Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : जिल्हाधिकारी कार्यालयावर श्रमिक मुक्ती दलाचे आंदोलन; हजारो प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित

चांदोली अभयारण्य आणि विविध धरण प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांमुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 20, 2026 | 04:26 PM
Project-Affected of Chandoli Wildlife Sanctuary and Dam Project Protest Outside Satara District Collector Office

Project-Affected of Chandoli Wildlife Sanctuary and Dam Project Protest Outside Satara District Collector Office

Follow Us
Follow Us:

Satara News : सातारा : चांदोली अभयारण्य आणि विविध धरण प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्या हजारो प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांनी अखेर तीव्र रूप धारण केले असून श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार धडक आंदोलन छेडण्यात आले. ”आधी पुनर्वसन, मगच प्रकल्प” ( Chandoli Dam) या मूलभूत धोरणाची अंमलबजावणी न केल्याचा आरोप करत आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

शेकडो प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेल्या आंदोलकांनी प्रशासनाच्या दिरंगाईिवरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

आंदोलकांनी दिलेल्या निवेदनात अनेक गंभीर मुद्दे मांडले. ज्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींना अद्याप पाणी मिळालेले नाही, त्यांच्या सातबारा उताऱ्यावर लावण्यात आलेली ‘कब्जेहक्क’ वसुली तातडीने रद्द करून उतारे बोजामुक्त करावेत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच केंद्र सरकारच्या २०१३ च्या कायद्यानुसार पात्र प्रकल्पग्रस्तांना १ लाख ६५ हजार रुपये घरबांधणी अनुदान तात्काळ देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली.

हे देखील वाचा : अमित कदमांचा कोणता झेंडा घेऊ हाती? भाजप नेत्यांशी वाढली सलगी; ठाकरे गटाच्या जीवाला घोर

याशिवाय, वाटप करण्यात आलेल्या जमिनींचा ‘भोगवटादार वर्ग २’ मधून ‘भोगवटादार वर्ग १’ मध्ये बदल करणे, लाभक्षेत्रातील जमिनींना बंद पाईपलाईनद्वारे खात्रीशीर सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच पुनर्वसन कायद्यातील दुरुस्तीनुसार स्त्री वारसदारांनाही स्वतंत्र खातेदार म्हणून जमीन वाटप करणे या मागण्यांवरही आंदोलकांनी जोर दिला. संपादित न झालेल्या जमिनी, झाडे आणि घरांची नुकसानभरपाई त्वरित देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

आंदोलनादरम्यान नेत्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत सांगितले की, चांदोली प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करताना अनेक ठिकाणी कायद्याची योग्य अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे हजारो कुटुंबे आजही विस्थापनाच्या संकटात अडकली आहेत. ”अनेक प्रकल्पग्रस्तांना स्वत:च्या जमिनीवर मजुरी करण्याची वेळ आली आहे, तर काहींना उपजीविकेसाठी शहरांकडे स्थलांतर करावे लागत आहे. ही परिस्थिती अत्यंत भीषण आहे,” असे आंदोलकांनी नमूद केले.

हे देखील वाचा : महिला आरक्षण गेलं खड्डयात..; भाजपच्या पदाधिकाऱ्यांना ना खंत ना खेद

प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांच्या स्वाक्षरीने दिलेल्या निवेदनात स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील सर्व प्रकल्पग्रस्त एकत्र येऊन तीव्र बेमुदत आंदोलन छेडतील. या आंदोलनात कॉ. संपत देसाई, संतोष गोटल यांच्यासह श्रमिक मुक्ती दलाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते.

Web Title: Project affected of chandoli wildlife sanctuary and dam project protest outside satara district collector office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • Protester
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : गोडोलीत पालिकेचा हातोडा; रस्त्यावरील १५ फलक हटविले !
1

Satara News : गोडोलीत पालिकेचा हातोडा; रस्त्यावरील १५ फलक हटविले !

Umbraj News: उंब्रज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट कामामुळे ग्रॅनाईट कोसळले; ३ विद्यार्थी जखमी; शिक्षण सभापती तेजस्विनी कदम आक्रमक!
2

Umbraj News: उंब्रज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट कामामुळे ग्रॅनाईट कोसळले; ३ विद्यार्थी जखमी; शिक्षण सभापती तेजस्विनी कदम आक्रमक!

Wai News: वाई शहरात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? बेकायदेशीर गुटखा विक्री, ट्रिपल सीट अन् बुलेटच्या फटाक्यांनी वाईकर हैराण
3

Wai News: वाई शहरात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? बेकायदेशीर गुटखा विक्री, ट्रिपल सीट अन् बुलेटच्या फटाक्यांनी वाईकर हैराण

Satara News: वाईच्या विकासाच्या आड येऊ नका; मी थांबणार नाही!; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात
4

Satara News: वाईच्या विकासाच्या आड येऊ नका; मी थांबणार नाही!; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.