Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira-Bhayander News: मीरा-भाईंदर पालिकेच्या महासभेत नवीन पदनिर्मितीचा प्रस्ताव, रखडलेल्या पदोन्नतींना मिळणार चालना

मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील शेकडो कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. महापौर डिंपल मेहता यांनी आगामी महासभेत नवीन पदनिर्मितीचा प्रस्ताव आणण्याचे निर्देश दिले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 31, 2026 | 04:47 PM
मीरा-भाईंदर पालिकेच्या महासभेत नवीन पदनिर्मितीचा प्रस्ताव (Photo Credit- X)

मीरा-भाईंदर पालिकेच्या महासभेत नवीन पदनिर्मितीचा प्रस्ताव (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा वनवास संपणार!
  • शेकडो पदोन्नत्यांचा मार्ग मोकळा
  • महापौरांचे महत्त्वाचे निर्देश
मीरा-भाईंदर: महानगरपालिकेतील शेकडो कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पदोन्नत्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. वरिष्ठ संवर्गातील पदांची अपुरी संख्या आणि सेवा प्रवेश नियमावलीतील त्रुटींमुळे कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या दीर्घकाळ प्रलंबित राहिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महापौर डिंपल मेहता यांनी सेवा प्रवेश नियमावलीत आवश्यक सुधारणा करण्याबरोबरच नवीन पदनिर्मितीचा प्रस्ताव आगामी महासभेत सादर करण्याचे निर्देश प्रजयमाला दिल आहेत. महापालिकेतील अनेक कर्मचारी गेली दहा ते पंधरा वर्षे एकाच पदावर कार्यरत असून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. वरिष्ठ पदांची संख्या वाढविणे आणि सेवा प्रवेश नियमावलीत सुधारणा करणे, ही कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी होती.

प्रक्रियेला गती देण्यासाठी महापालिकेला उपायुक्तांचे निर्देश

यासाठी कर्मचारी संघटनांकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. नुकत्याच झालेल्या बैठकीत महापौर डिपल मेहता यांनी या विषयाची गंभीर दखल घेत प्रशासनाला आवश्यक प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. महासभेची मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. तसेच या प्रक्रियेला गती देण्यासाठी महापालिका उपायुक्त सचिन बांगर यांनाही आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Pratap Sarnaik : आरोपांमुळे परिवहन विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह, सरनाईक यांचं प्रत्युत्तर

आवश्यक प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश

महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पदोन्नत्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी आगामी महासभेत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाणार आहे. आवश्यक प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले असून राज्य शासनाकडून लवकर मंजुरी मिळावी यासाठीही पाठपुरावा करण्यात येणार आहे, असे महापौर डिंपल मेहता यांनी सांगितले. महासभेत प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर राज्य शासनाची मान्यता प्राप्त झाल्यास शेकडो कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्यांचा मार्ग मोकळा होणार असून महापालिकेच्या प्रशासकीय कार्यक्षमतेतही सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महापालिकेत मनुष्यबळाची कमतरता

महापालिकेतील अनेक अधिकारी आणि कर्मचारी मागील काही वर्षांत सेवानिवृत्त झाले आहेत. मात्र त्यांच्या जागी नव्या भरतीची प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यात आलेली नसल्याने विविध विभागांमध्ये मनुष्यबळाची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. परिणामी विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला असून प्रशासकीय कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्येही अडचणी निर्माण होत असल्याचे चित्र आहे.

मीरा-भाईंदरमध्ये तीव्र पाणीटंचाई! सलग चौथा शनिवार कोरडा; नागरिक त्रस्त, नेत्यांवर निष्क्रियतेचे आरोप

Web Title: Proposal for creation of new posts in mira bhayandar municipal corporations general body meeting stalled promotions set to receive a boost

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • mira bhayandar
  • Mira Bhayandar Municipal Corporation

संबंधित बातम्या

Mira Bhayandar Dahi Handi: ‘संस्कृतीची हंडी’ ते ‘मराठी हंडी’; मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा दणका
1

Mira Bhayandar Dahi Handi: ‘संस्कृतीची हंडी’ ते ‘मराठी हंडी’; मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा दणका

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
2

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Mira Bhayandar News: कोट्यवधींच्या वास्तूंची दुरवस्था! मीरा-भाईंदर महापालिकेच्या निष्काळजीपणाचा कळस
3

Mira Bhayandar News: कोट्यवधींच्या वास्तूंची दुरवस्था! मीरा-भाईंदर महापालिकेच्या निष्काळजीपणाचा कळस

Mira-Bhayandar News: भूमिपुत्रांच्या घरांवर कारवाईने मीरा-भाईंदरमध्ये राजकीय वातावरण तापले; सरनाईकांची प्रशासनाकडे मोठी मागणी
4

Mira-Bhayandar News: भूमिपुत्रांच्या घरांवर कारवाईने मीरा-भाईंदरमध्ये राजकीय वातावरण तापले; सरनाईकांची प्रशासनाकडे मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.