Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साताऱ्यात DJ-लेझरविरोधात ‘मूक’ मोर्चा; शहरातील २१ संस्थांचा सहभाग, निर्णायक लढ्याची तयारी

DJ Laser Satara Protest: साताऱ्यात DJ आणि लेझर लाईटच्या वापराला विरोध करण्यासाठी २१ संस्था एकवटल्या असून, अनंत चतुर्दशीच्या दिवशी २५ सप्टेंबर रोजी राजवाड्यावर मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 24, 2026 | 09:30 PM
DJ Laser Satara Protest

DJ Laser Satara Protest

Follow Us
Follow Us:
  • गणेश विसर्जन मिरवणुकीत DJ-लेझर नको
  • साताऱ्यात २१ संस्थांचा मूक मोर्चा
  • अनंत चतुर्दशीला मूक मोर्चा
सातारा: डीजे आणि लेझर विरोधी आंदोलनात आता एकूण २१ संस्था या डीजे आणि लेझर विरोधात उभ्या ठाकल्या आहेत.अनंत चतुर्दशीच्या दिवशी शुक्रवार दिनांक २५ सप्टेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ठीक ५.३० वाजता सर्वजण राजवाड्यावर एकत्र भेटणार असून यावेळी सर्व संस्थांच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षीपासून हे डीजे आणि लेझर लाईट सर्व मिरवणुकांमधून, उत्सवांमधून हद्दपार होण्यासाठी या संस्थांनी खूप प्रयत्न केले. गेल्या वर्षीदेखील मोर्चा काढला.

शुक्रवारचा हा मोर्चा राजवाडा ते पोलीस करमणूक केंद्र या मार्गावर मार्गक्रमण करणार आहे. घोषणा न देता केवळ डीजे आणि लेझर विरोधी फलक उंचावून या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत .यावर्षी साताऱ्यातील प्रथितयश डॉक्टर मंडळी तसेच अनेक महिला मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि प्रत्येकाने आपल्याबरोबर किमान पाच मित्र किंवा मैत्रिणींना घेऊन यावे. असे आवाहन आयोजक प्रसाद चाफेकर यांनी केले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाची कडक भूमिका

गणेशोत्सवासह राज्यातील विविध धार्मिक सण आणि मिरवणुकांमध्ये होणाऱ्या ध्वनी आणि वायुप्रदूषणावर मुंबई उच्च न्यायालयाने अखेर कडक भूमिका घेतली आहे. सार्वजनिक रस्त्यांवर आणि ठिकाणी फटाके फोडण्यास न्यायालयाने पूर्ण बंदी घातली आहे. त्याचबरोबर लेझर लाईट, हाय-इंटेन्सिटी लुमेन लाईट आणि बीमच्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

Web Title: Satara dj laser protest silent march 21 organizations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 09:09 PM

Topics:  

  • DJ Speaker
  • Protest
  • Satara News

संबंधित बातम्या

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
1

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

सातारा शहरातील ५८ मंडळांच्या गणरायांचे विसर्जन; जिल्ह्यात ५३३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला निरोप
2

सातारा शहरातील ५८ मंडळांच्या गणरायांचे विसर्जन; जिल्ह्यात ५३३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला निरोप

शाळा चकचकीत, पण शिक्षक कुठे आहेत? सातारा झेडपीच्या मॉडेल स्कूलविरोधात ‘राष्ट्रवादी’ आक्रमक!
3

शाळा चकचकीत, पण शिक्षक कुठे आहेत? सातारा झेडपीच्या मॉडेल स्कूलविरोधात ‘राष्ट्रवादी’ आक्रमक!

साताऱ्यातील मोडकळीस आलेल्या इमारतींवर नगरपालिकेचे डेंजर झोन फलक
4

साताऱ्यातील मोडकळीस आलेल्या इमारतींवर नगरपालिकेचे डेंजर झोन फलक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.