Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

TMC News : महापालिकेच्या विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती, कर्मचाऱ्यांनी मानले उपमुख्यमंत्र्‍यांचे आभार

मागील काही वर्षाच्या कालावधीमध्ये शासनाकडून प्राप्त होणारे शासन निर्णय व न्यायालयाच्या आदेशाची पूर्तता करुन कार्यवाही करावयाची असल्यामुळे या पदोन्नती करण्यास विलंब होत होता.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 27, 2025 | 05:58 PM
महापालिकेच्या विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती, कर्मचाऱ्यांनी मानले उपमुख्यमंत्र्‍यांचे आभार (फोटो सौजन्य-X)

महापालिकेच्या विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती, कर्मचाऱ्यांनी मानले उपमुख्यमंत्र्‍यांचे आभार (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे : ठाणे महानगरपालिका ही नागरिकांना सेवा देणारी स्थानिक स्वराज्य संस्था असून या मार्फत नागरिकांना मिळणाऱ्या सेवा या अधिक जलद मिळण्याकरिता व कामकाजात सुसूत्रता यावी यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी कर्मचारी यांच्या पदोन्नतीकरिता विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिकेतील अधिकारी कर्मचारी यांना पदोन्नती देण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ लिपिक या पदावर 46, अग्निशमन प्रणेता (लिडिंग फायरमन) या पदावर 19 जणांना तर सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर 02 जणांना पदोन्नती देण्यात आली असून प्रशासनाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 पुणेकरांसाठी गुडन्यूज! खडकवासला धरण साखळीत पाणीसाठा वाढण्यास सुरूवात

मागील काही वर्षाच्या कालावधीमध्ये शासनाकडून प्राप्त होणारे शासन निर्णय व न्यायालयाच्या आदेशाची पूर्तता करुन कार्यवाही करावयाची असल्यामुळे या पदोन्नती करण्यास विलंब होत होता. मात्र काही पदोन्नत्यांबाबत शासनाकडून सुस्पष्ट आदेश प्राप्त होताच महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अधिकारी कर्मचारी यांच्या पदोन्नत्या करणेबाबत विशेष ड्राईव्ह घेण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते. त्यानुसार आज महापालिकेने निर्गमित केलेल्या आदेशामुळे पदोन्नत्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

मागील आठ ते दहा वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक अधिकारी- कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यामुळे अनेक पदे रिक्त होती. महापालिकेच्या कामाची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर असून रिक्त पदांवरील पदोन्नती तातडीने होऊन कामकाज प्रभावीपणे व्हावे व कर्मचाऱ्यांचे देखील मनोबल वाढावे यासाठी आवश्यक ती कार्यवाही करणेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनास सूचना केली होती. त्यानुसार आज विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आयुक्‌त (2) प्रशांत रोडे यांनी पदोन्नतीचे आदेश दिले असून लवकरच त्यांची पदस्थापना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. तर आगामी काळामध्ये उर्वरित रिक्त पदांवर देखील पदोन्नतीबाबत निर्णय घेवून तसे आदेश पारित करणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

आज पारित करण्यात आलेल्या पदोन्नतीमध्ये वरिष्ठ लिपिक या पदावर 46, अग्निशमन प्रणेता (लिडिंग फायरमन) या पदावर 19 जणांना तर सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर 02 जणांना पदोन्नती देण्यात आली. या पदोन्नतीमुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्व कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापालिका आयुक्त सौरभ राव व प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

Purandar Airport : ‘पुरंदर’ प्रकरणी शेतकऱ्यांची थट्टा! हरकती नोंदवणारे अधिकारी गैरहजर

Web Title: Promotion to employees in various categories of the municipal corporation employees expressed their gratitude to the deputy chief minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2025 | 05:58 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • thane
  • TMC

संबंधित बातम्या

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
1

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
2

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
3

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?
4

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.