Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नागपुरात; ब्रह्माकुमारीजच्या मोहिमेचा करणार शुभारंभ

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात आध्यात्मिक चेतना, सामाजिक समरसता आणि सकारात्मक विचाराला अनन्य साधारण महत्त्व आहे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पूर्व नोंदणी अनिवार्य आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 25, 2026 | 09:20 AM
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शहरात

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शहरात

Follow Us
Follow Us:

नागपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज महाराष्ट्रात दौरा असून, यामध्ये त्या नागपुरात भेट देणार आहेत. ब्रह्माकुमारीजच्या राज्यव्यापी अभियानाचा शुभारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज (दि.२५) सायंकाळी होणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माऊंटआबू येथील ब्रह्माकुमारीजचे अतिरिक्त महासचिव बी. के. मृत्युंजय भाई, राजयोगिनी बी. के. चंद्रिका दीदी, नागपूर प्रमुख राजयोगिनी बी. के. रजनी दीदी व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होईल.

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात आध्यात्मिक चेतना, सामाजिक समरसता आणि सकारात्मक विचाराला अनन्य साधारण महत्त्व आहे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पूर्व नोंदणी अनिवार्य आहे. ज्याची नोंदणी झाली आहे, त्यांनी मूळ अधारकार्ड, ओळखपत्र सोबत ठेवून सुरक्षा नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जामठा येथील ब्रह्माकुमारीज विश्वशांती सरोवर येथे समारंभासाठी जय्यत तयारी केली आहे.

हेदेखील वाचा : PM Modi Israel Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस इस्त्रायल दौऱ्यावर; 71 हजार कोटींच्या कराराकडे लागले लक्ष

विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रपतींच्या दौऱ्यासंदर्भात आढावा घेतला असून, शासकीय यंत्रणांना योग्य ती दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहे. राज्यातील प्रत्येक तालुका पातळीवरील ब्रह्माकुमारीजच्या केंद्रामार्फत मोहीम प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी कडेकोट बंदोबस्त

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे बुधवारी सायंकाळी शहरात आगमन होणार आहे. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी सुमारे २५०० पोलिस कर्मचारी तैनात केले आहेत. पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल आणि सहआयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. मंगळवारी पोलिसांनी फुलड्रेस रिहर्सलदेखील केली.

सायंकाळी होणार नागपुरात आगमन

राष्ट्रपतींचे सायंकाळी ५.२० वाजता नागपुरात आगमन होईल. पोलिस आयुक्त आणि सहआयुक्तांसह सर्व वरिष्ठ अधिकारी सुरक्षा व्यवस्थेत तैनात असतील. १० पोलिस उपायुक्त (डीसीपी), ८ एसीपी, ४५ पोलिस निरीक्षक, १७० होमगार्ड, २००० शहर पोलिस कर्मचारी आणि राज्य राखीव पोलिस दलाची (एसआरपीएफ) तुकडी तैनात केली आहे. बुधवारी सायंकाळी जामठा येथे ब्रह्माकुमारीजमध्ये आयोजित विश्व शांती सरोवर कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर राष्ट्रपती लोकभवनात मुक्काम करतील.

सर्वच ठिकाणी बंदोबस्त

सर्वच ठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे. गुरुवारी सकाळी ८ ते १० च्या दरम्यान त्यांचे शहरातून प्रस्थान होईल. राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: President draupadi murmu in nagpur today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 09:20 AM

Topics:  

  • Nagpur News
  • President Droupadi Murmu

संबंधित बातम्या

‘मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहा, लोकशाही संधी देईल,’ नागपुरमध्ये Gen Z समोर देवेंद्र फडणवीसांचा संघर्षाचा उलगडा
1

‘मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहा, लोकशाही संधी देईल,’ नागपुरमध्ये Gen Z समोर देवेंद्र फडणवीसांचा संघर्षाचा उलगडा

लिपीक, प्रयोगशाळा सहाय्यकांची 400 पदे भरण्याची शक्यता; अनुदानित शाळांतील भरतीला हिरवा कंदील
2

लिपीक, प्रयोगशाळा सहाय्यकांची 400 पदे भरण्याची शक्यता; अनुदानित शाळांतील भरतीला हिरवा कंदील

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; कारची ट्रकला जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू
3

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; कारची ट्रकला जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू

चाकूने भोसकून सराईत गुंडाची हत्या; प्रेयसीला दुसऱ्या तरुणासोबत पाहून झाला वाद अन्…
4

चाकूने भोसकून सराईत गुंडाची हत्या; प्रेयसीला दुसऱ्या तरुणासोबत पाहून झाला वाद अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.