
महाबळेश्वर रस्ता प्रश्नी आंदोलक आक्रमक!
यावर जिल्हाधिकारी संतोष पाटील व पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी या संदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करून पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती दिली. मात्र या बैठकीबाबत शहरातील आंदोलनकर्त्यांना अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नसल्याने आम्ही महाबळेश्वरकर चळवळीच्या कार्यकर्त्यां मध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे या प्रश्नावर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, नगरसेवक रवींद्र कुंभारदरे, अफझल सुतार, संदीप साळुंखे, अतुल सलागरे, विशाल तोष्णीवाल , अमित ढेबे, टॅक्सी संघटनेचे दादाभाई मानकर, इरफान कुरेशी, मारुती डोईफोडे,विजय नायडू राजेंद्र बावळेकर, इमाम भाई नालबंद, नंदकुमार वायदंडे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Satara News : रस्ते कामातील दिरंगाईवर वाईत नागरिकांचा संताप; नगरपरिषद सभेत प्रशासनाला जाब
दरम्यान आ. शशिकांत शिंदे यांनी महाबळेश्वर परिसरातील रस्त्यांच्या रखडलेल्या कामाविरोधात नागरिकांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा मुद्दा विधिमंडळाच्या सभागृहात उपस्थित केला. यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी माहिती देताना या संदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सभागृहात सांगितले.
महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात मंत्रालयात बैठक होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली असली तरी या बैठकीत केवळ एम.एस.आय.डी.सी चे अधिकारी व ठेकेदार यांच्यापुरती चर्चा मर्यादित न ठेवता आम्ही महाबळेश्वरकर चळवळीच्या आंदोलनकर्त्यांनाही सहभागी करून घ्यावे, अशी ठाम मागणी चळवळीच्या शिष्टमंडळाने केली आहे.
महाबळेश्वरमधील स्थानिक नागरिक, व्यापारी आणि पर्यटन व्यवसायिकांना प्रत्यक्ष अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे त्यांच्या भावना व मत विचारात घेणे आवश्यक असल्याचे शिष्टमंडळाचे म्हणणे आहे. त्यामुळे मंत्रालयात होणाऱ्या बैठकीसाठी स्थानिक प्रतिनिधींनाही बोलावून सर्वांच्या उपस्थितीतच या प्रश्नावर तोडगा काढावा, असा आग्रह आंदोलनकर्त्यांनी धरला आहे
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना चळवळीच्या कार्यकर्त्यांनी दोन आठवड्या पूर्वी निवेदन देऊन या प्रकरणात लक्ष घालावे अशी विनंती केली होती. परंतु त्यांनी या प्रश्ना कडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यांनी जर वेळीच लक्ष दिले असते तर आंदोलनाची वेळ आली नसती असा आरोपही काही नागरिकांनी केला आहे.
Satara News: सोनगाव कचरा डेपोला भीषण आग; धुराच्या लोटामुळे नागरिक हैराण, ठोस उपाययोजनांची मागणी