पनेवर आधारित यंदाच्या कॉन्क्लेव्हमध्ये महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य… pic.twitter.com/CtitZqDpbj — Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 19, 2026

“मराठी येत नसेल तर महाराष्ट्रात धंदा करायचा अधिकार नाही!” परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा रिक्षा-टॅक्सी चालकांना थेट इशारा

एसआरए (SRA) इमारतींचा पुनर्विकास आणि ‘दरेकर समिती’चा अहवाल

मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्याच्या सरकारच्या लक्षावर आणि गृहनिर्माण क्षेत्रातील स्वतःच्या भूमिकेवर बोलताना दरेकर यांनी ‘स्वयं-पुनर्विकासाचा’ महत्त्वपूर्ण मुद्दा मांडला. मुंबईच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी ‘दरेकर समिती’चा सविस्तर अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे. हा अहवाल महाराष्ट्राच्या गृहनिर्माण क्षेत्रासाठी ‘गेम चेंजर’ ठरणार आहे. दादरमधील ‘सुंदर नगर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी’चे उदाहरण देत ते म्हणाले की, या सोसायटीचे भूमिपूजन आणि चाव्यांचे वाटप स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी केले होते. आता या आणि अशा अनेक एसआरए इमारतींना ३० वर्षांहून अधिक काळ झाला आहे. त्यामुळे म्हाडाच्या जमिनीसोबतच आता एसआरए इमारतींचा पुनर्विकासही शासकीय प्राधिकरणाने स्वतः करणे आवश्यक आहे.

“नुसतं ‘मराठी मराठी’ करून चालत नाही, कृती हवी!”

मराठी माणसाच्या हक्काच्या घरांवर बोलताना त्यांनी विरोधकांना टोला लगावला. “केवळ ‘मराठी मराठी’ अशा घोषणा देऊन चालत नाही, तर मराठी माणसाच्या भल्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी लागते. ‘नंदादीप सोसायटी’च्या उद्घाटन प्रसंगाची आठवण सांगताना ते म्हणाले, तिथल्या एका मराठी भगिनीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. मुंबईतील इमारतींमध्ये मोठ्या संख्येने मध्यमवर्गीय मराठी माणूस राहतो. हा मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला जाऊ नये, त्याला हक्काचे घर मिळावे, यासाठी ‘सेल्फ डेव्हलपमेंट’ हाच एकमेव उत्तम आणि फायदेशीर पर्याय आहे,” असे दरेकर यांनी स्पष्ट केले.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विशेष शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १७०० झोपडीधारकांनी घेतला लाभ

Web Title: Pravin darekar at maharashtra first conclave 2026 mumbai sra self development

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 09:49 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra First Conclave 2026
  • Mahayuthi
  • Mumbai
  • shivsena

संबंधित बातम्या

“मराठी येत नसेल तर महाराष्ट्रात धंदा करायचा अधिकार नाही!” परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा रिक्षा-टॅक्सी चालकांना थेट इशारा
1

“मराठी येत नसेल तर महाराष्ट्रात धंदा करायचा अधिकार नाही!” परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा रिक्षा-टॅक्सी चालकांना थेट इशारा

Maharashtra First Conclave 2026 : धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा वनवास कधी संपणार? CM फडणवीसांनी दिली डेडलाईन
2

Maharashtra First Conclave 2026 : धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा वनवास कधी संपणार? CM फडणवीसांनी दिली डेडलाईन

Maharashtra 1st Conclave 2026: महाराष्ट्र 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा संकल्प
3

Maharashtra 1st Conclave 2026: महाराष्ट्र 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा संकल्प

ठाकरे गटाचा आणखी एक खासदार शिंदे गटाच्या गळाला? शिवसेनेच्या बड्या नेत्यांशी घेतली भेट
4

ठाकरे गटाचा आणखी एक खासदार शिंदे गटाच्या गळाला? शिवसेनेच्या बड्या नेत्यांशी घेतली भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.