Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात मनाई आदेश लागू; शस्त्रासह फिरणारे तिघेजण गजाआड

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. शहरात सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त तैनात आहे. यानंतरही गुन्हेगारीत सक्रीय असणाऱ्यांकडून सर्रासपणे शस्त्रे बाळगली जात आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 02, 2024 | 11:50 AM
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात मनाई आदेश लागू; शस्त्रासह फिरणारे तिघेजण गजाआड
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. शहरात सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त तैनात आहे. यानंतरही गुन्हेगारीत सक्रीय असणाऱ्यांकडून सर्रासपणे शस्त्रे बाळगली जात आहेत. लकडगंड आणि पाचपावली पोलिसांनी 2 वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत शस्त्र घेऊन फिरणाऱ्या तिघांना अटक केली.

पाचपावली ठाण्याचे पथक रविवारी रात्री गस्त घालत होते. दुचाकीवरून जाणारे दोन तरुण पोलिसांना पाहताच पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करत कामठी मार्गावरील एका गल्लीत त्यांना पकडले. सौरभ असज्जा (वय 19, रा. शनीचरा बाजार) आणि सौरभ करवाडे (वय 21, रा. हरिदासनगर, लष्करीबाग) अशी त्यांची नावे आहेत. सौरभकडे तलवार आढळून आली. यामुळे दोघांनाही अटक करण्यात आली.

कुंभारपुरा, लालगंज येथील रहिवासी प्रशांत हेडाऊ (वय 24) याला लकडगंज ठाण्याच्या पथकाने अटक केली. हे पथक रविवारी मध्यरात्री गस्त घालत होते. मालधक्का येथील हनुमान मंदिराजवळून जात असताना प्रशांत दिसला. पोलिस आपल्याकडे येत असल्याचे बघून तो पळून जाऊ लागला.

पोलिसांनी पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले. अंगझडतीत त्याच्याकडे घातक चाकू आढळून आला. संबंधित पोलिसांनी आरोप गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असण्याची शक्यता लक्षात घेता आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

Web Title: Prohibitory order imposed in nagpur due to upcoming elections nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2024 | 11:50 AM

Topics:  

  • Election News
  • maharashtra
  • Nagpur News

संबंधित बातम्या

चाकण परिसरात पावसाने जनजीवन विस्कळीत, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान; व्यापारीही हवालदिल
1

चाकण परिसरात पावसाने जनजीवन विस्कळीत, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान; व्यापारीही हवालदिल

‘स्थानिक’च्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा प्लॅन, एकत्र लढणार की स्वबळावर? बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं
2

‘स्थानिक’च्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा प्लॅन, एकत्र लढणार की स्वबळावर? बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं

अल्पवयीन मुलीवर सातत्याने अत्याचार; पीडित मुलगी गर्भवती होताच..
3

अल्पवयीन मुलीवर सातत्याने अत्याचार; पीडित मुलगी गर्भवती होताच..

मैत्रिणींसाठी ‘तो’ बनला चोर; एक-दोन नाहीतर तब्बल 9 ठिकाणी घरफोडी, दुचाकीवर फिरला अन्…
4

मैत्रिणींसाठी ‘तो’ बनला चोर; एक-दोन नाहीतर तब्बल 9 ठिकाणी घरफोडी, दुचाकीवर फिरला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.