Photo Credit_ Social Media
यापैकी २१० नागरिकांची कागदपत्रे तपासून त्यांना पात्र, हस्तांतरण शुल्काच्या अधीन पात्र किंवा सशुल्क पात्र म्हणून मान्यता देण्यात आली. तसेच सुमारे ३०० अर्ज कागदपत्र पडताळणीसाठी स्वीकारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, ११९० नागरिकांच्या शंकांचे निरसन झाल्यानंतर त्यांनी सर्वेक्षण प्रक्रियेस सहमती दर्शवली आहे. या शिबिरांमध्ये नागरिकांना आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन, प्रत्यक्ष सहाय्य आणि प्रक्रिया समजावून सांगण्याचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांच्या मनातील संभ्रम दूर होत असून पुनर्विकास प्रक्रियेबाबत विश्वास वाढताना दिसत आहे.
सदर शिबिरांमुळे नागरिकांच्या विविध प्रश्नांचे तत्काळ निरसन होत असून पात्रता व सर्वेक्षण प्रक्रिया अधिक सुलभ व गतिमान करण्यात येत आहे. नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन, कागदपत्र पडताळणी तसेच विविध प्रक्रियांबाबत प्रत्यक्ष सहाय्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रशासनामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या पुढील शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व प्रकल्पाशी संबंधित आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण कराव्यात आणि आपले हक्काचे घर सुनिश्चित करावे, अशी विनंती धारावी पुनर्विकास प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे सचिव विपीन पालीवाल यांनी केली आहे.
मध्य रेल्वेच्या ‘ऑपरेशन जीवन रक्षक’ची कमाल; ४ महिन्यांत २५ प्रवाशांना मृत्यूच्या दारातून खेचलं बाहेर






